१० मे : एक महत्वपूर्ण दिनांक
१० मे १८५७ : पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या उद्रेकाचा पहिला दिवस.खरे तर एकाच वेळी हा उद्रेक घडविण्यासाठी ३१ मे हा दिनांक ठरला होता. पण नवी काडतुसे वापरण्यास नकार देणार्या मिरतमधील ८५ शिपायांना अत्यंत हीन वागणूक देऊन १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावून अंमलात आणल्याने तेथील तुकड्यांचा संयम सुटला. १० मे च्या सकाळीच
मिरत येथील लष्करी छावणीतून ईस्ट इंडिया कंपनीच्या गोर्या ब्रिटिश सैनिकांशी संघर्षाला प्रारंभ झाला. प्रथम त्यांनी आपल्या अटकेत पडलेल्या सहकार्यांना सोडवले आणि त्यानंतर हा वणवा संपूर्ण उत्तर भारतात पसरला.
जन्माने रशियन पण नंतर अमेरिकेचे नागरिक प्राप्त वैज्ञानिक जॉर्ज गॅमो (George Gamow)
यांनी १९३८ मध्ये अवकाशाचे वक्रत्व व अवकाशाची प्रसरणशीलता या सापेक्षतेच्या सिद्धांताशी निगडित
असणाऱ्या कल्पना सर्वसाधारण माणसाला समजणाऱ्या भाषेत कथेच्या माध्यमात सांगण्याचा प्रयत्न केला..या कथेतील तो माणूस म्हणजे बॅंकेत कारकून असणारा सी.जी.एच. टॉमकिन्स हा तरुण ! ही कथा त्यानी हार्पर्स मॅगेझिन या प्रसिद्ध मासिकाकडे पाठवली व पूर्वपरंपरेनुसार ते साभार परत आले..ते मग त्यानी बासनात बांधून ठेवले.
आम्ही जेवायला बसलो होतो. संध्याकाळचे एकत्र जेवण. अस्मादिक, बायको व मुलगा एकत्र जेवायला बसले की एकत्र जेवण असे म्हणायचे. आता एकत्र कुटुंब राहिलेले नसले, तरी जेवण एकत्र असते. पुढच्या पिढीत त्यालाही फाटा फुटेल कदाचित. विविधभारतीवर लागलेल्या "मेरी मा" हे "तारे जमीन पर" ह्या चित्रपटातले गाणे ऐकताना, एकदम माझ्या आठवणीची तार लताच्या "प्रेमा स्वरूप आई" ह्या गाण्याशी जोडली गेली. जेवता जेवता क्षणभर खूप वर्षांपूर्वीचा गोड्या मसाल्याचा तोच घमघमाट नाकात दरवळळ्याचा भास झाला. आई जाऊन बरीच वर्ष लोटली होती.
कुणी तरी म्हटलं आहे जेव्हा शब्द सुचत नाही तेव्हा आपण काही तरी action करून
बोलायचा प्रयत्न करतो..आता तसा अनुभव होत आहे, बोलायचं आहे पण सुरवात कशी करू
सुचत नाही आहे..जे वाटते ते बोलायचं हा प्रयत्न आहे ..
मी खरोखरच २ role play करत आहे ,पण हे सर्व करताना तू किती matter करतो
हे नेहमीच बोलायचं प्रयत्न करते, जमत नाही पण तरीही आज पुन्हा एक प्रयत्न..
माया म्हणजे काय असते..? हे खरच तर तुझ्याशी बोलल्यावरच कळाल, तुम्ही
लोक ज्याला आईचं प्रेम म्हणता न..? ते कदाचित असच असेल हा विचार करून मी
खूप सुखी असते..तेही असच खूप निर्मळ असते का रे..??
विश्वनाथ शंकर सरवदे, मुक्काम पोस्ट आपेगाव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड.
शंकर सरवदे शेळ्या मेंढ्या राखायचे. थोडी जमीन ती पण कोरडवाहू. पांढऱ्या मातीने लिंपलेल्या दोन कुढाच्या खोल्या. विश्वनाथ ऊर्फ तात्या त्यांचा धाकला मुलगा.
ज्योतिबांचा "विद्ये विना मति गेली l मति विना नीती गेली ll नीती विना गति गेलीl गति विना वित्त गेले ll वित्ता विना क्षुद्र खचले l इतके अनर्थ एक अविद्येने केले ll हा विचार गावागावात पोहोंचला. त्यामुळे गावागावात शाळा निघाल्या. गावातील पोर शाळेत जाऊ लागले व शिकू लागले.
आज बर्याच दिवसांनी मायबोली वर आलोय, आणि पाहिलं कि बेफीकीरं यांच सर्व साहित्यं का गायबलं ??
या बाबत अधीक माहीती मिळू शकेलं ?
सत्यमेव जयते
भारताच्या त्रिमुर्ती या राजचिन्हाच्या खाली ’सत्यमेव जयते’ हे वाक्य अंकित केले आहे. या संस्कृत वाक्याचा अर्थ सांगितला जातो, ’सत्याचा विजय होतो’ असा. इंग्रजीमध्ये ’टृथ प्रिव्हेल्स’ असा आहे. या संस्कृत वचनात सत्य आणि जय हे दोन शब्द आहेत. सत्य हे नाम आहे आणि जयचा क्रियापद म्हणून उपयोग केलेला आहे.
सत्य म्हणजे काय? सत्य भूतकाळात असतं कारण ’एखादी घटना घडली’, हे सत्य ती घटना घडल्यावरच अस्तित्वात येते.
वर्तमानात सत्य घडत असतं. सत्याचा भविष्यकाळाशी काही संबंध नसतो कारण जे घडलंच नाही ते सत्य कसे काय असू शकते?
मराठी भाषा नामशेष होईल, मराठी माणसाला खुद्द महाराष्ट्रातच दुय्यम स्थान मिळू शकेल व महाराष्ट्राबाहेरच्या जनतेच्या प्रभावाखाली महाराष्ट्रातील बहुतांशी व्यापार उदीम व इतर क्षेत्रे येऊ शकतील अशी भीती नेहमीच व्यक्त करण्यात येते. प्रत्येकाचे एक अनुभवविश्व असल्याने प्रत्येकाचा एक दृष्टिकोनही असणार व ते समर्थनीय आहेच. मुंबईतील सामान्य नागरीकाला गुजराथी, दाक्षिणात्य व उत्तर प्रदेशी नागरीकांचे वाढते वास्तव्य व प्रभाव बिथरवेल तर कोल्हापूर, सातारा अशा शहरांमध्ये ही अडचण भेडसावणे तुलनेने कमी असेल.
भारताची "अग्नि"परिक्षा (भाग-१)
मूळ लेखक: रॉबर्ट काप्लान
स्वैर अनुवाद: सुधीर काळे, जकार्ता (sbkay@hotmail.com)
१९ एप्रिल रोजी भारताने लांब पल्ल्याच्या प्रक्षेपणास्त्राची यशस्वी चांचणी करून सध्याच्या सुरक्षा परिषदेतील इतर सभासदांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्या "पंक्ती"ला बसायचा सन्मान मिळविला! अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे बनविण्याची क्षमता फक्त पाचच राष्ट्रात आजपर्यंत होती: अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, आणि चीन. आता आपण सहावे असे राष्ट्र झालेलो आहोत. (शिवाय नेहमीप्रमाणे "इस्रायल" हे नांव कंसात असतेच, खरे-खोटे देव जाणे!)