लोकसत्ता दिनांक २०/०३/२०१० च्या पुणे पुरवणीमधे पुढील माहिती आली ज्यात प्रत्येक वीज उपकरण किती वेळ वापरले असता किती युनिट वीज खर्ची पाडते ते दिले आहे. गरजवंतान्नी या माहितीचा लाभ घेऊन आपापल्या उपकरणांच्या वापरामध्ये योग्य तो बदल्/वेळेतील बचत्/काटकसर करावी या उद्देशाने ही माहिती इथे देत आहे.
याव्यतिरिक्त अजुन कुणास महत्वाचे सल्ले/मार्गदर्शन करायचे असल्यास त्याचेही स्वागत आहे.
मी माझे पुर्वीचे दिवस जे अत्यंत काटकसरीचे होते त्यांची जर आजच्या दिवसांशी तुलना करुन पाहिली तर माझी मला खूपच लाज वाटते! काटकसरीची जी सवय चांगली होती ती जशी जशी प्रगती होत गेली तशी तशी मागे पडत गेली. हल्ली प्रवास, कपडे, ग्रंथालयाचे दंड, विजेचे-पाण्याचे बील, खाणे-पिणे कुठेच मला कपात करता येत नाहीये. पुर्वी बस साठी मी तासंतास ताटकाळत उभा असायचे. हल्ली बस येत नाही आली तर इतर पर्याय मला असतात. हीच गत अनेक माझ्यासोबतच्या मित्रांची आहे. काटकसर ही फक्त पैशाचीच असते असे नाही. जी कुठली गोष्ट जास्त खर्च होते.. नि वाया जाते तिथे तिथे आपण काटकसर करू शकतो.