Submitted by limbutimbu on 23 March, 2010 - 02:28
लोकसत्ता दिनांक २०/०३/२०१० च्या पुणे पुरवणीमधे पुढील माहिती आली ज्यात प्रत्येक वीज उपकरण किती वेळ वापरले असता किती युनिट वीज खर्ची पाडते ते दिले आहे. गरजवंतान्नी या माहितीचा लाभ घेऊन आपापल्या उपकरणांच्या वापरामध्ये योग्य तो बदल्/वेळेतील बचत्/काटकसर करावी या उद्देशाने ही माहिती इथे देत आहे.
याव्यतिरिक्त अजुन कुणास महत्वाचे सल्ले/मार्गदर्शन करायचे असल्यास त्याचेही स्वागत आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला मोठी इमेज देता येत नाहीये
मला मोठी इमेज देता येत नाहीये तसेच लोकसत्तातील अर्काईव्ह मधुन लिन्क शोधता येत नाहीये
कृपया कुणी लिन्क देऊ शकले तर अधिक बरे होईल
http://loksatta.com/index.php
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=56115:2...
धन्यवाद अरुन्धती पुढील मजकुर
धन्यवाद अरुन्धती
पुढील मजकुर लोकसत्तातुन कॉपी-पेस्ट
उपकरण वीज वापर १ युनिट विजेसाठी
(वॅट्स) लागणारा वेळ
बल्ब २५/४०/६० ४०/२५/१६ तास
झिरो बल्ब १०/१५ १००/६६ तास
टय़ूब ३६ २७ तास ४७ मिनिट
सीएफएल १०/१२ १००/८३ तास
पंखा ३६ इंची ३० ३३ तास २० मिनिटे
४२ इंची ६० १६ तास ४० मिनिटे
एअर कुलर ११५ ८ तास ४२ मिनिटे
वातानुकुलित
यंत्र १ टन १५०० ४० मिनिटे
१.५ टन १८०० ३३ मिनिटे
फ्रिज १६५ लिटर १०५ ९ तास ३१ मिनिटे
३०० लिटर १२५ ८ तास
मिक्सर, ब्लेंडर, व
ज्युसर ४५० २ तास १३ मिनिटे
बेल ७५० १ तास २० मिनिटे
टोस्टर ८०० १ तास १५ मिनिटे
इलेक्ट्रिक ओव्हन १२०० ५० मिनिटे
मायक्रोवेव्ह ओव्हन १८०० ३४ मिनिटे
इस्त्री
(कमी वजनाची) ४५० २ तास १३ मिनिटे
(जड) ७५० १ तास २० मिनिटे
गिझर
१-२ लिटर क्षमता ३००० २० मिनिटे
१५-१७ लिटर २००० ३० मिनिटे
टीव्ही १००/२०० १०-५ तास
व्हीडिओ कॅसेट २५ ४० तास
स्टीरिओ सिस्टीम ५० ते ३००० २० तास ते २० मि.
वॉशिंग मशिन (ड्रायरसर) ४०० २ तास ३० मिनिटे
(वॉटर हिटरसह) ९०० १ तास ६ मिनिटे
(ड्रायरशिवाय) २३० ४ तास २० मिनिटे
व्हॅक्यूम क्लिनर ९५० १ तास
थोडक्यात काय तर बचत करायची
थोडक्यात काय तर बचत करायची असेल तर वीजेच्या उपकरणांचा कमीत कमी वापर करावा
थोडक्यात काय तर बचत करायची
थोडक्यात काय तर बचत करायची असेल तर वीजेच्या उपकरणांचा वापर न करावा
वीज बचतीचा मंत्र : माठाचे
वीज बचतीचा मंत्र : माठाचे पाणी प्या, ए.सी./ कूलर ऐवजी वाळ्याचे पडदे लावा, हाताने कपडे धुवा (तेवढेच शरीराचे तापमान कमी राहील व पाण्यात खेळता येईल), थंड पाण्याने आंघोळ करा, सायंकाळी बाहेर बागेत, फिरायला गेलात तर तेवढीच वीज वाचेल. रात्री फ्रीज अनेकांकडे बंद करण्याची प्रथा असल्याचे ऐकले होते!
आणि सर्व प्रकारचे शीतोपचार करून आपले तापमान थंड ठेवा!
रात्री फ्रीज अनेकांकडे बंद
रात्री फ्रीज अनेकांकडे बंद करण्याची प्रथा असल्याचे ऐकले होते >> याने उलट खर्च वाढतो असा ऐकुन आहे, कारण compressor पुन्हा functional व्हायला जास्ती वीज जाते. खरेखोटे माहित नाही...
बाकी, वीज बचतीचा मंत्र आवडले. धन्यवाद, लिम्बुभाव आणी अरुन्धती
रात्री फ्रीज अनेकांकडे बंद
रात्री फ्रीज अनेकांकडे बंद करण्याची प्रथा असल्याचे ऐकले होते >> हा हा हा! त्याने काय होणार? सकाळी पुन्हा चालु केला कि पुन्हा टेंपरेचर मेंटेन करायला जास्त वीज लागणार. हो, पण पुण्यात काही वेगळे होत असेल तर कल्पना नाही बुवा!
फ्रीज चा दरवाजा खुप वेळ उघडा ठेवु नये/ वारांवार उघडझाप करु नये!
इथे घर भाड्याने घेतले. सगळे
इथे घर भाड्याने घेतले. सगळे ट्रॅडिशनल बल्ब बदलुन सीएफेल चे दिवे लावले. ६० वॅट च्या एक बल्ब एका खोलीत असल्यापेक्षा ऐवजी १४ वॅट चे पाच बल्ब पाच ठिकाणी लावले. (एकाच खोलीत पाच दिवे नाही लावले. :))
फ्रीज्च सेट्टिंङ लो वर
फ्रीज्च सेट्टिंङ लो वर ठेवा.
ऑन ऑफ करण्याची करज नाहिये. कॉम्प्रेसर ऑटो ऑन ऑफ होइल.
सीएफएल मात्र चांगलीच बचत करतात. दीड-दोन वर्ष टिकतात त्यांमुळे तेच वापरावेत.
सी एफ एल घोळाचा प्रकार.एक तर
सी एफ एल घोळाचा प्रकार.एक तर किम्मत जास्त. वाचवणार्या विजेतून त्याची किम्मत वसूलव्हाय्वी असा युक्तीवाद. पण तेवढे ते टिकत नाहीत. त्याची काच एकसारखी नसते. कुठेतरी क्रॅक जातो. दुसरे होल्डरमध्ये आडवे फिरवण्यासाठी जे अॅल्युमिनियमचे नोड असतात ते लवकर तुटतात. त्यामुळे न गेलेला बल्ब होल्डरमध्ये बसवता येत नाही.सी एफ एल हा पोइन्ट सोअर्स असल्याने प्रकाश पसरत नाही त्यूबसारखा. वाचायला त्रास होतो. व्हरा.न्ड्यात वगैरे ठीक. पण टुबसारखा प्रसन्न उजेड वाटत नाही.
>> फ्रीज चा दरवाजा खुप वेळ
>> फ्रीज चा दरवाजा खुप वेळ उघडा ठेवु नये/ वारांवार उघडझाप करु नये!
>> फ्रीज्च सेट्टिंङ लो वर ठेवा.
बरोबर!
>> CFL ... कुठेतरी क्रॅक जातो. ... त्यामुळे न गेलेला बल्ब होल्डरमध्ये बसवता येत नाही.
आम्हाला काही असा अनुभव नाही.. कुठल्या कंपनीचे घेता?
>> सी एफ एल हा पोइन्ट सोअर्स असल्याने प्रकाश पसरत नाही त्यूबसारखा.
हे खरंय... पण आता CFL च्या ट्युबपण मिळतात... अगदी बारीक, दिसायला मस्त असतात.
आता CFL हुन चांगले LED दिवेपण आलेत.
CFL खरंच खुप वीज वाचवतात.
CFL खरंच खुप वीज वाचवतात. माझ्या घरी विजेच्या बिलात ह्या वेळी जवळ जवळ १५०-१७५ रुपये कमी झालेत.
कुठल्या कंपनीचे
कुठल्या कंपनीचे घेता?
फिलिप्स, ओसराम इ.