मोजमाप कौशल्याचे
चांगला बाजारभाव असणारे एखादे कौशल्य स्वत:मधे निर्माण करणे, असलेले अद्यतन करणे हा आर्थिक समृद्धी खात्रीने वाढवण्याचा मार्ग आहे.पण हे करताना आपल्या कौशल्याचा स्तर कोणता आहे हे मोजता आले तर? म्हणजे समजा क्ष नावाची व्यक्ती आहे. ती संगीताच्या क्षेत्रात गाण्यांना चाली लावण्याचे काम करते त्याशिवाय तीच व्यक्ती चित्रकारही आहे, तीच व्यक्ती गायकही आहे असे समजू. आता गाण्यांना चाली लावतो म्हणजे तो संगीतकार आहे. पण त्याची लेवल किंवा स्तर किती आहे याचे नेमके मापन कसे करणार? म्हणजे तो ए.आर. रहमानच्या तोडीचा संगीतकार आहे की अनु मलिकसारखा बाजारात मागणी ते पुरवू वाला संगीतकार आहे? हे कसे मोजणार?