अंजनेरी
'अंजनेरी'च्या वाटेवर..!
पाऊस पडेल या आशेवर संपूर्ण पावसाळा कोरडा गेला..पाण्याच्या दृष्टीने व ट्रेकच्या दृष्टीनेही..! गणपतीत कोकणात गेलो तिथेच भरतगड, विजयदुर्ग पाहिले तीच भटकंती..आता दिवाळी होऊन नोव्हेंबर चा महिना उजाडलेला.. अर्थात आम्हा लोकांची ट्रेक व्याकुळता तीव्र झालेली.. अश्यातच मग अंजनेरी ट्रेक ने भटकंतीला पुन्हा सुरवात करण्याचे ठरले.. ! नाशकात ट्रेकला जायचं म्हटलं की उत्साह जरा जास्तच असतो.. कारण एकट्या नाशिकमध्ये गडकिल्यांची लिस्ट मोठी तेव्हा एकेक गडकिल्ला पार केला कि तेवढंच लिस्ट कमी झाल्याचं समाधान.. गिरीने आपली सिटी होंडा तयार ठेवली.. इंद्रा, रोमा व मी तयारच होतो..
किल्ले अंजनेरी उर्फ ऋष्यमूक पर्वत
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातली गोष्ट. ऑफिसच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने आठवडाभर नाशिकमध्ये होतो. देवही आम्हा ट्रेकर्सच्या बाबतीत कधी कधी अगदी मेहेरबान होतो. यावेळी मेहेरबानी झाली ती प्रोजेक्टच्या ठिकाणावर! यावेळी कॉलेज होते ते अंजनेरी गावापासून जेमतेम दोन किमीवर! समोर अंजनेरी किल्ला! अगदी पहिल्याच दिवशी दिवसभर गडमाथ्यावर धुकेजलेले ढग होते आणि कॉलेजमध्ये मी बैचेन! कधी एकदा अंजनेरीला जाऊन येतो असे झाले होते. कॉलेजमधूनच गडाचे फोटो घेणे 'तत्त्वात' बसत नव्हते.