नियम झाकती फ्लेक्स त्यांना सांग तू
या मूळ रचनेवर रचलेले हे काहीच्या काही विडंबन. मूळ गझलकाराची अजिबात माफी न मागता.
------------------------------------------------------------------------------------------------
बेदरकारपणाला मार थोडी टांग तू
चुकवून लाल पळतोस कसा रे सांग तू
जे राखतात कायदा ते आले इथे
नियम झाकती फ्लेक्स त्यांना सांग तू
नियम पाळणारा तू नाहीस हे मी जाणले
आज कुणाला उडवलेस मजला सांग तू
तो कायदा पाळणार्यांस केवळ पावतो
का लावतो आहेस येथे रांग तू
हाकताना गाडी बोलतोस मोबाईलवरी
की झिंगतो आहेस पिऊन भांग तू
उगा काढूनी गाडी कशाला फिरवली