Submitted by डॉ अशोक on 1 October, 2013 - 03:14
माझेच मी
कुणी भेटता, ठाव माझेच मी विचारतो
शहरात या, नाव माझेच मी विचारतो !
*
असा दूर आलो कळेना कुठे पोहोचलो
प्रवासात या, गाव माझेच मी विचारतो !
*
काढले विकाया, माझेच सर्वस्व मी
लिलावात या, भाव माझेच मी विचारतो !
*
तो बैसला समोरी, हार माझी नक्कीच आहे
शत्रूस या, डाव माझेच मी विचारतो !
*
जायबंदी शरपंजरी शेवटी युद्धात मी
किती जाहले, घाव माझेच मी विचारतो !
-अशोक
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डॉ. अशोक, कविता छान आहे,
डॉ. अशोक,
कविता छान आहे, विषय कुठुन सुचला ?
खूप छान.... तुम्हालाही 'च'
खूप छान....
तुम्हालाही 'च' आवडतो का?
मला वाटत होतं..मलाच आवडतो.
सह्हीये - खूप आवडली ...
सह्हीये - खूप आवडली ...
धन्यवाद मंडळी ! जय
धन्यवाद मंडळी !
जय जोशी:
आवडायचं काय? ठीक वाटलं ठेवलं. ह्या "च" वरचा आचारय अत्र्यांचा किस्सा माहित आहे कां?
अय्या छान'च'!!!
अय्या छान'च'!!!