मी चोरलेलं पुस्तक
मी त्यावेळी मुंबईला नोकरीला होतो. १९८६-८८चा तो काळ. राहायला मरोळ पोलिस हेडक्वार्टर आणि नोकरी भायखळ्याला. नोकरी १२ तास सलग ड्युटी आणि २४ तास ऑफ अशा रोटेशनमधे होती. त्यामुळे छंद जोपासायला वेळ मिळायचा. फलज्योतिषाचा व्यासंग तर चालूच होता. वाचनाचा नाद असल्यानं दादरला मुंबई मराठी ग्रंथालय आणि विलेपार्लेला महिला संघाचं ग्रंथालय या दोन्हींचा वर्गणीदार झालो. दोन्ही ग्रंथालयांत ज्योतिषाची पुस्तकं थोडीफार असायची. ती वाचायचो. कधी कधी जूनी उत्तम पुस्तकं वाचायला मिळायची. तसं ग्रंथालयांचं आणि माझं फारसं जमायचं नाही.
मायबोली विविध विषयांवर, विविध वारंवारितेने वाचणारे लोक आहेत. आजच्या जमान्यात छापील पुस्तकांबरोबरच अनेक जण इ-पुस्तके व ऑडिओ-पुस्तकेदेखील वाचत/ऐकत असतील. आंतरजाल उपलब्ध व्हायच्या आधीच्या जमान्यात पुस्तकाबद्दल माहिती मिळवण्याची साधने व आंतरजालाच्या युगातील साधने यात जमीन-आस्मानाचा फरक पडला आहे. लोकं एखादे पुस्तक का वाचायला सुरू करतात, तेच पुस्तक का, त्याबद्दल माहिती कुठून मिळते की फक्त लायब्रीत्/दुकानात चाळता चाळता पुस्तक उचलतात याबद्दल माझ्या मनात उत्सुकता आहे.
नमस्कार,
मला आमच्या सिंगापूरातील ग्रंथालयासाठी एकूण २५ दर्जेदार दिवाळी अंक घ्यायचे आहेत. काहीतरी नवीन, वेगळी संकल्पना असलेले दिवाळी अंक हवे आहेत.
मौज, साप्ताहिक सकाळ, ललित, अक्षर .. काही नेहमीचे दिवाळी अंक घेणारचं आहोत आम्ही पण आजच्या काळाशी सुसंगत, परदेशातील मराठी लोकांना आवर्जुन आवडतील असे दिवाळी अंक इथे सूचवता का?
वाचनिय दिवाळी अंकाची यादी इथे हेडरमधे समाविष्ट करत आहे: