कॉपर बीचेसचे रहस्य - भाग १
कॉपर बीचेसचे रहस्य - भाग २
"तुमच्या बाबतीत जे काही घडले ते आता कृपया तुम्ही आम्हाला सांगा" - होम्स.
... इथून पुढे चालू -
"ते तर मी तुम्हाला सांगेनच परंतु मला हे काम लगेच उरकायला हवे. कारण मि. रुकास्टलना मी दुपारी तीन च्या आत परत येईन असे सांगून निघाले होते. इथे सकाळी मला शहरात एक काम आहे असे कारण मी पुढे केले होते, परंतु अर्थातच ते काम काय ह्याची त्यांना कल्पना नाही."
"आता आम्हाला सर्व काही क्रमवार सांगा, मिस. हंटर" होम्स पाय सैलावत बसून म्हणाला.
कॉपर बीचेसचे रहस्य - भाग १
......तोच त्या सद्गृहस्थांचेच पत्र मला माझ्या पत्त्यावर आले. मी ते सोबत आणले आहे व आता तुम्हाला वाचून दाखवते: ... इथून पुढे चालू -
"कॉपर बीचेस, विंचेस्टर जवळ
प्रिय मिस. हंटर,
वसंत ऋतु नुकताच सुरू झाला होता. एका गुलाबी थंडीत सकाळचा नाश्ता नुकताच संपवून मी आणि होम्स बेकर स्ट्रीट वरील आमच्या खोलीत भट्टीची आल्हाददायक ऊब शेकत बसलो होतो. खिडकीसमोरच्या ओळीने पसरलेल्या करड्या रंगाच्या घरांच्या रांगांमधून धुक्याचा एक दाट ढग तरंगत चालला होता. त्याच्या पिवळसर आच्छादनात लपेटलेल्या त्या घरांच्या खिडक्या अंधुक, धुरकट दिसत होत्या. आम्ही नाश्ता केलेल्या मेजावर अजूनही चीनी मातीची भांडी व प्लेट्स इत्यादी सामन तसेच पडले होते. शेरलॉक सकाळपासूनच शांत शांत होता. गेल्या काही दिवसांतल्या वर्तमानपत्रांतले जाहिरातींचे रकाने बारकाईने वाचण्यात तो गढून गेला होता.
ही १८९७ सालची गोष्ट आहे. हिवाळा संपत आला असूनही रात्री बोचरी थंडी पडत असे व सकाळी धुके! अशात एका भल्या पहाटे होम्स ने मला गदागदा हलवून उठवले. त्याने हातात धरलेल्या मेणबत्तीच्या प्रकाशात त्याच्या चेहर्यावरची उत्सुकता बघूनच मला समजले की काहीतरी खास बात आहे.
"चल, वॉटसन, चल!" तो ओरडला, "पटकन कपडे बदल आणि माझ्यासोबत चल."