तीन वर्षा पुर्वी वेल्हा तालुक्यातील केळद गावात पुण्या-मुंबईतील काही मायबोलीकर भटके एकत्र भेटले होते. निमित्त होते पहिल्यावहिल्या सह्यमेळाव्याचे... केळदच्या शाळेत जुळलले ते ऋणानुबंध आज इतके घट्ट झाले आहेत की, सगळी वैयक्तीक कारणे बाजूला सारुन हे अट्टल भटके आपल्या सह्यगड्यांना भेटायला दरवर्षी आवर्जून एकत्र येतात. हो पण या दर्या खोर्यात रमणार्या मित्रां मधे 'फरश्या जोशी' सारखा एखादा टांगारू हा असतोच...
रसाळगड – सुमारगड – महीपतगड – हातलोट घाट
बहुदा कधीतरी २-३ दिवसांपूर्वी ट्रेक सुरू केलेला असावा...
जीवाभावाच्या मोजक्या ट्रेकमित्रांसोबत दणकट चढ-उतार करत, सह्याद्रीमध्ये कुठेतरी खोलवर दुर्गम भागात पोहोचलेलो..
चेहरा रापलेला-कपडे घामेजलेले-सॅक मळलेली, कुठून आलो-कुठे चाललोय असल्या शुल्लक गोष्टींचं भान असायची गरज नाही..
मध्येच एखाद्या खट्याळ रानपाखराच्या शीळेचा आवाज मोहवून टाकतोय..
आता, जांभूळ-गेळा-हिरडा अश्या दाटीमधून आणि कारवीच्या उंचच उंच झुडुपांमधून वळणं-वळणं घेत वाट जलद धावतीये..
दाट झाडीतून वाट अवचितंच धारेपाशी येते, अन् सामोरा येतो एक स-ण-स-णी-त पॅनोरमा..