खरंतर इथे मला मराठी, महाराष्ट्रातील अ मराठी लोकांच स्थलांतर आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने भारतातील भाषिक विविधता आणि प्रांतवाद ह्याचा विचार करायचा आहे. दोन वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी मनसेच्या माध्यमातून ह्या विषयी आंदोलन केलं आणि बरच रणकंदन माजल होत. हा धुरळा आता खाली बसला आहे. विषय तसा मागे पडला असला तरी विचार करायला आपल्या मनात बरेच प्रश्न ठेवून गेला आहे.
प्रार्थना
प्रार्थना म्हणजे नेमकं काय ? प्रार्थना केल्याने खरोखर देव खुश होतो का?
माझा देवावर पुर्ण विश्वास आहे पण देवाला मी एखादी वस्तु मागितली तर ती वस्तु तो मला कधीच देत नाही (मिळु देत नाही ) आणि एखादि गोष्ट एका प्रयत्नात मिळुन जाते ती गोष्ट मिळण्यासाठी कुठल्या देवाला मी प्रार्थना पण केलेली नसते म्हणुन कधीकधी मनात शंका निर्माण होते की प्रार्थना नावाची काही गोष्ट आहे का नाही?.
प्रार्थना आणि चमत्कार एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. का ? तुम्हाला काय वाटतं !!!!!!!!!!!!
रूपे जराया भयम। अर्थात रुपाला वार्धक्याचे भय असते आणि देवाने तारुण्यात दिलेले रुप आणि सौष्ठव नाहिसे होते म्हणुन मनुष्यालादेखील वार्धक्याचे भय असते. अँटी एजिंग क्रीम्स च्या जमान्यात आज आपल्याला ते असते तर पुराणकालातील ययातीला ते असल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात वर तो गेलेला विषयसुखाच्या आहारी. स्त्रीसुखात रममाण झालेला, स्त्रियांच्या बाहुपाशात राजधर्म विसरलेला, देवयानीसारखी करारी स्त्री पत्नी असुनही राजधर्माची उपेक्षा करणारा. वार्धक्याची भिती वाटण्यासाठी त्याच्याकडे पुरेशी कारणे होती आणि नेमके हेच ओळखुन शुक्राचार्यांनी त्यांच्या मुलीची उपेक्षा केल्याबद्दल त्याला वार्धक्याचा शाप दिला.
अरुणाचलप्रदेश १......."ईशान्यभारत - भारताचा एक दुर्लक्षित भाग"
http://www.maayboli.com/node/34433

दिब्रुगड येथे महालयामध्ये आमची निवासाची व्यवस्था होती. सतत पडणारा पाऊस त्यामुळे बाहेर फिरणे जवळपास अशक्य. वाचन खूप करत होतो. या काळात सर्वात मोठी साथ होती माझा मित्र योगेश झोपेनी दिलेल्या मस्त गाण्याच्या कॅसेट्स व माझ्या आईने घेऊन दिलेल्या कॅसेट प्लेयरनी. ग्रेसच्या कविता आणि जगजितसिंगांच्या गझला ह्या माझ्या नित्याच्या साथीदार बनल्या.
माँ सुनाओ मुझे वो कहानी,
जिसमें राजा न हो न हो रानी,
आपण आपल्या आजुबाजुला बघतो बर्याच अशा गोष्टी असतात की त्यांना बघुन आपल्याला खरोखर वाईट वाटतं आणी आपल्या मनात समाजा विषयी ( त्या गोष्टी , व्यक्ती वगैरे विषयी ) मदत म्हणुन काहीतरी करण्याची इच्छा होते पण आपल्याला नेमक काय करायला पाहीजे ते माहीत नसतं ते माहीती कशी मिळवावी आणी आपण त्या विषयी काय चांगलं करु शकतो ते सुचवा .
इंग्रजी भाषा हल्ली मुलांना प्री - प्रायमरी पासूनच शिकवतात. त्यात सुरुवातीला मुलांना standing लाइन, स्लीपिंग लाइन, अप लाइन, डाऊन लाइन असे करत हळू हळू मुळाक्षरे शिकवतात. अंक काढायला देखील याच मूळ रेषांचा वापर करून शिकवले जाते.
आता समजा A लिहायचा असेल तर मुलांना सांगितले जाते कि आधी एक अप लाइन काढा, नंतर डाऊन लाइन काढा आणि सर्वात शेवटी एक स्लीपिंग लाइन काढा. सगळीच मुळाक्षरे अशाच प्रकारे तुकड्या-तुकड्यात काढायला शिकवले जाते. यात कधी कधी मुले कशी गम्मत करू शकतात ते मला इथे नमूद करावेसे वाटते.
माझे पहिले लेखण
बीड जिल्ह्या सारख्या अविकसित भागात राहून ही तशा पाहता सर्व चांगल्या सुविधा मला माझ्या आई मुळे लहान पणापासून मिळालेल्या. पाहिजे ते सगळ सगळ मिळाल. त्यामुळे काही नसल्यानी काही सोडावं लागत. असतं त्यात भागवावं लागतं. नसण्याचा स्वीकार करत आपल्या जगण्याचा विजय करण्यासाठी भर तारुण्यातील जीवन काळ्या मातीत मळण्यात व उन्हात तळण्यात घालवण्याची वेळ माझ्या वर कधीच आली नव्हती.
लातूरच्या भूकंपाच्या पुनर्वसनाच्या कामात सहभागी होताना निसर्गाच्या कोपामुळे उद्वस्थ झालेले मनुष्यजीवन जवळून पाहता आले.
गावातले लोक कष्टकरी प्रेमानी सर्वाना आपलेसे करी.
रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा. गुंतुनी गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा. म्हणजेच आगळीच दुनीया आहे माझी.
माझी भटकी टोळी त्यातले मिञ पनवेलचा रान वारा "मी आणि माझा कँमेरा."
कणकवलीचे आमदार प्रमोद जठार यांचे एक खुले पत्र...
नमस्कार!
आज एका वेगळ्याच विषय संदर्भात आपणाशी संपर्क साधत आहे. विषय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यसेवा !
अनुवादः सुधीर काळे, जकार्ता
पाकिस्तानी लष्कराने आणि लष्करशहांच्या डावपेचातील दुस्साहसामुळे पाकिस्तान आजच्या स्थितीला पोचला आहे. आज त्याला भेडसवणार्या आतंकवादाच्या पाउलखुणांचा उगम शोधू गेल्यास या पाउलखुणा अफगाणिस्तानच्या पहिल्या ’जिहाद’ युद्धापर्यंत गेलेल्या दिसतील. हे जिहादी युद्ध एक लष्कराच्या प्रेरणेने घडविले गेलेले युद्ध असून या युद्धाने पाकिस्तानला बुद्धिभ्रष्टतेच्या सीमेवर आणून उभे केलेले आहे. या राखेतून कुठलाच फिनिक्स पक्षी जिवंत होणार नसून लष्कराने आपली स्वत:ची विचारसरणी, मानसिकता, स्वत:चा दृष्टिकोन बदलल्याशिवाय पाकिस्तानमध्ये समजूतदारपणाचे पुनरागमन होणे शक्य नाहीं.