फ्लॉवर रेमिडी

जेष्ठ नागरिकांना आनंदी जीवन जगण्यासाठी पुष्पौषधी

Submitted by शोभनाताई on 1 October, 2012 - 11:42

आज जेष्ठ नागरीक दिन ! त्या निमित्ताने जेष्ठांसाठी हा छोटासा लेख.

जेष्ठांच्या बर्‍याच शारीरिक आरोग्याच्या समस्या मानसिक आरोग्याशी निगडित असतात.
मानसिक आरोग्यावर ताबा मिळवण्यासाठी पुष्पौषधी मदतीचा हात देउ शकतात.

ब्रिटिश वैद्यक चिकित्सक डॉ. एडवर्ड बाख यांनी १९३८ साली ही उपचार पध्दती जगासमोर आणली.आणि स्वतःच स्वतःला बरे करा हा मंत्र दिला.याद्वारे व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडवणार्‍या नकारात्मक भावनांवर इलाज केला जातो.विविध नकारात्मक भावनांवर इलाज करणारी ३८ औषधे सहा वर्षांच्या अथक प्रयत्नातुन त्यानी शोधुन काढली. फुलांपासुन तयार केली जाणारी ही औषधे.

फ्लॉवर रेमिडीची जन्म कथा

Submitted by शोभनाताई on 17 September, 2012 - 23:32

२४ सप्टेंबर हा डॉक्टर एडवर्ड बाख यांचा जन्मदिवस येऊ घातलेला आहे. बाख आणि त्यानी शोधुन काढलेली फ्लॉवर रेमेडी ही उपचार पद्धती याचा माझ्यावर खुप प्रभाव पडला. त्याच्या वापराने मी स्वतःच्या आणि इतरांच्याही जीवनात थोडाफार आनंद निर्माण करु शकले. बाखचे विचार पोचवून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा लेखन प्रपंच.

विषय: 

हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांसाठी पुष्पौषधी (फ्लॉवर रेमेडी)

Submitted by शोभनाताई on 22 July, 2012 - 05:21

माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाने हॉस्टेल सुरु केले. वास्तुशांतीला बोलावल तेंव्हा मला तनयची आठवण झाली. तनयला हव्या त्या अभ्यासक्रमास आणि चांगल्या कॉलेजमधे प्रवेश मिळाला म्हणुन निशा खुशीत होती. 'कष्टाच चीज झाल ग' माझ्या हातात पेढ्याचा बॉक्स देत ती म्हणाली. तनय आता हॉस्टेलमध्ये राहणार होता, तोही खुष दिसत होता. पण आठ दिवस झाले नाहीत तर निशाचा रडवेल्या आवजातील फोन. ' अग तनय मला कॉलेज झेपत नाही परत यायच म्हणतोय.परीक्षेच्यावेळी तू दिलेल्या औषधाचा फायदा झाला होता. आता काही देता येइल का? मला तर काही सुचतच नाही बघ.' मी तिला धीर दिला. तनयला पुष्पौषधी दिली.त्याची समजुत काढली.

Subscribe to RSS - फ्लॉवर रेमिडी