माझेच मी
Submitted by डॉ अशोक on 1 October, 2013 - 03:14
माझेच मी
कुणी भेटता, ठाव माझेच मी विचारतो
शहरात या, नाव माझेच मी विचारतो !
*
असा दूर आलो कळेना कुठे पोहोचलो
प्रवासात या, गाव माझेच मी विचारतो !
*
काढले विकाया, माझेच सर्वस्व मी
लिलावात या, भाव माझेच मी विचारतो !
*
तो बैसला समोरी, हार माझी नक्कीच आहे
शत्रूस या, डाव माझेच मी विचारतो !
*
जायबंदी शरपंजरी शेवटी युद्धात मी
किती जाहले, घाव माझेच मी विचारतो !
-अशोक
विषय:
शब्दखुणा: