श्रीगणेश चित्रकला स्पर्धा- - - जाई.
||श्री गणेशाय नम: ||
ब गट - मोठयांसाठी
जलरंगातील श्रीगणेशाचे चित्र
फोटो रेफरन्स : पेंट विथ डेव्हिड ट्युटोरियल
||श्री गणेशाय नम: ||
ब गट - मोठयांसाठी
जलरंगातील श्रीगणेशाचे चित्र
फोटो रेफरन्स : पेंट विथ डेव्हिड ट्युटोरियल
||प्रथम तुला वंदितो कृपाळा ,गजानना गणराया ||
ब गट - प्रवेशिका.
मी काढलेले जलरंगातील हे श्रीगणेशाचे चित्र . मायबोलीकरांना आवडेल ही अपे़क्षा आहे.
सर्वप्रथम श्रीगणेशाचे स्केचिंग करुन घेतले.
त्यानंतर जलरंगाचा वापर करुन चित्र पूर्ण केले .
फोटो रेफरन्स : पिंटरेस्ट साईट
नमो भालचंद्रा नमो एकदंता
गणेशा सुमुखा जनी विघ्नहर्ता
कृपा हो जयाची समाधान चित्ता
गिरीजात्मजा रे नमो बुद्धीदाता
अती साजिरी मूर्ती विघ्नाहराची
रुळे शुंडही, कोर माथा शशीची
प्रभा फाकली नेत्री ती दिव्यतेची
मुसावूनि लाभे गुणानिर्गुणाची
सुवर्णासवे रत्नभारे किरीटी
टिळा शोभलासे विशाळा ललाटी
फडत्कारी कर्णे वरी एकदंती
रुळे शुंड वेधी अती दिव्य कांती
मना निर्मळा हो जरी त्वत्कृपेने
प्रतिष्ठापना भालचंद्रा स्वयेने
अकारे उकारे मकारे मिळोनी
जसा निर्गुणी तू स्वभक्ता सगुणी