अंत: अस्ति प्रारंभ: २: ब्लाईंड डेट - ऋन्मेऽऽष

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 September, 2024 - 13:28

ब्लाईंड डेट!
-.-.-.-.-.-.-.-.-.-.-.-
आजूबाजूला बहरात आलेले प्रेमी युगुलं काय करताहेत यावर तिने एक नजर टाकली...

आणि कोल्ड कॉफी ऑर्डर केली.

याने पाण्याचा घोट घेऊन बोलायला सुरुवात केली.

नाव-गाव-फळ-फुल

ती मन लावून सँडविच खाताखाता त्याचे बोलणे ऐकत होती.

"धनुष्यबाण की कमळ?" .. त्याने तिचा कल चाचपायला विचारले.

त्यावर तिने "हात" दाखवला....
वेटरला!

"आयपीएल बघतेस?" तो तिची आवड जाणून घ्यायच्या प्रयत्नात..

"इंडिया खेळत असेल तरच..." ती बाटलीत बुडबुडे सोडत उत्तरली.

त्याने डोक्यावर हात मारला

"तुला शाहरूख आवडतो??"
काहीतरी जुळावे...

तिने फ्राईजचा बकाणा तोंडात कोंबला आणि म्हणाली,

"कॉन शॉहोरूख???"

आणि त्याचा उद्रेक झाला!
कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात तो गरजला...

खाण्यासाठी जन्म आहे का बयो...

मग काय,

दोघेही मुसळधार पावसात होते,
पण....

बरोब्बर.. कोरडेच Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छन्दिफन्दि .. शाहरूखला न ओळखणारी मुलगी अजून भारतात जन्माला यायची आहे Happy कदाचित खायच्या नादात घोळ घातला असावा बयोने .. बेनिफिट ऑफ डौट देऊया तिला Happy

Lol मस्त आहे.
माधुरी दिक्षीत शी लग्न करताना तिच्या नवर्‍याला माहीत नव्हते की ती १ सुपरस्टार आहे, ते आठवले.

मस्तच!
"कॉन शॉहोरूख???" > जाम हसले या वाक्याला

माधुरी दिक्षीत शी लग्न करताना तिच्या नवर्‍याला माहीत नव्हते की ती १ सुपरस्टार आहे,
Aashu29, सिरीयसली? Happy
तुला खरेच वाटते का की डॉ नेने यांना तिच्याविषयी काहीच माहीत नव्हते?

धन्यवाद रूपाली !
धन्यवाद रूपाली !

डॉकटर नेनेना आपली होणारी बायको अभिनेत्री आहे हे माहीत असणारच...
फारतर तिची किती क्रेझ आहे हे माहीत नसेल.
तसेही त्या काळात आपल्याकडे हिरोईनना तितके स्टारडम नसायचे जितके हिरोना..

अरे वा,छानच आहे.

जन्माला आली आता. तूच आणलीस ..... सही बोले.

डॉकटर नेनेना आपली होणारी बायको अभिनेत्री आहे हे माहीत असणारच...
फारतर तिची किती क्रेझ आहे हे माहीत नसेल.>>> हां असंच म्हणायचं होतं.
उगा अफवा पण पसरवतात

Pages