बयो

अंत: अस्ति प्रारंभ: २: ब्लाईंड डेट - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 September, 2024 - 13:28

ब्लाईंड डेट!
-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-
आजूबाजूला बहरात आलेले प्रेमी युगुलं काय करताहेत यावर तिने एक नजर टाकली...

आणि कोल्ड कॉफी ऑर्डर केली.

याने पाण्याचा घोट घेऊन बोलायला सुरुवात केली.

नाव-गाव-फळ-फुल

ती मन लावून सँडविच खाताखाता त्याचे बोलणे ऐकत होती.

"धनुष्यबाण की कमळ?" .. त्याने तिचा कल चाचपायला विचारले.

त्यावर तिने "हात" दाखवला....
वेटरला!

"आयपीएल बघतेस?" तो तिची आवड जाणून घ्यायच्या प्रयत्नात..

"इंडिया खेळत असेल तरच..." ती बाटलीत बुडबुडे सोडत उत्तरली.

त्याने डोक्यावर हात मारला

विषय: 

बयो,

Submitted by बयो on 12 August, 2012 - 04:09

तसं सर्वार्थानं आपलं असं
कुणीच नसतं ना बयो,
जे सोबत असतं आपल्या
काळीज उलताना, फुलताना...
आतड्यांमधून उठणाऱ्या
कल्लोळांना
स्वतःलाच बांध घालावा
लागतो बयो.
आतून उगवणाऱ्या
हिरव्या जखमांवरची
निळीशार फुंकर
आपली आपणच
व्हावं लागतं बयो,
स्वतःशीच लढताना.
शिकशील तूही हळूहळू.
पण तोपर्यंत नव्यानं
फुटशीलही.
सोपं नसतंच काही
पण तितकं अवघडही नसतं काही तसं,
ज्यासाठी करावा लागतो
प्राणांचा अट्टाहास असं...
निरगाठी उकलाव्यात तसं
आयुष्यही उलगडत जातं मग हळूहळू

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बयो