Submitted by बेफ़िकीर on 23 December, 2013 - 12:44
कडवेपणाला मार थोडी टांग तू
देऊ नको इतक्या पहाटे बांग तू
जे लावण्या रचतात ते आले इथे
गझलेत नसतो सेक्स त्यांना सांग तू
माणूस तू नाहीस हे मी जाणले
ब्राह्मण मराठा दलित किंवा मांग तू
तो कष्ट करणार्यास केवळ पावतो
का लावतो आहेस येथे रांग तू
का झिंगतो आहेस ह्या जन्मामधे
की मानतो आहेस ह्याला भांग तू
दमछाक करणारा निघाला शेवटी
चालायला गेलास जो फर्लांग तू
सध्या असा मी वागतो आहे उथळ
सध्या नको लावूस माझा थांग तू
नाकारतो आहेस अस्तित्वास ह्या
की फेडतो आहेस माझे पांग तू
खांदे फुले ताटी चिता अन् आसवे
आतातरी मढवून जा सर्वांग तू
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
सध्या असा मी वागतो आहे
सध्या असा मी वागतो आहे उथळ
सध्या नको लावूस माझा थांग तू
व्वा. शेर फार आवडला.
वाहवा....बहोत खूब.
वाहवा....बहोत खूब.
थाङ्ग व सर्वाङ्ग हे आवडलेत.
थाङ्ग व सर्वाङ्ग हे आवडलेत. बाकीचे ठीकच !
मासरूळकर तुम्ही एडिट
मासरूळकर तुम्ही एडिट करण्यापूर्वीचा तुमचा प्रतिसाद मी वाचला होता बरका ..:फिदी:
सध्या असा मी वागतो आहे
सध्या असा मी वागतो आहे उथळ
सध्या नको लावूस माझा थांग तू
छान आशय.
फक्त तो सध्या दोनदा आल्याने वाचताना उगाच कसंतरी झालं.
"लावू नको आत्ताच माझा थांग तू" हे कसे वाटेल? आशयाला बाधा येत नसावी असे वाटते.
चू.भू. दे.घे.
धन्यवाद वैवकु !
धन्यवाद वैवकु !
>>>माणूस तू नाहीस हे मी
>>>माणूस तू नाहीस हे मी जाणले
ब्राह्मण मराठा दलित किंवा मांग तू>>
हा खूप आवडला सर....
सध्या असा मी वागतो आहे
सध्या असा मी वागतो आहे उथळ
सध्या नको लावूस माझा थांग तू
व्वा व्वा
आशयघन गझल!!! व्वा!!!
आशयघन गझल!!! व्वा!!!
सध्या असा मी वागतो आहे
सध्या असा मी वागतो आहे उथळ
सध्या नको लावूस माझा थांग तू << व्वा >>
नियम झाकणारे फ्लेक्स त्यांना
नियम झाकणारे फ्लेक्स त्यांना सांग तू
माणूस तू नाहीस हे मी
माणूस तू नाहीस हे मी जाणले
ब्राह्मण मराठा दलित किंवा मांग तू
सध्या असा मी वागतो आहे उथळ
सध्या नको लावूस माझा थांग तू
>>
वाह!
रांग आणि सर्वांग आवडले. काही
रांग आणि सर्वांग आवडले.
काही काही अगदीच उगाच वाटले. एवढे शेर का लिह्लेत? (कुणाची तरी आठवण झाली ) म्हण्जे तुम्ही जनरली असं लिहीत नाही म्हणून.
>> >माणूस तू नाहीस हे मी जाणले
ब्राह्मण मराठा दलित किंवा मांग तू
याचा आशय छान आहे. पण मांग हे दलितच अस्तात असं मला वाटतंय. तसं असेल तर थोडा crafted आहे तो शेर.
सुरेख गझल... मास्तर एक शंका
सुरेख गझल... मास्तर
एक शंका :
जे लावण्या रचतात ते आले इथे
गझलेत नसतो सेक्स त्यांना सांग तू
या शेरात असे का लिहिले आहे. कारण लावणी हा काव्य प्रकार शृंगारीक असतो.. पण त्याची थेट "सेक्स" असे वर्णन म्हणजे नेमके काय आणि का? कळले नाही...
माणूस तू नाहीस हे मी
माणूस तू नाहीस हे मी जाणले
ब्राह्मण मराठा दलित किंवा मांग तू >>>> जाती-पातींमुळे माणूसकीचा र्हास झालाय हा भाव सहजतेने
व्यक्त करणारा शेर ...... खूपच छान.
फर्लांग आणि सर्वांग हेही छान वाटले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
जे लावण्या रचतात ते आले इथे
गझलेत नसतो सेक्स त्यांना सांग तू >>> हा शेर मात्र गझलेचे विषय, खयाल, इ. बाबत कन्फ्यूजन निर्माण करणारा वाटला. त्यातून "गझलेत नसतो सेक्स त्यांना सांग तू" हा मिसरा शीर्षक म्हणून वापरला असल्याने गझलेत शृंगार रस वर्ज्य असतो की काय अशी शंका माझ्यासारख्या नवख्या माणसाला येऊ शकते.
माझ्या http://www.maayboli.com/node/46798 या रचनेवार विदिपा यांनी गझलेच्या प्रवृत्तीबाबत
लिहिले आहे. त्याबाबतही मी थोडा कन्फ्यूज आहे.
नवरसांपैकी विशिष्ट रसच गझलेत असावेत किंवा काही रस शक्यतोवर टाळावेत असा प्रघात/नियम्/अपेक्षा
असतात का असाही प्रश्न मनात आला.
'मांग' ते ' सर्वांग' पर्यंतचे
'मांग' ते ' सर्वांग' पर्यंतचे सगळेच आवडले.
आपल्या शेरातिल काफिये कसले बेमालूमपणे समरस होतात शेरांशी ! व्वा !!
मजा आया !
धन्यवाद !
(No subject)
उकाका असा कोणताही गैरसमज करून
उकाका असा कोणताही गैरसमज करून घेवू नका !!
एक बाब अशी की गझलेत सेक्स नसतो मग काय लावणात असतो ? नसतो असेही अगदीच नाही पण असतोच असेतरी कुठे आहे ?
ह्या शेरात सेक्स हा शब्द कीवर्ड आहे तो इंग्रजी शब्दच का वापरला गेला ह्याबद्दलही विचार कारावा लागेल कधी कधी आपल्या भाषेतून एखादी बाब व्यक्त करणे शब्द उच्चारणे जरा ऑकवर्ड वाटले की माणूस इंग्रजी /हिंदी शब्दाचा आधार घेतो..इथे सेक्स ह शब्द वापरण्यामागे हाच सुसंस्कृतपणा आसावा
मुळात ..मरठीत एक लावणीकार आहेत ते हल्ली गझल क्षेत्रातच खूप वावरतात लावण्या कधी करतात आणी फड कधी लागतात ह्यांचे कुणास ठावूक ?.....त्या बाबीचा संदर्भ ह्या शेरात घेतला असावा असा दाट संशय मला आहे
असो
छान गझल !
छान गझल !