असू दे...

Submitted by AmeyaRK on 11 March, 2025 - 03:09

माझ्यासाठी तुझे ते गाणे असू दे
सांगायास काही गाऱ्हाणे असू दे

तुझ्यासारखे कैक वेडे इथे रे
मज सारखे काही शहाणे असू दे

नवे यमक काही सुचलेच नाही
जुळलेले शब्द जुने पुराणे असू दे

विरहाचे क्षण आहे मनी पण
आठवणीत चोरून पाहणे असू दे

खरे सुख आहे तुझे तुज पाशी
जरा दुःख गोजिरवाणे असू दे

जीवनास या अर्थ नसेल तरीही
जगायास थोडे बहाणे असू दे

इथे काय सारेच कविवर्य नाही
दोन चार श्रोते दिवाणे असू दे
- अमेय
7387674171

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults