सर्व छोट्यांच्या पत्रांना - बाप्पांकडून एक खास उत्तर -
Submitted by पुरंदरे शशांक on 13 September, 2013 - 01:44
बाप्पांकडून एक खास पत्र -
त्याच्या सार्या लाडक्या छोट्या दोस्तांना -
बाप्पांना सगळ्या छोट्यांनी लिहिलेली पत्रे फार फार आवडली. मग ते उंदीरमामाला काय म्हणाले -
गोड गोड ही पिल्ले सगळी
लिहिती झाली कशी पहा
गोड गोड पत्रातील गोष्टी
ऐक जरा उंदीरमामा
चला उठा हो मामा तुम्ही
झटकन व्हा तय्यार कसे
जाऊ घराघरामधुनि अन्
पत्र वाचुया सुंदरसे
जगामधील प्रश्नांची सार्या
उकल हवी रे "अवनीश"ला
एक गोडुली हाका मारे
किती मस्त वाटे "गणुल्या"
"ऋचा" विचारी कसा असशी रे
भातुकली ती देऊ तिला
आवडते का चिज मूषका
विषय:
शब्दखुणा: