पक्ष्यांनी तर उंच उडावे
क्षिती नसावी पडण्याची
अन भीती नसावी आभाळाची
डोळ्यांमधल्या स्वप्नांसाठी
पक्ष्यांनी तर उंच उडावे
पिंजरे सगळे तॊडून टाकून
दाणे पेरू मागे सोडून
नजर लावूनी निळ्या नभांवरी
पक्ष्यांनी तर उंच उडावे
कुणी क्वचित मेघांत हरवतील
इंद्रधनूच्या पारही जातील,
ना जावे तर कसे कळावे
पक्ष्यांनी तर उंच उडावे
शोध नव्हे हा आभाळाचा
शोध पंखांतील बळाचा
गंगनभरारी घेताना पक्ष्याने स्वतःला तोलावे
पक्ष्यांनी तर उंच उडावे
झेप
मनाचे धागे
स्मृतीच्या वाटा
आठवणीची ठेवण
हृदयाचा कंप
लेखणीच्या ठशांनी
ही टंकलेखनाची तडतड
आणि संगणकाची झेप
अंतरांच्याहि पलीकडे जात आहे.
उषा महिसेकर
झेप
मनाचे धागे
स्मृतीच्या वाटा
आठवणीची ठेवण
हृदयाचा कंप
लेखणीच्या ठशांनी
ही टंकलेखनाची तडतड
आणि संगणकाची झेप
अंतरांच्याहि पलीकडे जात आहे.
उषा महिसेकर
दुःख गोंजारायला
आता उसंत नाही
अंत आरंभाआधी
मला पसंत नाही
शुष्क गात्रांत आता
तेज आगळे वाही
स्वप्न नव्या उद्याचे
खुल्या लोचनी पाही
डोळ्यात थेंब सुखाचे
पंखात झेप उद्याची
गगन भरारीसाठी
भीती कशा कुणाची ?
पसरले पंख मी
झेप घेण्या नभी
पाश मोडुनी जुने
कात टाकुनी उभी
वनिता