स्विस सहल - भाग २/४ हैदीलँड, वडुझ एका चिमुकल्या देशाची राजधानी
Submitted by दिनेश. on 3 September, 2013 - 02:42
वडुझ हि Liechtenstein देशाची राजधानी. हा देश अगदी चिमुकला. इथे जायला वेगळा व्हीसा लागत नाही.
तूम्हाला हवा असल्यास पासपोर्टवर त्या देशाचा शिक्का मारून देतात.
हा देश स्वित्झर्लंड पासून स्वतंत्र आहे. अजूनही इथे राजघराणे आहे, त्यांचा मोठा राजवाडा उंचावर आहे आणि त्याची प्रतिकृती खाली आहे.
इथेच छोटीशी टॉय ट्रेनही आहे पण रेल्वे स्टेशन मात्र २ किमीवर आहे. एक चर्च, काही प्रशासकीय इमारती, म्यूझियम, पार्किंग लॉट एवढाच पसारा. पण आहे ते अत्यंत देखणे. इथल्या इमारतीत सरळ रेषांचा वापर जास्त आहे. त्या वेगळेपणामूळे त्या खासच भासतात.
विषय: