लाईफ ऑफ पाय

Submitted by डॅफोडिल्स on 10 December, 2012 - 18:09

लाईफ ऑफ पाय चा ट्रेलर पाहिल्या पासुन फार उत्सुकता होती. ‘पाय’चे पाण्यातील प्रवासाचे रंजक अनुभव बघायला म्हणून पहिल्याच आठवड्यात लगेचच थ्रीडी पाहिला. नॉट वर्थ ! थ्री डी नसता तरी चालला असता.

समुद्रावरची काही दृष्य फार उत्तमरित्या चित्रीत केली आहेत. चित्रीकरण चांगले आहे. प्राण्यांबरोबरची तसेच इतरही दॄष्ये टेक्नीकली किती खरे किती खोटे सांगता येत नाही.

यान् मार्टेल च्या लाईफ ऑफ पाय या पुस्तकावर आधारीत कथानक आहे. मी पुस्तक वाचले नाहिये. पण चित्रपट ठिकठाक आहे. इरफान खान, तब्बु, सुरज शर्मा सारख्या भारतीय कलाकारांचे काम आवडले. रिचर्ड पार्कर भारिये Lol

चित्रपटाच्या सुरवातीला लहान मुलांचे चांगले मनोरंजन होते. मधे मधे जरासा कंटाळवाणा आहे.चित्रपत पहाताना कधी "टायटॅनीक" आणि कधी "कास्ट अवे" ची आठवण येते. एक दोन वेळेला काही चुकचुकाट (गुफ अप्स) सोडले तर साहसकथा आवडणार्‍यांना नक्की आवडेल.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाइफ ऑफ पाय बघितला. चांगला आहे पण मध्ये मध्ये आपण Cirque de soule बघतोय की काय असे वाटत होते तिथे थोडा कंटाळवाणा झाला.

मी एकदम मस्त एन्जॉय केला .....
आमच्या गावात ३ डी आलाच नाही. आता ३ डी बघणार. प्रत्येक फ्रेम मस्त होती.

आणि हो रात्री कास्ट अवे बघुनच झोपलो... पण दोन्ही त्या त्या ठिकाणी मस्तच आहेत. नो कंप्यारीझन... Happy

अर्र.. इथेही लागलाय थ्री डी त.. चायनीज सबटायटल्स सकट.. इंग्लिश डायलाक्स ऐकू येतील कि नै ही शंका आहे.. कारण आजूबाजूचे लोक्स खुडुम खुडुम चिप्स, पॉपकॉर्न हादडत असतात्..कारण त्यांना नुस्तं वाचायचं असतं.. Uhoh

अप्रतिम सिनेमा आहे... ती नॉव्हेल मिळाली पाहिजे वाचायला.

त्या रेट्रो काळातलं चित्रिकरण मस्त आहे. वातावरण निर्मिती एकदम मस्त. संवाद अगदी खुसखुशीत. इंग्लीश पण सोप्प ( साबांना व्यवस्थीत समजलं). उगाचच फाफट पसारा नाही. शेवट पण मस्त केला आहे...

मला खूप आवडला. प्रत्येक फ्रेमवर कष्ट घेतलेत.. Visual treat आहे. थ्रीडीचा मला तरी खूप चांगला वापर केलाय असं वाटलं. इरफान खानने अ‍ॅक्सेंट कसला सही बदलला आहे. त्या मुलाचा आणि त्याचा अ‍ॅक्सेंट अगदी सारखा आहे. फक्त शेवटचं ती alternate story जरा बोर झाली. ती सांगायला फार वेळ लावला असं वाटलं. ते काहितरी वेगळ्या पद्द्यतीने दाखवायला हवं होतं.
पुस्तकापेक्षा चित्रपट चांगला असण्याची बहूतेक ही पहिलीच वेळ. पुस्तक मधेमधे खूपच रटाळ वाटतं.

त्या रेट्रो काळातलं चित्रिकरण मस्त आहे. वातावरण निर्मिती एकदम मस्त. संवाद अगदी खुसखुशीत. इंग्लीश पण सोप्प ( साबांना व्यवस्थीत समजलं). उगाचच फाफट पसारा नाही. शेवट पण मस्त केला आहे...

