दिवाळी पहाट
नुकतीच दिवाळीची सुट्टी लागलेली होती. दिवाळी ते आनंदाचे, भरभराटीचे,
कौतुकाचे, सुंदर दिव्यांचे, सुंदर सुंदर रांगोळ्या यांचे, रंगीबेरंगी आकाशकंदिलाचे व सकाळी
उठ उठ करत आज `दिवाळी पहाट' आहे असे सारखेसारखे सांगत आई हातातली कामे
पटापटा करत होती. छानशा झोपेचे खोबरे होणार म्हणून मी अंथरूणातच पडून दुरूनच तिची
मजा, धांदल बघत होते. सर्व झोपेत होते, पण आई मात्र सकाळी लवकर उठून, अंघोळ
करून पणत्या लाव, आकाशकंदील लाव, अंगणात रांगोळी काढ, तुळशी जवळ दिवा
लाव, मोठ मोठे कणीक-ज्वारीच्या पीठाचे दिवे चारी दिशांना ठेव, पाटाभोवती छान रांगोळी