गझल...
Submitted by मी मधुरा on 2 December, 2013 - 07:01
तू पाहिले वळूनी, मी थंड-गार झाले
तू चार वार केले, मी पार ठार झाले...
आवार ना कुठेही लाचार भावनांना....
केला विचार मी ही, पृथ्वीस भार झाले....
शोधू कुठे कशाला, माणूस सोबतीला???
माझ्यात गाव आहे, मी सावकार झाले....
झाला पगार नाही, कामे किती करावी???
सोडून नोकरी ती मी ही पसार झाले....
-मधुरा कुलकर्णी.
विषय:
शब्दखुणा: