गाण्यांच्या अनुषंगाने अधिक माहिती
Submitted by गजानन on 8 May, 2013 - 13:19
'सख्या रे घायाळ मी हरिणी' हे गाणं रेकॉर्ड करायच्या आधी लतानं ते फक्त एकदाच ऐकलं होतं म्हणे. ऐन रेकॉर्डींगच्या दिवशी दुसर्या एका गाण्याचे रेकॉर्डींग लांबल्यामुळे त्या या गाण्याच्या रेकॉर्डींगला येऊ शकल्या नाहीत. पण तोपर्यंत तुम्ही हे गाणं दुसर्या गायकाच्या आवाजात रेकॉर्ड करा (तात्पुरते म्हणून) असे त्यांनी संगीतकारांना कळवले. म्हणून मग ते रवींद्र साठ्यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले. त्यानंतरच्या ठरलेल्या दिवशी लता मंगेशकर रेकॉर्डींगला आल्या. तोपर्यंत त्यांनी हे गाणं किंवा त्याची चाल अक्षरशः एकदाही ऐकली नव्हती. आल्यावर त्यांनी ते गाणं आपल्या अक्षरात लिहून घेतलं.