बृहन महाराष्ट्र मंडळ २०१३ उभ्या उभ्या विनोद...
Submitted by परदेसाई on 1 July, 2013 - 10:07
तारीख/वेळ:
6 July, 2013 - 09:30 to 10:30
ठिकाण/पत्ता:
बृहन महाराष्ट्र मंडळ अधिवेशन ..प्रॉव्हिडंस.. २०१३
उभ्या उभ्या विनोद ला नक्की यायचं हां.....
?: पहाटे, ९:३० ला? हसण्यासाठी?
मला माहीत आहे.. एवढ्या सकाळी मनुष्य वैतागलेला असतो. पण म्हणूनच हसण्याचं आमंत्रण देतोय..
?: पण ९:३० ही काय हसण्याची वेळ आहे का?
खरं तर हॉटेलमधून कसं बसं निघून पोहे/भजी शोधण्याची वेळ आहे. पण सोबत विनोदाची फोडणी...
?: पण तुमचे आधीचे विनोद ऐकलेत हो मी..
पण आता नवीन विनोद सांगतोय ना.. आधीच्या कार्यक्रमातला एकही विनोद नसतो...
?:पण मुलांचं काय कर? ट्यांना मरहाटी कळट नाही फार..
त्यांच्यासाठी इंग्रजी विनोदाची खास सोय आहे हो..
माहितीचा स्रोत:
उ उ वि माध्यम प्रायोजक
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
शेअर करा