भूषण इनामदार

फूड स्टायलिंग आणि भूषण

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

भूषण इनामदार हे नाव तीन वर्षांपूर्वी कधीतरी फेसबुकावर वाचलं होतं. कुठल्या तरी पानावर आईस्क्रीमचा एक अफलातून फोटो होता आणि त्या फोटोखाली ’स्टायलिंग - भूषण इनामदार’ असं लिहिलं होतं. इतकं उत्तम फूड स्टायलिंग करणारं कोणी पुण्यात असेल, याची त्यावेळी कल्पना नव्हती. फोटोखाली दिलेल्या नंबरावर मग त्याला एसएमएस पाठवल्याचं आठवतं. पुढे पाचसहा महिन्यांनी फूड स्टायलिंगबद्दल एखादा लेख लिहावा, असं डोक्यात आलं आणि भूषणची आठवण झाली. भूषणला भेटलो. त्याच्याबरोबर त्याच्या तीनचार शूटना गेलो. तो काम कसा करतो, हे पाहिलं. शूट सुरू असताना त्याची प्रचंड धावपळ सुरू होती.

प्रकार: 
Subscribe to RSS - भूषण इनामदार