+१००००

मला आवडला, पण थ्रीडीतच बरा आहे असे वाटले. चित्रिकरणासाठी पुर्ण मार्क.

बघायचा आहे. मला वाटलं मोठा रिव्ह्यु असेल इथे.
पुस्तक सुरुवातीचे काही भाग फारच रटाळ आहे. माझ्याकडे दुसरे काहीच वाचायला नव्हते त्यामुळे पुढे वाचत राहिले. मग मात्र इंटरेस्टींग होते आणि शेवट भारीये.
मीरा, माझ्याकडे आहे ते पुस्तक. एकीला दिलंय नुकतच. तिच्याकडुन आलं की तुला हवं असल्यास देऊ शकते.

दोन वर्षांपूर्वी पुस्तक वाचल होत. पुस्तक आणि सिनेमा दोन्ही आपापल्या पद्धतीने मस्त आहेत. पुस्तका मधील काही काही गोष्टी सिनेमा खोलात जाउन दाखवू नाही शकला. पटपट गुंडाळल्या सारख्या वाटल्या. उदा. पर्यायी गोष्ट, पायच्या मनातील धर्म आणि देवाच्या अस्तित्वा बद्दलची आंदोलन इ. मात्र पुस्तकात वर्णन केलेली साहसकथा ज्या पद्ध्तीने आंग ली ने सादर केली त्याने मी अवाक झाले. हॅट्स ऑफ टू हिम! डोळ्यांना मस्त मेजवानी! उगाच सिन्स सांगून तुमची मजा घालवत नाही. शक्य असेल तर ३-डी च बघा.
सूरज शर्मा ने मस्त काम केल आहे. विलक्षण गोड चेहरा आणि बोलके डोळे असलेला हा पोरगा जाम भाव खाऊन गेलाय.

कुठल्याशा चॅनलवर अनुपमा चोप्रा ह्या सिनेमाच्या बद्दल आंग ली, सुरज शर्मा, इरफान खान आणि तब्बू शी गप्पा मारत होती. "रिचर्ड पार्कर" आणि पाय चे सिन्स कसे शूट झाले हे कळल्या नंतर तर मला सूरजचा अभिनय जास्तच अपील झाला. तब्बू परत परत : Crouching Tigers Hidden Dragons बद्दलच बोलत होती. आंग ली मात्र Life of Pi पासून सुद्धा आलिप्त वाटला. कस वाटतय विचारल्यावर म्हणाला "रिकाम, रिक्त वाटतय" मनात विचार आला की पुढ्च्या अप्रतिम सिनेमाचे विचार ह्या पठ्ठ्याच्या मनात घोळत असणार! त्याकरता अस आलिप्त/रिक्त होण महत्वाच असल पाहिजे. असो.

पराग | 11 December, 2012 - 03:00
फक्त शेवटचं ती alternate story जरा बोर झाली. ती सांगायला फार वेळ लावला असं वाटलं. >>

अल्टरनेट गोष्टच खरी गोष्ट आहे. तुम्हाला चित्रपट कळला का? तो वाघाला आणि वाघ त्याला का मारत नाही हे कळले का? सावली १००% शेवट खरोखरच सही होता आणि मला तर अल्टरनेट स्टोरी (आधी माहित नसल्याने) ऐकतानाच सबसे बडा धक्का मिला. मी पुस्तक नक्कीच वाचेन.

सुचना: मुव्ही पहाणार असाल तर वाचु नका. ज्यांनी पाहिला त्यांच्यासाठी.

http://teachers.lakesideschool.org/us/english/kaz/TsimtsumandRichardPark...

शेवाळी बेटाचा symbolism पण जबरदस्त होता. स्वतःबद्दल दिवसा वाटणारे प्रेम आणि रात्री वाटणारी घ्रुणा यामुळे मेक्सिकोचा किनारा जवळ असुनही पाय तेथे जायला घाबरतो असे मला वाटले. या आरामजागेतुन (कम्फर्ट झोन) बाहेर काढण्यासाठी त्याने देवाचे आभार मानलेले पण खुपच मनाला भावले.
पाय पाण्यात पडलेल्या वाघाला मारुन टाकण्यासाठी पाय कुर्हाड उगारतो आणि शेवटी निराश होउन त्याला सोडुन देतो तोसीन पण सहीच असे मागाहुन जाणवते.
हे सर्व क्षण अल्टरनेट गोष्ट ऐकल्याक्ष्णी झरकन पुन्हा नविन अर्थ घेउन डोळ्यासमोरुन धावले.

स्पॉयलर अलर्ट:
लाइफ ऑफ पाय - खरं काय? प्राण्यांची गोष्ट खरी का माणसांची?
यावर बर्‍याच चर्चा सुरु आहेत. कुठलीही एक गोष्टच खरी असं म्हणणं कठीण आहे. प्रत्येकाच्या स्वत:च्या विचारसरणीनुसार वेगवेगळे अर्थ निघू शकतात.
माझं इंटरप्रिटेशन:
जर प्राण्यांची गोष्ट खरी मानली तर वाघ पायला का खात नाही? विचित्र वनस्पतींच्या बेटाविषयी कुणालाच कसलीच माहिती नसणं, हे पण अशक्यच वाटतं.
मग खरं काय? एकतर हे पायला भुकेमुळे होणारे भास असू शकतात.
किंवा: दुसर्‍या गोष्टीत सांगितल्याप्रमाणे पाय (वाघ), त्याची आई गीता (ओरांगउटान), कुक (हायना) अन जपानी (झेब्रा) हे लाइफबोटमध्ये येतात. कुक जपान्याला मारतो अन नंतर गीतालाही. समुद्रात खायला काही नसताना माणसे मारुन खाण्याशिवाय दुसरा पर्याय तरी काय असतो? ह्या भयानक प्रकाराचा साक्षीदार पाय असतोच. शेवटी स्वतःचा जीव वाचवायला तो कुक लाही मारतो अन त्या तिघांच्या देहावर स्वतःला जिवंत ठेवतो. हा त्याच्या आतला क्रूर प्राणी म्हणजेच रिचर्ड पार्कर, वाघ. हे तिघेही मेल्यानंतर त्याला लाइफबोटमध्ये अन्न सापडते. तेव्हा त्याला वाईट वाटलेले दाखवलेय.
वाघाला तो त्या लाइफबोटच्या एका भागातच ठेवतो याचा अर्थ त्याच्या मनातही तो त्या क्रूर प्राण्याला सगळीकडे मुक्त सोडत नाही. माणूसपण शिल्लक ठेवायचा जोरदार प्रयत्न करतो.
त्या विचित्र बेटावर त्याला खायला-प्यायला मिळते पण तिथे दिवसा सुंदर दिसणारे बेट रात्री खतरनाक बनते. म्हणजे जेव्हा दिवसा आरामात अन्न मिळते तेव्हा पायला रात्री स्वत:चेच दुसरे "कॅनिबल" रुप आठवून भिती वाटते. म्हणून आपण या बेटावर राहू शकणार नाही याची त्याला खात्री पटते. त्यापेक्षा तो समुद्रात कुठल्याही ध्येयाशिवाय फिरणे प्रेफर करतो.
शेवटी तो जेव्हा मेक्सिकोच्या किनार्‍यावर आपोआप जाऊन पोचतो तेव्हा वाघ महणजे त्याच्या आतला क्रूर प्राणी त्याला सोडून जातो. कारण त्या क्रूरपणाची गरज उरली नसते.

तीन चार धर्म मानणार्‍या पायला अंतिम सत्याला सामोरे जावे लागते- स्वतःला जिवंत ठेवणे हेच ते सत्य. धर्म कुठलाही माना अथवा न माना, माणूस "स्व"ला विसरु शकत नाही. त्यासाठी वाट्टेल ते करतो.
आणि तरी शेवटी स्वत:च्या मानसिक बळाच्या आधारे हे सगळे विसरुन जाऊन नवे आयुष्य देखील सुरु करु शकतो.

अजून एक म्हणजे जेव्हा तो विचारतो "which story do you prefer?" तेव्हा एकप्रकारे तो धर्माशी साधर्म्य दाखवून देतो. माणूस खरं तर कुठल्याही धर्मात मनापासून विश्वास ठेऊ शकत नाही कारण ते प्राण्यांच्या गोष्टीसारखे फसवे, न अनुभवलेले पण सुंदर असतात. माणूस फक्त एका धर्माऐवजी दुसरा "प्रेफर" करतो (चॉइस दिल्यास). कारण त्याला एकापेक्षा दुसरा जास्त खरा वाटतो आणि त्यामुळे विचारांचा गुंता न होता आयुष्य अधिक सोपे, सरळ बनते. पण पायच्या गोष्टीप्रमाणेच "अंतिम सत्य" एकच आहे. धर्म कुठलाही असो वा नसो.

बाकीच्यांचे इंटरप्रिटेशन्स वाचायला आवडतील.

स्पॉयलर अलर्ट:
नताशा यु गॉट इट राइट.
"which story do you prefer?" या प्रश्न जेव्हा पाय विचारतो तो भाग मला थोडा वेगळा जाणवला.
पायने माणसांना मारुन तो जिवंत राहिला हे इथे "obvious" आहे. यामुळेच जपान्यांचा प्रश्ण त्याला आवडत नाही. तो अ‍ॅनिमल्सचे स्टोरी प्रीफर करतो कारण त्याच्या मते परमेश्वर ही चिकत्सेची गोष्ट नाहीच.
स्वतःच्या आईच्या मासावर (किंवा ते मास चारुन पकडलेल्या माशांवर) जेंव्हा तो जिवंत रहातो. तेंव्हा अशा
परिस्थितीत मला(पायला) तसे (वाघासारखे वागायची शक्ति देणारा ) परमेश्वरच होता. आणि किनार्यावर लागल्यावर भुतकाळाचे ओझे नाहिसे करुन एकदाही मागे न वळुन पाहता जाणार्या वाघाप्रमाणे ती शक्ति काढुन घेणारा पण तोच. त्यानेच जर माझ्या भुतकाळाची घ्रुणा माफ करुन मला वाचवले तर त्या घटनेची
चिकित्सा करणारे इतर कोण? यावर लेखकाला पण ते मान्य होते आणि तो पण चिकित्सा सोडुन प्राण्यांची गोष्ट (त्याद्वारे परमेश्वराचे सर्वव्यापी अस्तित्व) मान्य करतो.
हे सर्व ज्या प्रकारे चित्रित झाले ते केवळ अप्रतिम. पुस्तक न वाचल्याने हा चटका जास्तच जाणवला.

मीपण पाहिला. ESquare मध्ये स्क्रीन काळवंडली की काय माहिती नाही, 3D इतका ब्राइट दिसत नव्हता. पण इफ्फेक्ट्स एकदम मस्त. Visual Treat आहे अगदी. अल्टरनेट स्टोरी जाम कंटाळवाणी वाटली पण आत्ता वरील प्रतिक्रिया वाचल्यावर पुस्तक वाचायची उत्सुकता आहे.

नताशा, मस्त लिहीलयस.
स्पॉयलर अलर्ट:
चित्रपट मस्तच आहे. पण शेवटी जेव्हा दोन गोष्टी ऐकतो, तेव्हा हा चित्रपट एकदम विचारात टाकतो. किती सहजतेने आपली पुर्ण विचारप्रक्रिया परत सुरु होते किंवा बदलायला लागते. धक्कादायक ट्विस्ट नाही सस्पेंस मुवीचा थाट नाही. तरी शांतापणे, सहजपणे पुर्ण वेगळा विचार करायला शेवट भाग पाडतो.
सिनेमागृहामधून निघताना, परत संपुर्ण चित्रपटाची उजळणी करुन, मग तिथे तिथे प्रत्येक घटनेला अर्थ लावले जातात. मस्त चित्रपट.

नताशा, मान गये ! मी जवळ जवळ तुझ्याच ट्रॅकवर होते. जे काही अस्पष्ट होतं ते तुझ्या विचारांमुळे स्वच्छ झालं. Happy

नताशा, मान गये ! मी जवळ जवळ तुझ्याच ट्रॅकवर होते. जे काही अस्पष्ट होतं ते तुझ्या विचारांमुळे स्वच्छ झालं. स्मित >> +१ .

