कॅसेला नॅशनल पार्क, मॉरिशिअस
Submitted by रंगासेठ on 30 September, 2013 - 11:00
नुकतेच मॉरिशिअस येथील कॅसेला नॅशनल पार्कला भेट दिली. इथे अनेक प्रकारचे पक्षी आहेत. विविध प्रजातींच दर्शन आपल्याला घडतं. नॅशनल पार्क अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध आहे. इथे प्रवेश फी ३००/मॉरिशिअन रुपये प्रतिव्यक्ती आहे. आत गेल्यावर आपल्याला विविध पक्ष्यांच दर्शन सुरु होतं. अगदी आरामात मनसोक्त फिरता येतं.
इथे अॅडवेंचर स्पोर्ट्स पण आहेत. झिपलाइन+ बर्मा ब्रिज, वॉक विथ लायन्/टायगर, मिनी सफारी आणि मड बाइक सारखा एक प्रकार असे पर्याय आहेत. त्या त्या प्रकारानुसार चार्जेस आहेत. आम्ही फक्त झिपलाइन केलं.
या प्रत्येक प्रकारात आपल्याला फोटोपण काढून मिळतात, आधिक चार्जेस देऊन.
विषय:
शब्दखुणा: