Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कसोटी, एक दिवसीय, २०-२०) एक
कसोटी, एक दिवसीय, २०-२०) एक संपूर्णपणे वेगळी टीम खेळवू शकेल.
आणी जिंकू पण शकेल!
>>>>>
कसोटीत नाही..
पण लिमिटेड ओवर क्रिकेट येस... नक्कीच दुसरा संघ देखील इंटरनॅशनल लेव्हलचा तगडा बनेल. ट्वेंटी मध्ये तर दोन्ही संघ इतके तुल्यबळ बनतील की आपसात सामना खेळवल्यास ज्याचा दिवस असेल ते जिंकतील. किंबहुना शर्मा, कोहली, जडेजा, आश्विन अश्या नुकतेच निवृत्त झालेल्या खेळाडूंना घेऊन तिसरा संघ सुद्धा बनू शकेल. धोनी सुद्धा त्यात खेळेल.
त्यांच्या मागण्या न्याय्य ???
त्यांच्या मागण्या न्याय्य ??? कुणी ठरवलं हे?>>> कसं आहे मागण्या/ तक्रारी ऐकूनच घ्यायच्या नाहीत, जर घेतल्या तरी त्यांना परस्पर केराची टोपली दाखवायची
>>
भारत दुबईत सामने खेळणार हे जाहीर झाल्यावर एकाही बोर्डाने अयसीसी कडे तक्रार केली नव्हती. भारत जिंकायला लागल्यावरही कुणीही ऑफिशिली तक्रार केलेली नाही. जुने खेळाडू (दोन्ही बाजूनी) टीप्पणीच्या पिंका टाकत असतात त्याला न्याय्य मागण्या समजणे अतर्क्य आहे.
तक्रारी ऐकून न घेणे / केराची टोपली दाखवणे वगैरे स्वतः च्याच समजुतींबद्दल रेटून बोलणे इथपर्यंत ठीक होतं, पण पुढे पोस्ट कायच्या काय वाढीव आहे. त्यामुळे इग्नोरास्त्र...
2009 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी
2009 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी मधे होस्ट साऊथ आफ्रिकेच्या सर्व माचेस सेंच्युरीअन ला होत्या. फायनल पण तिथेच होती. तेंव्हा कुणी न्याय्य मागण्या केल्याचं आठवत नाही...
बेदीला तसूभरही कमी न लेखता
बेदीला तसूभरही कमी न लेखता किंवा दोष तर अजिबात न देता, शिवलकरचं दुर्दैव फक्त मी अधोरेखित करतो आहे !! >> आलं लक्षात भाऊ. मीही बेदी किंवा शिवलकर दोघांनाही कमी जास्त धरायचे नसून त्यांच्या शैलीमधला फरक माहित नसल्यामूळे विचारत होतो. शेवटी निवड समितीलाही हा जजमेंट कॉल ठेवावाच लागतो. प्रसन्ना, चंद्रा असताना चौथा बॉलर वेंकट कि शिवलक्र कि गोअल असा कॉल असल्यावर कोणी तरी दोन जण डावलले न जाणे अशक्य आहे.
बायकांची फायनल सुरू आहे तिथे
बायकांची फायनल सुरू आहे तिथे मुंबई हारते. फायनलला नेऊन जिंकवणारा एकच होता. तो गेल्यापासून मुंबईची वाताहत सुरू झाले.
जिंकताहेत मुंबई बायका
जिंकताहेत मुंबई बायका
तिथे सुद्धा कॅप्टन इनिंग आली हरमन प्रीत कौर ची..
जिंकली मुंबई म्हणजे रोहित
जिंकली मुंबई म्हणजे रोहित शर्माचा राग आता शांत झालाय.
तो मोहसीन नक्वी म्हणतोय
तो मोहसीन नक्वी म्हणतोय यापुढे होस्ट संघाला डायरेक्ट सेमी मधे क्व्वालिफिकेशन द्यावं असं (न्याय्य) मागणं आयसीसी कडे करणार...
स्पर्धेत थेट एन्ट्री मिळतेच
स्पर्धेत थेट एन्ट्री मिळतेच यजमान संघाला. पहिल्या 8 मध्ये नसले तरी..
आणि थेट सेमी खेळवले तर काय सेमीचा फक्त एकच सामना खेळणार
जोपर्यंत कोणी काही अधिकृत मागणी करत नाही आणि ती आयसीसीतर्फे उचलून धरली जात नाही तोपर्यंत कुठे कोण काय बोलतेय यावर चर्चा करत आहात. वेस्ट ऑफ टाईम आहे सगळा. ते लोक एक वेळ जात नाही म्हणून बोलत आहेत आणि तुम्ही लोक वेळ जात नाही म्हणून चर्चा करत आहात. आयपीएल येतेय आता. तिच्या तयारीला लागा
15 मार्च 1877 ला मेलबोर्न
15 मार्च 1877 ला मेलबोर्न येथे ऑस्ट्रेलिया विं इंग्लंड असा पाहिला कसोटी सामना खेळला गेला, असं आत्ताच वाचनात आलं !
म्हटले तर या माहितीचा देखील
म्हटले तर या माहितीचा देखील आता काही फायदा नाही भाऊ...
पण तुम्हाला इथे द्यावीशी वाटली ही तुमची आवड
*म्हटले तर या माहितीचा देखील
*म्हटले तर या माहितीचा देखील आता काही फायदा नाही भाऊ...* - तुमचं हे अजब तर्कशास्त्र वाचून मी इथे मूकवाचक व्हावं की 'अवाक"वाचक व्हावं, या संभ्रमात पडलोय !!!
आणि तुम्ही लोक वेळ जात नाही
आणि तुम्ही लोक वेळ जात नाही म्हणून चर्चा करत आहात. <<
पहा हे कोण बोलतंय..
परवा कुणितरी म्हंटले होते की
परवा कुणितरी म्हंटले होते की भारत प्रत्येक प्रकारच्या सामन्यात (कसोटी, एक दिवसीय, २०-२०) एक संपूर्णपणे वेगळी टीम खेळवू शकेल.>> एक नाही तीन तीन.
आणि तिन्ही सेमी फायनलला येतील.

चॅम्पियन ट्रॉफी नंतरचे
चॅम्पियन ट्रॉफी नंतरचे फलंदाजांचे ताजे आयसीसी मानांकन पाहिले.
१ गिल
२ बाबर
३ रोहीत
५ कोहली
८ अय्यर
आपले खेळाडू आयसीसी स्पर्धा गाजवून इथे आहेत.
आणि तो बाबर फुसक्या टूसक्या मालिकात खेळून
अपवाद गिल, तो सुद्धा तसा आयसीसी स्पर्धात जेमतेमच आहे.
द्क्षिण आणि पश्चिम विभागाचा
द्क्षिण आणि पश्चिम विभागाचा वाद ज्या मॅचने चिघळला होता ती मॅच मी पाहिली होती. त्यात अबीद अली असला पाहिजे. मला आठवत नाही.
पण वादाचा प्रसंग स्पष्ट आठवतोय. मॅच पुण्याच्या नेहरू स्टेडियम मध्ये होती.
चेंडू बाउंड्रीच्या पलिकडे गेलाय अस समजून गैरसमजाने हैदर अली व त्याचा सहकारी क्रीझ सोडून गप्पा मारायला विकेट मधे आले. पण क्षेत्ररक्षकाने चेंडू परत फेकून हैदर अलीला बाद केले. नंतर त्यावर वाद झाला. वाडेकरने त्याला परत बोलावले नाही. त्यानंतर पश्चिम विभागाने पहिल्या डावाच्या निसटत्या अधिक्यावर सामना जिंकला. दोन टीम मधे फार कडवट पणा आला होता.
चंद्रशेखरने वाडेकरला पहिला बॉल बाउन्सर टाकून आपला निषेध नोंदवला होता.
इंटरेस्टींग एकदम विक्रमसिंह.
इंटरेस्टींग एकदम विक्रमसिंह. चंद्रा बाउंसर टाकतोय हे इमॅजिन करायलाच मजा आली. आजकाल स्लो लेग ब्रेक बाउन्सर टाकतात त्याचा पणजोबा
असे अजून काही किस्से आठवत असतील तर नक्की लिहा.
15 मार्च 1877 ला मेलबोर्न येथे ऑस्ट्रेलिया विं इंग्लंड असा पाहिला कसोटी सामना खेळला गेला >> मी मधे क्रिकेट चा उगम कसा झाला नि पहिल्या सामन्यामधे टेस्ट क्रिकेट ह्या स्वरुपामधे कसे पोहचले हे शोधण्याचा बराच प्रयत्न केला होता. बरेच अॅन्क्डोटल किस्से मिळाले पण सलग सुसंगत असा इतिहास नाहि मिळाला. परत शोधाशोध करायला हवी.
लारा vs तेंडुलकर फायनल ..
लारा vs तेंडुलकर फायनल .. कोण कोण बघतय?
“ 15 मार्च 1877 ला मेलबोर्न
“ 15 मार्च 1877 ला मेलबोर्न येथे ऑस्ट्रेलिया विं इंग्लंड असा पाहिला कसोटी सामना खेळला गेला” - कुठेतरी वाचल्यासारखं आठवतंय कि त्या वेळी खेळल्या गेलेल्या २ मॅचेसना नंतर अधिकृतपणे टेस्ट चा दर्जा दिला गेला.
“ क्रिकेट चा उगम कसा झाला” - काही वर्षांपूर्वी लोकसत्ता/लोकप्रभा मधे ह्या विषयावर एक मालिका आली होती. गुराख्यांच्या टाईमपास करण्यातून सुरू झालेल्या ह्या खेळाचा आजपर्यंतचा इतिहास. खूप रोचक माहिती/किस्से होते त्यात. सोळाव्या शतकात कुणा दोघा तरूणांवर, रविवारी सकाळी चर्चमधे न जाता क्रिकेट खेळल्याबद्दल गुन्हा दाखल होऊन, कोर्टाने त्यांना दंड केल्याचा किस्सा पण वाचल्याचं आठवतंय.
*असा पाहिला कसोटी सामना खेळला
अरे बाळा, फक्त पहिली कसोटीच खरी ऐतिहासिक महत्त्वाची , म्हणून अजूनही मला लग्नाचा वाढदिवस साजरा करावाच लागतो !!
आकडे महत्त्वाचे नाही म्हणता..
आकडे महत्त्वाचे नाही म्हणता....
मग लग्नाला किती वर्षे झाली हे जरा विसरून बघा
मास्टर लीग मध्ये सचिन चे यंदा
मास्टर लीग मध्ये सचिन चे यंदा फार कौतुक ऐकले. त्याचे बरेच इनिंग शॉट्स हे रीळ स्वरूपात ग्रूपवर आले ते बघण्यात आले..
पण का माहीत नाही मला ते सामने बघावेसेच वाटत नाही.
ज्या खेळाडूंना प्राईम मध्ये खेळताना पाहिले त्यांना आता म्हातारे होऊन खेळताना बघण्याची एक चाहता म्हणून हिंमत नाही माझ्यात
*आकडे महत्त्वाचे नाही म्हणता.
*आकडे महत्त्वाचे नाही म्हणता....* - इथे तारीख महत्त्वाची !!

आकडे महत्वाचे नाहीत, असं मी कधीच म्हटलेलं नाहीं; आकडेवारीतून निरर्थक शोध लावणं मला खटकतं. पण कुणाला तोही छंद असेल, तर त्याने तो खुशाल जोपासावा. जर क्रिकेटच्या धाग्यावर नाही जोपासला तर बरं, इतकंच. !!!
*लग्नाला किती वर्षे झाली हे जरा विसरून बघा * - हे विसरण शक्य असतं, तर तमाम पुरुषांचे
चेहरे सदैव टवटवीत नसते का दिसले ! आणि, मी तरी कशाला दुखावलेला अहंकार रिपेअर करायला इथे आलो असतो !
बाकी, जे जो वंच्छिल ते तो लाहो, हे आहेच !!
पण का माहीत नाही मला ते सामने
पण का माहीत नाही मला ते सामने बघावेसेच वाटत नाही.>>> +११११११
निरर्थक शोध बिलकुल नाही.
निरर्थक शोध बिलकुल नाही.
आकडेवारीतून जी महानता सिद्ध होते ती अधोरेखित करतो इतकेच.
उदाहरणार्थ, एखाद्या टॉप ऑर्डर खेळाडूची अर्धशतके किती आहेत आणि शतके किती आहेत याचे आकडे एखाद्याला निरर्थक वाटतील तर कोणाला त्यात conversion rate दिसेल.
एखाद्या खेळाडूचा करिअर एव्हरेज, आयसीसी स्पर्धेतील एवरेज, knock out सामन्यातील एवरेज.. यांना फिल्टर लावून वेगळे केले की तो खेळाडू मोठ्या स्पर्धेत आणि महत्वाच्या सामन्यात किती खेळतो आणि किती जिगरबाज आहे हे कळते.
जसे की बाबर आणि आपल्या विराट रोहीत मधील फरक इथे कळतो.
रोहीत शर्माचा बदललेला ॲप्रोच तसा आपल्याला बघून सुद्धा कळतो. पण sample size वाढली की तो बदल नेमका किती लक्षणीय आहे हे आकड्यात बघून कळते. नेमके आकडे आठवत नाही पण मध्यंतरी एका सामन्यादरम्यान पाहिले होते की आधी त्याचा पॉवर प्ले मधील स्ट्राईकरेट ७० घरात होता तो आता थेट १२५+ वगैरे झाला आहे. हा मोठा फरक आहे.
आणि हो, हे आकडे आपल्याला सामन्यादरम्यान दाखवतात. Extra innings मध्ये एक्सपर्ट याचे विश्लेषण करताना दाखवतात. सारे कोच आपले लॅपटॉप घेऊन हेच आकडेवर खेळत असतात. खेळाडूंचे प्लस मायनस पॉईंट पकडायला याच आकड्यांची मदत घेतली जाते. जर कोणाला आकड्यांचे खेळ आणि विश्लेषण आवडत नसेल तर त्यांनी तसे क्रिकेट बघावे आणि चर्चावे. माझी काही हरकत नाही.
मी ऑनलाईन सुद्धा स्कोर चेक करताना नुसते धाबा विकेट कोण खेळते इतके बघून थांबत नाही. तर बॉलरने कुठल्या length वर गोलंदाजी केली आहे, फलंदाजाने कुठे आणि कुठले शॉट मारले आहेत, फलंदाज किती % कंट्रोल मध्ये आहे (हो, हे सुद्धा दाखवतात), शेवटच्या पाच ओव्हरचा रनरेट काय आहे (थोडक्यात मोमेंटम कुठे आहे), सध्याच्या भागीदारीत मोठा वाटा कोणाचा आहे, वगैरे सगळ्या गोष्टी चेक करतो.
बरेचदा प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाच्या करंट फॉर्म बद्दल आपल्याला कल्पना नसते, ते सुद्धा मी त्यांच्या प्रोफाइल मध्ये घुसून चेक करतो. इतकेच नाही तर त्यांचा आपल्या विरुद्ध रेकॉर्ड किंवा सिमिलर कंडीशन / देशातील रेकॉर्ड सुद्धा चेक करतो.
प्रत्येक मॅचची preview पोस्ट मी आवर्जून वाचतो. खेळपट्टीची माहिती, त्या मैदानावरील आधीचे रेकॉर्ड, हेट टू हेड रेकॉर्ड, कोणत्या फलंदाजाचा कोणत्या बॉलर समोर विकनेस आहे.. अशा एक ना अनेक गोष्टीत मला फार इंटरेस्ट आहे. त्याशिवाय सामना बघितल्याचा मला आनंदच मिळत नाही
लाईव्ह सामना चालू असताना आमचा व्हाट्सअप क्रिकेट ग्रुप ओसंडून वाहत असतो. कित्येक जण कप्तान आणि विश्लेषकाच्या भूमिकेत असतात. काही बॉल किती अँगल टर्न होत होता, आता किती अँगल टर्न होतोय वगैरे आकडे दणादण आढळले जातात. तिथे त्यांची बॅट चालत असते आणि इथे आमची बोटं..
क्रमशः
लंच टाईम संपला..
थोडक्यात सांगायचा मुद्दा हा
क्रिकेट संदर्भात जे जे काही आहे ते सगळे आवडते
क्रिकेट पलीकडे काही अवांतर लिहित असेल तर जरूर बोला.
याऊलट काही जण इथे असेही आहेत जे क्रिकेटवर एकही पोस्ट लिहित नाहीयेत. फक्त माझ्यावर काहीतरी लिहायला मिळते म्हणून धाग्यावर हजेरी लावत आहेत. अशांची नावे घ्यायची गरज वाटत नाही, कारण त्यांच्या पोस्ट मी इग्नोरच करत आहे. या माझ्या पोस्टवर होणारा त्यांचा त्रागा सुद्धा तितक्याच विनम्रपणे इग्नोर केला जाईल
“ क्रिकेट चा उगम कसा झाला” -
“ क्रिकेट चा उगम कसा झाला” - काही वर्षांपूर्वी लोकसत्ता/लोकप्रभा मधे ह्या विषयावर एक मालिका आली होती. गुराख्यांच्या टाईमपास करण्यातून सुरू झालेल्या ह्या खेळाचा आजपर्यंतचा इतिहास. खूप रोचक माहिती/किस्से होते त्यात. सोळाव्या शतकात कुणा दोघा तरूणांवर, रविवारी सकाळी चर्चमधे न जाता क्रिकेट खेळल्याबद्दल गुन्हा दाखल होऊन, कोर्टाने त्यांना दंड केल्याचा किस्सा पण वाचल्याचं आठवतंय. Happy
Submitted by फेरफटका on 16 March, 2025 - 22:10
गुराख्यांचा खेळ म्हणजे नक्कीच आपल्या श्रीकृष्णाने शोधला असणार , कुठेतरी कधीतरी वाचल्याचे आठवते कि चेंडूफळी खेळत असताना चेंडू त्या डोहात गेला जिथे कालिया नाग होता मग तो आणायला गेलेली मुले विषारी पाण्यामुळे बेशुद्ध झाली नंतर श्रीकृष्णाने कालिया मर्दन केले इत्यादी इत्यादी , नालायक इंग्रजांनी आपल्या आर्थिक बौद्धिक संपत्तीसोबत चेंडूफळी / क्रिकेट शोधाचे श्रेय पण चोरले / लाटले कि वो
विषय इथून सुरू झालाय - *
विषय इथून सुरू झालाय - * Oldest/Youngest Players for India” - पॉइंट काय आहे ह्या माहितीचा? * फक्त त्याबद्दल व त्याबद्दलच बोलूया. काय पॉइंट आहे ते सांगा क्रिकेटचा व असल्या माहितीचा व आकडेवारीचा ?
संगणक येण्यापूर्वी शंभर वर्ष जे कसोटी क्रिकेट होतं त्यात असल्या माहितीने काय हातभार लावला, हे खरे क्रिकेटप्रेमी विचारणारच ना ! खूप जणांना असल्या आकडेवारीत रस असतो हे निश्चित त्याला उत्तर नाही !
भाऊ देखिल बळी गेले! त्यामुळे
भाऊ देखिल बळी गेले! त्यामुळे भाऊबळी झाले.
Oldest/Youngest Players for
Oldest/Youngest Players for India” - पॉइंट काय आहे ह्या माहितीचा?
>>>
त्या त्या खेळाडूंचे कौतुक आहे त्यात.. आधीच उत्तर दिले आहे मी.
आणि त्यात काय आक्षेपार्ह आहे हे नाही समजले.
आणि असेल तर सचिन सोळाव्या वर्षी भारतीय संघात आला असे कौतुक देखील कोणी मग करायला नको.. पण मला खात्री आहे ते इथे अनेकांनी कधी ना कधी केले असेलच. आणि तेव्हा कोणी म्हटले नसेल की सोळाव्या वर्षी आला मग त्यात काय एवढे मुद्दाम सांगण्यासारखे..
असो,
इथे कोणाला बुद्धीबळातील भारतीय विश्वविजेता गुकेश माहीत आहे का? आणि त्याचे वैशिष्ट्य माहीत आहे का?
रविवारी सकाळी चर्चमधे न जाता
रविवारी सकाळी चर्चमधे न जाता क्रिकेट खेळल्याबद्दल गुन्हा दाखल होऊन, कोर्टाने त्यांना दंड केल्याचा किस्सा पण वाचल्याचं आठवतंय.
>>>>>
इथल्या निकषावर मग या माहितीचा पॉइंट काय आहे?
संध्यानंद मध्ये यावी अशी बातमी आहे.
यामध्ये क्रिकेट प्रेमींना इंटरेस्ट आहे..
पण वर्ल्डकप स्पर्धेतील youngest oldest खेळाडू या माहितीत नाही.
खरेच, कमाल आहे
अर्थात अश्या पोस्ट शेअर करण्यावर मला काही आक्षेप नाही. ज्याला जे आवडेल ते त्याने एन्जॉय करा. आणि करू द्या
मला फक्त गंमत वाटतेय की इथे शर्मा बॉडी शेमिंग पोस्ट कोणी चकार शब्द काढत नाही, कोणी माझ्यावरच लिहायला येते आणि अवांतर पोस्ट टाकून जाते, अश्या संध्यानदछाप बातम्या येतात, ज्याला जे हवे ते करतेय, पण youngest oldest हा क्रिकेटमध्ये नेहमी चर्चिला जाणारा एक विषय पॉइंटलेस म्हणून त्यावर किस पाडला जातो
असो,
बहुधा पोस्ट काय आहे ऐवजी कोणाची आहे यावर हे ठरवले जात आहे. त्यामुळे आता या चर्चेत खरेच रस उरला नाही _/\_
ज्याला जे आवडेल ते लिहा.
मी मला आवडेल ते लिहितो.
आणि या नोटवर हा विषय माझ्यातर्फे थांबवतो इथेच
Pages