क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*दादा, धोनी, विराट, रोहीत हे चार कर्णधार मी असे पाहिले ज्यांना मी लीडर मानतो.* -
होय, पण हा झालासे कळस
अजित व देवें रचिला पाया I I

फार सविस्तर लिहीत नाहीं पण जिंकण्याची चटक व जिद्द प्रथम निर्माण केली ती अजित वाडेकर यांनी सोबर्सच्या बलाढ्य संघाचा वे. इंडिजमध्ये व मग इंग्लंडचा इंग्लंडमध्ये पराभव करून व तोही एकही खराखुरा वेगवान गोलंदाज, जागतिक कीर्तीचा एकही फलंदाज संघात नसता ना ( गावसकर ह्या विजयामुळे जागतिक दर्जावर पोचले ) ! नंतर, संघातल्या व देशातल्या कुणालाही 1983 च्या विश्वचषकात विजयाची आशा सोडाच, शंकाही नसताना, स्वतःच्या कामगिरीने संघाला प्रेरित करून अशक्यप्राय विजेतेपद काबीज करणारा कपिल देव हे तर भारतीय क्रिकेटसाठी युगंधर नेतृत्वच !!

पहिली गोष्ट तुला हि 'तू रोहित ला फॅन म्हणून ओन करतो नि इतर फक्त त्याचा द्वेषच करतात' ह्या दृष्टीकोनाच्या काविळीतून बरा होशील अशी प्रार्थना करतो. >>>>
fanboy.jpg

फार्स,
एखाद्या खेळाडूची बॉडी शेमिंग करणारे त्याचे द्वेष्टे नाही झाले का?
तुम्ही समर्थन करता का अश्या वृत्तीचे?
रोहितचे चाहते म्हणून नाही तर क्रिकेटचे चाहते म्हणून उत्तर द्या...

फार्स,
एखाद्या खेळाडूची बॉडी शेमिंग करणारे त्याचे द्वेष्टे नाही झाले का?
तुम्ही समर्थन करता का अश्या वृत्तीचे?
रोहितचे चाहते म्हणून नाही तर क्रिकेटचे चाहते म्हणून उत्तर द्या...

बाकी माझाच भक्त आणि चाहते हा धागा आहे
लिंक देतो.
https://www.maayboli.com/node/66805

भाऊ तुम्ही म्हणालात ते वरुन्ण्बद्दल त्याच्या पहिल्या स्टींट्मधे नक्कीच वाटलेले होते पण ह्यावेळी त्याने क्रीज नि फ्लाईट अतिशय चलाखिने वापरली आहे त्यामूळे त्याने काहि धड गिरवलेले आहेत असे वाटते. ग्लेन फिलिप्सला काढलेला बॉल नि त्या आधीचे बॉल्स बघा, क्रीज विड्थ एव्हढ्या सराईतपणे वापरली आहे कि मजा आली. अजून दोन वर्षे ही मॅजिक टिकली तर आफ्रिकेच्या वर्ल्ड कप मधे धमाल ञेईल.

Rusir.png

सर, चँपियन्स चषक स्पर्धा संपली. शर्माजींची आरती ओवाळायला काही नवा माल मिळत नाही, पण प्रतिसादांची भूक तर भागत नाही . बरोबर ना? आय पी एल सुरू होईपर्यंत परतत राहायला मसाला हवा ना? पण तुमचा इथला आग्रह बीअर बायसेप्सचे अश्लील व्हिडियो बघा म्हणून केलेल्या आग्रहासारखाच वाया चाललाय. नवीन काहीतरी शोधा.

मी तुमच्या दुसर्‍या एका धाग्यावर लिहिलं होतं , तेच पुन्हा लिहितो. तुमची कळकळ बीअर बायसेप्सच्या पॉडकास्ट मधल्या एक्स्प्रेशनइतकी - करेक्शन - एक्स्प्रेशन पेक्षाही अधिक फेक आहे.

वरून चक्रवर्ती बद्दल मागे वाचलेला एक लेख..
त्याच्यातील बदलाचे विश्लेषण आहे.
पहिल्याचा वरून नाहीये हा.. त्यामुळेच आशा होती.

https://m.cricbuzz.com/cricket-news/133280/varun-20-sharper-trickier-and...

एखाद्या खेळाडूची बॉडी शेमिंग करणारे त्याचे द्वेष्टे नाही झाले का? >>> हे खरंच बॉडी शेमिंग केली आहे का? यावर अवलंबून आहे. वस्तुनिष्ठपणे (Objectively)पाहूनही बॉडी शेमिंग आढळत असेल तर ते द्वेष्टे होतील. (मला तरी अद्याप तसे काहीही या धाग्यावर आढळले नाही,, असल्यास संदर्भ पुरवावा.)

तुम्ही समर्थन करता का अश्या वृत्तीचे?>>> वस्तुनिष्ठपणे (Objectively)पाहूनही बॉडी शेमिंग आढळत असेल तर समर्थन नाही.

ओके
या पोस्ट बद्दल मत व्यक्त करा.

>>>>>>

शर्माजींची पी आर कंपनी शर्माजींच्या गोबर्‍या गालांचे गालगुच्चे घ्यायला आणि थुलथुलीत पोटाला चिमटे काढायला तिकिटं लावून पैसे कमवू शकतील

>>>>>

ओके
या पोस्ट बद्दल मत व्यक्त करा.>>>>

मी  चुकत नसेन तर सदरहू पोस्ट (Submitted by भरत. on 30 January, 2025 - 12:05) भरत यांची आहे. 

त्यांच्या या पोस्ट मधील जे वाक्य तुम्ही कोट केले आहे ते त्यांच्या प्रतिसादाच्या पहिल्या परिच्छेदात आलेले आहे. स्वतंत्रपणे ( in vacuum ) हे वाक्य पाहिले असता इथे बॉडी शेमिंग झाली आहे असे वाटू शकते. पण माझ्या मते कोणत्या ही विधानाला कोणतेही लेबलिंग करण्या आधी त्याचा संदर्भ तपासून घ्यायला हवा.  तो पूर्ण परिच्छेद खालील प्रमाणे आहे. (बोल्ड केलेली वाक्ये  जाणीवपूर्वक केलेली आहेत - Devil is in the details) - 

"इन्स्टावर एक रील दिसली. शर्माजी (त्यांचा सध्याचा अवतार बघून आणि त्यांनी स्वतःच दो बच्चों का बाप हूं मैं, असे म्हटल्यावरून त्यांचं शर्माजी के बेटावरून शर्माजी असं प्रमोशन करूया. मुंबईच्या रणजी सामन्यासाठी फील्डिंगला उतरत आहेत. स्ताइलमध्ये गॉगल लावला. त्यालाच अमाप लाइक्स. बीसीसीआय आणि शर्माजींची पी आर कंपनी शर्माजींच्या गोबर्‍या गालांचे गालगुच्चे घ्यायला आणि थुलथुलीत पोटाला चिमटे काढायला तिकिटं लावून पैसे कमवू शकतील."

या परिच्छेदातल्या तुम्ही उचललेल्या वाक्याला रोहीत शर्माच्या रणजी पुनरागमना (जी की आंतरराष्ट्रीय स्तरावर इतका नावलौकिक मिळविलेल्या खेळाडुकरता एक गौण बाब आहे) प्रसंगी केल्या गेलेल्या पीआरची, आणि त्याला त्या पीआरवर त्याच्या फॅनबॉईजकडून मिळणाऱ्या अवास्तव प्रतिसादाची पार्श्वभूमी आहे. माझ्या दृष्टीने जर या वाक्याला असलेला संदर्भ (गौण बाबी करता मिळालेले अमाप लाईक्स) लक्षात घेतला, तर भरत यांचा रोख येथे सरळ सरळ रोहीत च्या गोबर्‍या गालांवर आणि थुलथुलीत पोटावर ( ज्या की सामान्य जीवनात कोणत्याही टॉम डिक हॅरी कडे गौणपणे आढळतात) नसून या गौण गोष्टींचेही कोडकौतुक तिकीटाचे पैसे मोजून करतील अशी मनस्थिती असलेल्या फॅनबॉईजच्या मूर्खपणावर आहे....आता फार फार तर याकरीता त्यांना आपण रोहित च्या फॅनबॉईजचे द्वेष्टे ( वापरलेल्या भाषेच्या स्वरूपामुळे ) म्हणू शकतो पण मला वैयक्तिकरित्या त्यांच्या या द्वेषाचे आश्चर्य वाटत नाही. कारण प्रत्येक सेलेब्रिटीच्या वॉल्सवर जन्माला आलेल्या आणि फोफावलेल्या या  फॅनबॉईजरुपी बांडगुळांनी, विचारस्वातंत्र्याच्या नावाखाली सोशल मीडियावर यत्र तत्र सर्वत्र जो उच्छाद मांडला आहे त्यामुळे ते पूजत असलेल्या सेलिब्रिटींचे भले कमी आणि नुकसानच जास्त होतेय अशी माझी ठाम समजूत होत चालली आहे. 

जर संदर्भांसहीत वरील विधानाचा विचार केला, तर ते वाक्य रोहितच्या बॉडी शेमिंग बद्दलचे नसून, त्याच्या फॅनबॉईजच्या मूर्खपणावर उपरोधिकपणे केली गेलेली एक टिपण्णी आहे.

प्रत्येक सेलेब्रिटीच्या वॉल्सवर जन्माला आलेल्या आणि फोफावलेल्या या फॅनबॉईजरुपी बांडगुळांनी, विचारस्वातंत्र्याच्या नावाखाली सोशल मीडियावर यत्र तत्र सर्वत्र जो उच्छाद मांडला आहे त्यामुळे ते पूजत असलेल्या सेलिब्रिटींचे भले कमी आणि नुकसानच जास्त होतेय अशी माझी ठाम समजूत होत चालली आहे. >> क्या बात कही है !

गंभीर ने ऑस्ट्रेलिया दौर्‍याची हार मनावर घेऊन इंग्लंड ला जाणार्‍या अ संघाबरोबर जायची तयारी आखवली आहे जेणेकरून त्याला बेंच स्ट्रेंग्थ अजमावता येईल. रोहित शेवटचा सामना खेळला नव्हता नि अजूनही तो टेस्ट मधे असेल कि नाही ह्यावर संबंधित पार्टीजकडून क्लियर इंडीकेशन नसल्यामूळे ही इंटरेस्टींग मूव्ह आहे असे वाटतेय. एकून समर मधला दौरा नि बाझबॉल ह्यामूळे अतिशय तगडा बॉलिंग अ‍ॅटॅक लागेल जो वापरून पॉम्स ना आवरावे लागेल. रोहित सकट बॅटींङ मधे फारसा काही मेजर बदल होईल असे वाटत नाही. आयपील नंतर फीट असले तर बुमरा, शमि, राणा, आकाश दीप ,सिराज असे नंबर्स लागतील असे वाटते. होपफुली बॅटासमन ला आधी नेऊन पुरेसा सराव होऊ देतील.

असमिजी, वरूणबद्दलच्या कोमेंट्साठी व ऋन्मेऽऽष, त्याच संदर्भातील लिंकसाठी खूप धन्यवाद. लिंकमधील ही शंका मलाही जाणवत होती असं असावं - " The shelf life of mystery bowlers in the world of T20s is often transient. " जर वरूण त्याने अंगिकारलेल्या नवीन तंत्रामुळे अधिक काळ प्रभावी ठरणार असेल, तर मी आधीच म्हटल्याप्रमाणे मला आनंदच आहे !

फार्स
समजला आपला स्टॅन्ड
मंडळ आपले आभारी आहे
धन्यवाद Happy

एखादा भारताचा राष्ट्रीय संघातील खेळाडू जर उच्च शारिरीक क्षमता राखत नसेल तर त्याबद्दल प्रश्न उपस्थित करणे अयोग्य नाही.
शारिरीक क्षमतेचा अभाव हा अक्षम्य आहे. क्रिकेटचेच उदाहरण घ्यायचे झाले तर विराट आणि रोहित यांच्या शारिरीक क्षमता, चपळाई मध्ये नक्कीच फरक आहे.
माझ तर मत आहे की एखादा खेळाडू अस म्हणत असेल की मी धावा करतोय , जिंकतोय तर तुमच्या बापाचे काय जाते, तर हा तुझा माज आहे.
तू क्षेत्ररक्षण करत असताना तुला लपवावे लागते कारण तू चपळ नसल्याने धावा देतोस आपण हरू शकतो. तू पुल करताना मंद हालचाली मुळे चेंडूवर उशीरा येतोस मामा बनतोस. नको रे. नको इतका माजू. तूझच आणि भारताच सुद्धा नुकसान आहे. जरा पोट कमी कर.
हे बॉडी शेमिंग नाही. तुझ्या जबाबदारीची जाणीव करून देण आहे. पुढील पिढी तुमच अनुकरण करते. सर्फराज खान ला फिट रहाण्यासाठी कोण मोटीवेट करणार?

रोहित शर्मा त्याच्या बॅटींग व कॅप्टनशीप साठी मला आवडतो.

असामी तुम्ही क्रिकेट खेळत असताना ट्रीपल सेंच्युर्‍या मारल्यात का हो. फारच पेशन्स आहे बुवा तुम्हाला. Happy
मला नसल्याने मला इथे खेळावसच वाटत नाही. सतत एकाच टप्प्यावरची बॉलिंग काय खेळायची.

तर त्याबद्दल प्रश्न उपस्थित करणे अयोग्य नाही.
>>>>

वर मी कॉपी पेस्ट केल्या पोस्टमध्ये ट्रोल केले गेले नसून प्रश्न उपस्थित केला होता असे आपल्याला वाटत असेल तर मंडळ आपले आभारी आहे Happy

समजा ते रोहितच बॉडी शेमिग असेल तर वाईटच आहे पण ह्याऊन वाईट म्हणजे रोहित वर मॅच फिक्सिंग चे आरोप करण. बर, जो माणूस कोणतेही पुरावे नसताना रोहित वर मॅच फिक्सिंग चे आरोप करतोय तोच रोहित च्या बॉडी शेमिंग च्या आरोपांना एवढ महत्व का देतोय?

*भाऊ वरूणकडे खूप वेरिएशन आहे अस मला वाटत.* - विक्रमसिंहजी, तो जाणीवपूर्वक त्यासाठी झटतो आहे, हेही ऋन्मेऽऽष यांनी पाठवलेल्या लिंकवरून स्पष्ट होतंय. होय, तो प्रभावी ठरण्याची दाट शक्यता खरंच सुखावणारी आहे !

वर मी कॉपी पेस्ट केल्या पोस्टमध्ये ट्रोल केले गेले नसून प्रश्न उपस्थित केला होता असे आपल्याला वाटत असेल तर मंडळ आपले आभारी आहे >> तुमच्या पोस्टशी काही संबंध नाही. काही मंडळांचे चेंडू आमच्या आवाक्याबाहेरचे असल्याने आम्ही नेहमीच सोडून देतो.
नाही म्हणता इथे लटकलोच. Happy

Gl0jtxebYAAVIQ7.jpeg

इंटरनेट, मायबोली, पीसी, कीबोर्ड फौज तो तुम्हारी सारी है,
पर ऑफिस मे बैठे सर हमारे अब भी सब पे भारी है.

2010 पूर्वी बीसीसीआय ला आयसीसी कसं ट्रीट करायचं हे बघूनही त्यावेळी मूग गिळून गप्प असलेल्यांनी आता बीसीसीआय च्या आयसीसी मधल्या डॉमिनेशन बद्दल बोलू नये.
They have taken enough efforts to reach where they are today...
आपला एकेकाळचा जगज्जेता संघ ODI WC, T20WC, CT तिन्ही मधे क्वालिफाय सुद्धा होत नसताना आपलं बोर्ड काय कन्स्ट्रकटिव्ह करतंय, आपल्या क्रिकेट बोर्डाला गेली काही वर्ष कोण आर्थिक मदत करतं आहे हे किमान बोलायच्या आधी बघून मग तोंड उचकटावं...

Pages