मन.

आतला आवाज

Submitted by राहुल नरवणे. on 3 July, 2013 - 09:19

स्वतः शी जेव्हा होते युद्ध,
तेव्हा चवताळलेला प्रतीयोद्धा
करतो जो आवाज …

आतून अडकलेल्या ‘मी’ ला,
बाहेर काढण्यासाठीची साद . .

पांढऱ्या शुभ्र दिसण्याऱ्या निर्जीव
राखेतील आग . . .

मुक्या आणि घुसमटलेल्या प्रवृत्तीच्या
मन: पटलावरची हालचाल . .

प्रचंड गर्दीत, लोकलच्या प्रचंड खडखडात,
असह्य वातावरणात सुचलेलं गाणं,
अन ओठांची आपसूक हालचाल .

भरमसाठ रंगांनी ओरबडलेल्या,
माखलेल्या कॅनवास वरचा
आवडत्या रंगाचा एकच स्ट्रोक …

प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - मन.