लाईफ ऑफ पाय
Submitted by डॅफोडिल्स on 10 December, 2012 - 18:09
लाईफ ऑफ पाय चा ट्रेलर पाहिल्या पासुन फार उत्सुकता होती. ‘पाय’चे पाण्यातील प्रवासाचे रंजक अनुभव बघायला म्हणून पहिल्याच आठवड्यात लगेचच थ्रीडी पाहिला. नॉट वर्थ ! थ्री डी नसता तरी चालला असता.
समुद्रावरची काही दृष्य फार उत्तमरित्या चित्रीत केली आहेत. चित्रीकरण चांगले आहे. प्राण्यांबरोबरची तसेच इतरही दॄष्ये टेक्नीकली किती खरे किती खोटे सांगता येत नाही.
यान् मार्टेल च्या लाईफ ऑफ पाय या पुस्तकावर आधारीत कथानक आहे. मी पुस्तक वाचले नाहिये. पण चित्रपट ठिकठाक आहे. इरफान खान, तब्बु, सुरज शर्मा सारख्या भारतीय कलाकारांचे काम आवडले. रिचर्ड पार्कर भारिये
शब्दखुणा: