बाप्पांकडून एक खास पत्र -
त्याच्या सार्या लाडक्या छोट्या दोस्तांना -
बाप्पांना सगळ्या छोट्यांनी लिहिलेली पत्रे फार फार आवडली. मग ते उंदीरमामाला काय म्हणाले -
गोड गोड ही पिल्ले सगळी
लिहिती झाली कशी पहा
गोड गोड पत्रातील गोष्टी
ऐक जरा उंदीरमामा
चला उठा हो मामा तुम्ही
झटकन व्हा तय्यार कसे
जाऊ घराघरामधुनि अन्
पत्र वाचुया सुंदरसे
जगामधील प्रश्नांची सार्या
उकल हवी रे "अवनीश"ला
एक गोडुली हाका मारे
किती मस्त वाटे "गणुल्या"
"ऋचा" विचारी कसा असशी रे
भातुकली ती देऊ तिला
आवडते का चिज मूषका
"श्रिया" विचारी खास तुला
"प्रांजल"कडचा सिक्रेट खजिना
कधी कधी कळणार मला ??
टेंपल पाशी पोहचवू रे
एकच काय रे साव्वेळा
"मिहिका" म्हणते सोडव बाबा
समस्याच सगळ्या सगळ्या
शाणी मुल्गी व्हायचे आहे
मदत करु रे चला चला
"आयाम" शाणा आवडतो रे
चॉकलेट घे ते एक जरा
सांगू आईला त्याच्या पण रे
गोड गोडसे डांट जरा
"चैतन्याची" पाटी भारी
डोंगर सायकल कस्ली रे
दादापेक्षा मोठे व्हावे
लहानपण मज आठवे रे
नकोय काही "नचिकेत"ला
झाडांचे किती प्रेम असे
कार्तिकेयची आठवण काढी
गुणी लेकरु गोड दिसे
नको होऊ गं सॅड "सानिका"
दोस्त असे मी कायमचा
जेव्हा दंगा, मज्जा करता
देव्हार्यातूनी हसायचा
थेऊरला तू आली होती
"श्रिया" गोडुली आठवते
स्पर्धा गोष्टींची बघण्याला
चला मामा निघू कसे
बुगाटीतुनी चक्कर मारु
सांगतसे "जय" पहा कसा
सीट कव्हर तू फाडू नको रे
सोड मूषका द्वाडपणा
शेअर करुया म्हणते "छोटी"
मला विचारी काय हवे
आवडतो मी किती तुला ते
पत्रातून मज जाणवते
उंदरावरती स्वार तुम्ही का
"तन्मया"स ते प्रश्न किती
रथातूनी का घरी जातसे
वाट पहाते मम्मीच ती
त्रास नाही ना झाला काही
गुणी किती हा अदूदादा (अद्वैत)
कार, बुद्धी नि शक्ति पाहिजे
ग्रेट आयुष्याचा वादा
चॉकलेटचे झाड हवे अन्
आईस्क्रीमचे "श्रावणी"ला
अडचण येता कुणालाही का
दूर करा म्हणते मजला
मुलेच झाली शाणी सगळी
छान छान लिहितात पहा
मोदक - आरती नकोच काही
खूप आवडे पत्र अहा ....
तुम्हा सर्व छोट्या दोस्तांचा,
गणुल्या .....
गणपति बाप्पा मोरया | धमाल पत्रे वाचूया ......
व्वा!
व्वा!
कसलं सुंदर
कसलं सुंदर
मस्त
मस्त
शेवटच्य दिवशी टाका ना हे
शेवटच्य दिवशी टाका ना हे
अजुन बरीच पत्रं येतील
अजुन बरीच पत्रं येतील >>>>
अजुन बरीच पत्रं येतील >>>> त्यांनाही यथायोग्य (व वेळीच) उत्तरे पाठवण्यास श्री समर्थ आहेत, तस्मात काळजी नसावी .....
वा सुंदरच.. ते ते कडवे त्या
वा सुंदरच.. ते ते कडवे त्या त्या बीबीवर टाकले तर छानच !
व्वा!! मस्त्.
व्वा!! मस्त्.
खुप गोडं लिहिलय हे मगाशी
खुप गोडं लिहिलय
हे मगाशी सांगायचं राहिलेलं
फार गोड, चांगली पोच आहे
फार गोड, चांगली पोच आहे पत्रांची
एकदम मस्त
एकदम मस्त
बाप्पांनी पत्रांचं उत्तर
बाप्पांनी पत्रांचं उत्तर पाठवलं तुमच्याकरवी हे फार बरं झालं
अरेव्वा! बाप्पातर्फे उत्तरही
अरेव्वा! बाप्पातर्फे उत्तरही आलं का? मस्त झालीये कविता.
संयोजक, ही कविता गणेशोत्सवाच्या गृपमध्ये हलवा, प्लीज.
अतिशय सुंदर आंणि गोड
अतिशय सुंदर आंणि गोड
कित्ती गोड!
कित्ती गोड!
खुप गोडं लिहिलय
खुप गोडं लिहिलय
बाप्पांनी पत्रांचं उत्तर
बाप्पांनी पत्रांचं उत्तर पाठवलं तुमच्याकरवी हे फार बरं झालं>> अगदी अगदी.. किती गोड उत्तर दिलंय..
अरे वा! बाप्पाने पत्राला
अरे वा! बाप्पाने पत्राला उतर. पाठवल की
कस्लं मस्तय उत्तर... थेट
कस्लं मस्तय उत्तर... थेट बाप्पाकडून... वा!
बाप्पाकडुन एकदम मस्तच उत्तर
बाप्पाकडुन एकदम मस्तच उत्तर की
मस्त!
मस्त!
क्यूट उत्तर आहे.
क्यूट उत्तर आहे.
मस्त कल्पना!
मस्त कल्पना!
(No subject)
घ्या नचिकेत आणि चैतन्या -
घ्या नचिकेत आणि चैतन्या - तुम्हालाही उत्तर पाठवलंय हं बाप्पाने ....
शशांक, किती गोड कल्पना सुचली
शशांक, किती गोड कल्पना सुचली तुला...सह्ही!!!!
सर्व छोटु आणी मोठू सुद्धा खुश झालेत ही कविता वाचून
मस्त !
मस्त !
प्रांजल :- बाप्पा ,माझा
प्रांजल :- बाप्पा ,माझा खजाना माझ्या पत्राखाली दाखवला आहे. लवकर बघायला ये.
http://www.maayboli.com/node/45128?page=1#comment-2869226
अरे... प्रत्त्येक पत्राला
अरे... प्रत्त्येक पत्राला लगेच ऊत्तरही आले.... बाप्पा फारच प्रसन्न दिसताहेत... लगे रहो बाप्पा..
पुरंदरे शशांक किती गोड कल्पना
पुरंदरे शशांक
किती गोड कल्पना सुचली तुम्हाला! प्रत्येक पिल्लाची पत्रे नी मागण्या वाचून मजा आली.
खुपच सुंदर!!!! मनापासुन
खुपच सुंदर!!!!
मनापासुन आवडलं.
फार गोड, चांगली पोच आहे पत्रांची >>>>>+१
Pages