स्पॉयलर अलर्ट:

हाय नताशा,
बरेचदा हॅरी पॉटरच्या वेळी असे असंख्य symbolism जाणवायचे पण केवळ प्रत्येकाला ते स्वतःला अनुभवु दे म्हणुन उघड लिहित नव्हते. इथे आता तु interpretation लिहायला बोलतेस तर चान्स मारुन आणखी काही interpretation लिहुन टाकते (हे इतरत्र आंतर्जालावर कुठेच वाचले नाहित आणि बहुतेक मिळणार ही नाहित)
१) पायचे नाव Piscine हे फ्रेंचमध्ये पारदर्शक तलावाचे नाव आहे तर इंग्रजीत याचा उच्चार करताना तेच पाणी एक मुत्र ठरते. देव असाच आहे त्याचा वाटणारा अभाव हा अभाव नसतो तर द्रुष्टी असते.
२) पाय हा पहिल्या तासाला फक्त ३.१४ असतो, पण सामान्य द्रुष्टीवाल्यांचे तेव्हढ्याने समाधान होत नाही जेंव्हा ते पाय = ३.१४१५९........ हे सर्व वाचतात तेंव्हाच ते पाय हे नाव मान्य करतात.
ही ती अतिचिकित्सक व्रुत्ती. शेवटी तुम्ही पाय म्हणजे व्यवहारासाठी ३.१४ लक्षात ठेउन ९९% काम भागते नाही का?
३) वाघाबरोबर असताना बोटीत वाद्ळ येते, ते पायच्या मनातले आंदोलन. तो देवाला परत परत आवाहन करतो एकतर माझे माणुस्पण नष्ट कर नाहितर माझ्यातली जगण्याची इच्छा वाघ तरी घालवुन टाक. त्याच्या या वागण्याने वाघ घाबरतो. या आंदोलनात कधी ते एक होतात कधी वेगळे पण शेवटी देव यापैकी काहिच करत नाही.
४) शेवटी अजुन एक प्रकारे पण जाणवले की "प्राण्यांच्या गोष्टीत " जे गुण शौर्य आणि हिमतीचे ठरतात तेच "माणसाच्या गोष्टीत" दु:ख्ख आणि किळस वाटणारे ठरतात, यामुळेच पायला ही प्राण्यांची गोष्ट आवडते कारण ज्या व्रुत्तीबद्दल बाकिच्यांना कीव येइल त्याच वागण्याने पायला जिवंत ठेवले.

स्पॉयलर अलर्ट -

चित्रपटातली दुसरी गोष्ट ही शेवटी येत नाही. अतिशय तरलपणे ती पहिली गोष्ट सुरू असतानाच सतत दिसत राहते. प्राण्यांचे हावभाव नीट पाहिले, तर अगदी सुरुवातीपासून दुसरी गोष्ट समांतर दिसते.

धन्यवाद लोक्स Happy
निलिमा Happy
१) हा वेगळाच विचार आहे.. माझ्या डोक्यात नव्हता आला.
२) हा मात्र अगदी माझ्या मनातलाच. शेवटी तुम्ही ३.१४ वर काम भागवणार का त्यापुढे जाणार हा निर्णय दिग्दर्शक प्रेक्षकावर सोडतो. ब्रिलियंट!
३) हे पण माझ्या लक्षात नव्हतं राहिलं Happy
४) हम्म.. बहुतेक प्रेक्षकांनाही प्राण्यांची गोष्ट जास्त पटते. ती अजिबात पटण्याजोगी नसूनही. अन जी अगदी शक्य आहे ती दुसरी माणसांची गोष्ट नकोशी वाटते. काय विरोधाभास अस्तो आपल्या मनात Happy

चिनुक्सजी
तुसी ग्रेट हो.. पण मला खरोखरच शेवट पर्यंत हे जाणवले नाही, पण त्यामुळे एंजॉय पण झाले (मंदबुद्धीचा फायदा).
तुम्ही मागे "नातिसरामी" या श्रद्धा च्या धाग्यावर सर्व हसत होता. बेफि म्हणाले ते त्यांच्यावर टीकास्त्र होते पण मला काहिच कळले नाही त्या सर्व संभाषणातुन , नातिचरामी वाचुनही , बराच चड्फडाट झाला.

निलिमा,

पुन्हा जर हा चित्रपट पाहिलात, तर माकडाचे आणि झिब्र्याचे हावभाव बघा. Happy

'नातिसरामी'चे नायक श्री. अरभाट आहेत. बेफिकीर नव्हेत. Happy

ह्म्म्म. इथले अ‍ॅनॅलिसिस वाचुन चित्रपटाचा एक वेगळाच अर्थ कळला. हा चित्रपट देवावरचा आपला विश्वास दृढ करतो या अर्थाचे वाक्य मी कुठेतरी वाचलेल पण त्याचा नेमक अर्थ लागत नव्हता, आता लागला Happy

माकडाला पाहताना मला त्याच्या आईची आठवण येत होती. खुप व्याकुळ आणि हताश भाव दाखवलेत तिच्या चेह-यावर. आणि पार्करची अकस्मात एंट्रीसुद्धा काही वेगळी वाटलेली.

निलिमा,

पुन्हा जर हा चित्रपट पाहिलात, तर माकडाचे आणि झिब्र्याचे हावभाव बघा.

>> हो बरोबर आणि तो तिला तिचे पिल्लु "ऑरेन्ज जुस असे काहिसे नाव होते" कुठे आहे असे विचारतो, ते बहुदा रवी बद्दल असावे पण मला त्यावेळी हे कळले नाही. पुन्हा पाहिन नेटफ्लिक्सवर.

नताशा आणि निलिमा: मस्तच पोस्टी. जाम आवडल्या.

मी एक अजून कंगोरा सादर करते. अर्थात हा पुस्तक वाचून आलेला विचार आहे कारण सिनेमात ते एवढ्या व्यापकतेन मांडल गेल नाही आहे.

अतिरंजीत वा सुरस कथांच (amazing and fascinating stories) मानवाच्या जिवनात असलेल स्थान सुद्धा हा सिनेमा अधोरेखित करतो. त्यातून मानवाला बर्‍या-वाईटाचा फरक, चांगुलपणाची प्रेरणा वा जगायची दिशा मिळत असते. इसापनिती तर अश्या सुरस आणि चमत्कारीक कथांनी भरली आहे आणि आठवत का...प्रत्येक कथेच्या मागे तात्पर्य (Moral) आहे?

अश्या कथा सर्व धर्मात आढळतात आणि त्या वरकरणी अतर्क्य आणि अचाट वाटल्या तरी त्यामागिल संदेश, गूढार्थाची उकल हा पण एक शैक्षणिक अनुभव असतो आणि तो थेट देवाकडे (consciance) पोहोचवतो (वा पोहोचवायला पाहिजे). Little Pi is constantly debating about the role of religion in human life as well as existence of GOD! त्याच conclusion आहे की धर्म हा माणसाकरता हवा. अतिरंजीत गोष्टीतून जिवनाची दाहकता कमी करून--पचेल अश्या पद्धतीन मानवाला जगण्याच सार शिकवण्याच (instilling conscience) काम धर्म करतात (वा करायला पाहिजेत). त्याचप्रमाणे देव (existence of coscience) हा अनुभवायचा विषय आहे चिकित्सेचा नाही.

निलिमाने वर उल्लेख केल्याप्रमाणे प्राणी--प्राण्याला मारतो हे बघण आपण सहन करतो कारण ते क्रौर्य "जंगलचा कायदा" म्हणून आपण ते मान्य करतो. पण पर्यायी कथा-बोटीवरचा कुक आईला, जपान्याला मारतो आणि पाय कुकला संपवतो हे बघायला आपल्याला आवडल असत का? पर्यायी कथा मला सिनेमात बघायला मुळीच आवडली नसती . देवाशी त्याच कनेक्शन काय? सुरस कथा मानलीत तर देव आहे आणि पर्यायी कथा जशीच्या तशी--रुपकांशिवाय मानलीत, तर देव बिव सब झूठ आहे ...दाहक जिवनच सत्य आहे. पचेल का हे सामान्य माणसाला. पायला मात्र पर्यायी कथेतून सुद्धा देवाच अस्तित्व पटत कारण त्याने अनुभवलेले स्वता:मधले बदल! तो माणसाचा प्राणि (lack of conscience) होतो आणि प्राण्याचा माणूस (gets back his conscience)! पण सामन्य माणूस जोपर्यत अश्या अनुभवांतून जात नाही तो पर्यत तो धर्म्/देव दोन्ही रुपक-कथांद्वारेच शिकतो वा अनुभवतो.

Pages