अशत्याबैरि

माझं नाव जर दाद असतं

Submitted by Kiran.. on 14 August, 2012 - 11:36

ज्यांच्या शब्दांनी निर्भेळ आनंद दिलाय त्यापैकी काही प्रतिभावंतां प्रती थोडीशी कृतज्ञता :).

माझं नाव जर दाद असतं
हसले असते शब्द आणि
बनले असते ललित शुचिर्भूत होऊन
गाणं देही भिनलं असतं
गानभूलीत झुललं असतं

माझं नाव जर ट्युलिप असतं
अलवार शब्दांची मैफील माझ्या
झोपडीत भरली असती..
हळुवार ललित नि उत्कट कविता
रेगिस्तान मे बहार होती

जर मी असतो धुंद रवी
तरल असता किबोर्ड माझा
धुंद होतानाही आले असते डोळे भरून
आणि लगेच आसमंत
हसला असता पोट धरधरून

माझं नाव जर कौतुक असतं
अष्टपैलू ही ओळख असती
रहस्य हासू, विडंबनं, कविता
अवती भवती नांदत असते

Subscribe to RSS - अशत्याबैरि