आज जेष्ठ नागरीक दिन ! त्या निमित्ताने जेष्ठांसाठी हा छोटासा लेख.
जेष्ठांच्या बर्याच शारीरिक आरोग्याच्या समस्या मानसिक आरोग्याशी निगडित असतात.
मानसिक आरोग्यावर ताबा मिळवण्यासाठी पुष्पौषधी मदतीचा हात देउ शकतात.
ब्रिटिश वैद्यक चिकित्सक डॉ. एडवर्ड बाख यांनी १९३८ साली ही उपचार पध्दती जगासमोर आणली.आणि स्वतःच स्वतःला बरे करा हा मंत्र दिला.याद्वारे व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडवणार्या नकारात्मक भावनांवर इलाज केला जातो.विविध नकारात्मक भावनांवर इलाज करणारी ३८ औषधे सहा वर्षांच्या अथक प्रयत्नातुन त्यानी शोधुन काढली. फुलांपासुन तयार केली जाणारी ही औषधे.
इतर पॅथीची औषधे चालु असतानाही ही औषधे घेता येतात. वेळोवेळी मी याचा अनुभव घेतला आहे. इतरांप्रमाणे जेष्ठ नागरीकांनाही मी ती दिली आणि त्यांचे जगणे आनंदी होताना पाहिले.
जेष्ठांच्या विविध समस्यांपैकी जुळवून घेणे ही एक समस्या असते. हे जुळवून घेणे नव्या पिढीशी, निवॄत्तीनंतर बदललेल्या स्थानाशी, हवामानाशी, विविध आजारांमुळे बदललेल्या आहार-विहाराशी, बदललेले घर, गाव असे अनेक प्रकारचे असू शकते. वॉलनट ही पुष्पौषधी हे जुळवून घेण सहजसाध्य करते.
जेष्ठांची आणखी एक समस्या म्हणजे भविष्याची चिंता, मृत्युची, आपण लोळागोळा होऊन तर पडणार नाही ना ही भिती. गॉर्स या समस्येला तोंड देण्याचे बळ देते
अपघात चोरी दरोडा अशा बातम्या कानावर सतत येत असतात. त्या ऐकुन अनामिक भिती निर्माण होते. अॅस्पेन ही भिति घालवते.
गमावलेला आत्मविश्वास परत देण्याचे काम लार्च करते.
पति-पत्नी यापैकी एका साथीदाराच्या निधनामुळे झालेल्या दु:खावर रेस्क्यु रेमेडी हळुवार फुंकर घालते. ५ औषधांच्या मिश्रणातुन बाखनी बनवलेले हे औषध आपत्कालिन परिस्थितित मनोबल स्थिर ठेवण्यास मदत करते.
उदाहरणादखल वरिल काही औषधे सांगितली.
आपली नेहमीची औषधे घेणे मात्र अजिबात विसरायचे नाही.
योग्य आहार, आवडीचे छंद, पुरेसा व्यायाम, पुरेशी विश्रांती यांच्या जोडीने पुष्पौषधी घेउयात. स्वतः आनंदी राहुन इतरांनाही आनंदी करुयात.
ही औषधे होमिओपॅथीच्या दुकांनांमध्ये उपलब्ध असतात. गरज असेल तेव्हा दिवसातून चार वेळा चार -चार गोळ्या घ्याव्यात.
जेष्ठाना "जेष्ठ नागरिक दिना" निमित्त या, माझ्या त्यांना शुभेच्छा !
खुप महत्वाची आणि सर्वांनाच
खुप महत्वाची आणि सर्वांनाच उपयोगी पडणारी माहिती आहे. कारण प्रत्येकाकडे कुणी ना कुणी जेष्ठ असतातच. धन्यवाद शोभनाताई!
मानसिक आरोग्यावर ताबा
मानसिक आरोग्यावर ताबा मिळवण्यासाठी पुष्पौषधी मदतीचा हात देउ शकतात. >>>> हे खूप महत्वाचे वाटले.
हि औषधे, तज्ञांच्या
हि औषधे, तज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेतली तर चालतात का ? मी पूर्वी जे लेख वाचले होते, त्यात प्रत्येक रुग्णाच्या परिस्थितीचा सखोल अभ्यास करुन, तज्ञ मंडळी औषध आणि मात्रा ठरवतात, असे लिहिले होते.
होमियोपथीची पण औषधे अशीच, घ्यायची असतात ना ?
दिनेशजी होमीओपथी मध्ये
दिनेशजी होमीओपथी मध्ये बाराक्षारची औषधे उदा. काली फॉस, फेरम फॉस ( ही ताकदीनुसार असतात उदा. ३ एक्स, ६ एक्स ) तशी घेतली तर चालतात. मात्र प्रमाणातच आणी कधीतरी ( शक्यतो डॉ चा सल्ला घेणे हे उत्तम, कारण याला साईड् इफेक्ट आहेत ) घ्यावीत. बाकी बाराक्षार सोडुन मला माहीत नाहीत.
मला कधी याने त्रास झाला नाही. बाराक्षारचे पुस्तक पण आहे.
पुष्पौषधी पण तशी घेतली तर चालते, वर शोभाताईंनी लिहीले आहेच.
शोभाताई ऑलिव्ह पण आहेच की
विद्याक शशांक. दिनेशदा,
विद्याक शशांक. दिनेशदा, टुनटुन लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.दिनेशदा या औषधाना मात्रा नसते.स्वभाव्,मनःस्थिती यावर असल्याने व्यक्तीशी बोलल्यावर नेमके कोणते औषध द्यायचे याचा अंदाज येतो.आणि औषध लागु पडते.यासाठी तज्ञ असायची गरज नाही स्वतःच स्वतःला बरे करा हेच बाखचे म्हणणे होते. साधेपणा सोपेपणा हे त्यच्या औषधाचे वैशिष्ठ आहे.आंतर जालावर्चि माहिती वाचुनहि तुम्हि औषध घेउ शकता.औषधाचि अयोग्य निवड झाल्यास उपाय होणार नाही. पण अपायहि होणार नाही.त्यामुळे प्रयोग करायला हरकत नाही उपाय नाही झाल्यास विश्वास बसणार नाही त्यामुळे अभ्यास करुन औषध घेतल्यास जास्त बरे.माझ्या पुढिल लेखात याबद्दल सविस्तर लिहिनच.हि औषधे शारीरिक आजारावर नाहित मनःस्थितिवर,स्वभावावर आहेत हे मात्र नक्की लक्षात ठेवायला हवे.
टुन टुन माहितीबद्दल धन्यवाद.तु लिहिलेले बरोबर आहे.ऑलिव्ह शारिरिक थकव्यासाठि असल्याने जेष्ठाना उपयोगी आहे.माझा लि़हिण्याचा वेग खुप कमि आहे कालच्या दिवसाचे महत्व असल्याने थोडि घाइच झाली. बरेच मुद्दे राहिलेत पुनः सविस्तर लिहिन.शुद्धलेखनाच्या खुप चुका आहेत सॉरी.
मलाही होमिओपथीच्या ऑन
मलाही होमिओपथीच्या ऑन टॉन्सिलचा खुप चांगला अनुभव आहे. मी अगदी लहानपणी घेतल्या होत्या ( त्या काळात, गरज नसलेले टॉन्सिल्स चे ऑपरेशन करून, डॉक्टर लोकांनी, बंगले बांधले होते. ) नंतर कधीच त्रास झाला नाही..
पण निदान जेष्ठ नागरीकांना तपासून किंवा सल्ला देऊनच औषध दिले तर चांगले, खुपदा अशा माणसांना एकतर काय त्रास होतोय हे कळत नाही / किंवा जगातले सगळेच त्रास मलाच होताहेत, असे वाटत राहते.
हो कि नाही ?
कुठे मिळतात ही औषधे?
कुठे मिळतात ही औषधे?
होमिओपॅथीच्या दुकानात मिळतील
होमिओपॅथीच्या दुकानात मिळतील
दिनेशदा | 2 October, 2012 -
दिनेशदा | 2 October, 2012 - 19:34 नवीन
मलाही होमिओपथीच्या ऑन टॉन्सिलचा खुप चांगला अनुभव आहे. मी अगदी लहानपणी घेतल्या होत्या ( त्या काळात, गरज नसलेले टॉन्सिल्स चे ऑपरेशन करून, डॉक्टर लोकांनी, बंगले बांधले होते. ) नंतर कधीच त्रास झाला नाही..
दिनेशदा,
निषेध नोंदवतो आहे. ब्ल्यांकेट स्टेटमेंट अयोग्य आहे.
(सर्व चार्टर्ड अकाऊंटंट्स करबुडवेगिरीला प्रोत्साहन देतात, असे म्हणू का?)