माझ्या एका मित्राची मुलगी सध्या इयत्ता बारावीत आहे, पुढे तिला एम बी बी एस करायचे आहे. post graduation करून न्युरो सर्जन व्हायचे आहे. त्यांचा सध्याचा प्लान असा आहे की तीने एम बी बी एस जर्मनी/ इंग्लंड युरोपीय देश मध्ये करावे, आणि पी जी अमेरिका/कॅनडा इथे करावे. त्यासाठी पुण्यात अशा कोणत्या संस्था आहेत ज्या अशा मुलांना बाहेर जायला सर्व मार्गदर्शन करतात? मला त्यांचे संपर्क हवे आहेत किंवा त्या कशा शोधू ते मला कुणी सांगू शकेल का? शिवाय मला खालील माहिती हवी आहे.
अफवा
असते झटकन पसरणारी
हातपाय नसलेली अफवा,
होत्याचं नव्हतं करणारी
गैरसमज पसरवते अफवा !
अंधश्रद्धेला कारण होते
दंगल घडविते ती अफवा,
बऱ्याचदा स्वार्थासाठीच
पसरविली जाते अफवा !
मुलांची चोरी, देव देवस्की
म्हणणारी खोटीच अफवा,
मना मनात किंतु परंतू व
केवळ भ्रम वाढवी अफवा !
निरपराधाचा जीव घेणारी
पसरू देऊ नका अफवा,
वेळीच करून सर्व खात्री
मोडूनच काढा या अफवा !
©शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९
मानवीय समाजामध्ये विचारधारा हि लहानपणा पासून रेखाटली जाते, यामध्ये त्या निरागस चेहऱ्याचा काहीही दोष नसतो. कोणाचे विचार कितपत योग्य किंवा वाईट आहे याचे मापदंड नको ठरवायला. भारतामध्ये सद्या ‘लाल सलाम’ च्या घोषणा जोर-जोरात सुरु आहे आणि JNU च्या प्रसंगा नंतर त्याला अत्त्याधिक पाठिंबा मिळाला . यामध्ये सर्वाधिक हे विध्यार्थी दशेतील तरुण होते. ते नैसर्गिकच आहे कारण जेव्हा पण मार्क्स यांचं नाव ऐकायला येते तेव्हा धमन्यांतील रक्त खळवंडल्या शिवाय राहणार नाही . मार्क्स यांचं व्यक्तिमत्व अत्त्यंत प्रभावशाली आणि संघर्ष्याच्या लेखणी मधून उभरून आलय.
आजकालची लहान लहान मुले भलतीच स्मार्ट, आपण त्या वयात होतो तेव्हा आपल्याला जितकं कळत होतं त्याच्या पाच पावलं पुढे आजची पिढी आहे. त्यांना असलेल्या शंकाना, प्रश्नांना उत्तरे देताना आपलयालाच नाकीनऊ येतात. प्रत्येक वेळेस मुलांना एखादा विषय सोप्प्या आणि समजणार्या उदाहरणातून शिकवणारे शिक्षक पण आजकाल कमी होत चालले आहेत. अशा वेळेस आपल्यालाच पालक म्हणून ही जबाबदारी उचलावी लागते. मुलांना शिकवता शिकवता अनेक गोष्टी आपण सुद्धा शिकत असतो. एखादी संकल्पना, विषय शिकवताना आपल्याला अनेकदा सोप्प्या पद्धती सापडतात ज्या कोणत्याही पुस्तकात, पाठ्यक्रमात दिलेल्या नसतात.
सकाळी 7 चा मोबाईल गजर वाजला विवेक ने डोळे बंद ठेवूनच तो बंद केला ह्याला कला म्हणावी की सवय पण ठीक आहे ना माणूस वेळेवर काम करू लागला. विवेक उठला मोबाईल घेतला आणि त्याला सलाईन लावायला घेऊन गेला म्हणजे चार्जिंग ला माणूस एक वेळेस स्वतः पाणी पिण्याचे विसरेल पण मोबाइल ला चार्जिंग लावायला नाही.
आज संकष्टी म्हणून
उपवास होता बिचाऱ्याचा
गर्लफ्रेंडच्या किसमुळे
मोडला तो जर
काय दोष आता त्या
समुद्र किनाऱ्याचा
दोस्ताची पार्टी म्हणून
दोन पेग ज्यादा मारले
गळ्यात गळे घालून
नंगे फोटो व्हायरल झाले
इज्जतीचा पंचनामा करून
आता रे पोलिसांचे पाय धरले
पॉकेटमनी पुरेना म्हणून
भुरटेगिरी सुरु केली
सीसीटीव्हीत पकडला तेव्हा
बोलती का रे तुझी
अशी बंद झाली
नमस्कार मंडळी
मैत्रीची सुरुवात मेळघाटातल्या कुपोषण निर्मूलन आणि आरोग्य विषयक कामांपासून झाली असली तरी गेली काही वर्षे आपण मेळघाटातल्या शाळा आणि मुलांचे शिक्षण सातत्य या मुलभूत बाबींकडे आवर्जून लक्ष पुरवत आहोत.