Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44
चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही
पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये
पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली
स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले
लाडकी बहीण जोरात चाललैये
विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शपथविधी समारंभात नाचगाणी
शपथविधी समारंभात नाचगाणी सुद्धा होती.
https://x.com/PTI_News/status/1864636738683195438
गायकाच्या ट्वीट्स
https://x.com/KANHIYAMITTAL30
जो राम को लाए है हम उनको लाएंगे
जय श्री राम जय श्री राम कहना है
बाबर के dna वालो से बचके रहना है
जय श्री राम
भारत मे रहना है तो जय श्री राम कहना है
प्रचार इथला संपत नाही.
प्रचार इथला संपत नाही.
आणि अभिजात भाषेचे लोणचे घालायचे.
त्या योगींनाच उप्र + महाराष्ट्र दोन्हीचे मुम करून टाकायचे असते.
सरपंच संतोष देशमुख
सरपंच संतोष देशमुख
सोमनाथ सूर्यवंशी
सोमनाथ सूर्यवंशी
उद्धव ठाकरे फडणवीसांना भेटले
उद्धव ठाकरे फडणवीसांना भेटले व 'झालं गेलं विसरून जा' म्हणाले
आज प्रत्ययाला आलेले
आज प्रत्ययाला आलेले वाक्प्रचार...
“दीवारों के भी कान होते हैं”
आणि
“दीवार पर सिर पटकना”
सांग सांग भोलानाथ
सांग सांग भोलानाथ
२३ डिसेंबरच्या आत खातेवाटप जाहीर होईल काय?
२३ डिसेंबर का? तर या दिवशी निक्काल लागल्याला एक महिना पूर्ण होईल ही गतिमान सरकारच्या कारभाराची चुणूक म्हणायची की दिल्लीच्या एकचालकानुवर्ती मॉडेलची कॉपी? खातेवाटप नावालाच?
खातेवाटप झालं की फडणवीस.३ सरकारच्या कारभाराचं कौतुक करण्यासाठी नवा धागा काढावा काय?
मुख्य गृह नी अर्थ भाजप
मुख्य गृह नी अर्थ भाजप/फडणवीसकडेच. इतरांच्या तोंडाला पाने पुसली?
तर, दरम्यान काय काय घडले:
तर, दरम्यान काय काय घडले:
■ जनतेने भाजप व महायुतीला कल्पनातीत बहुमत मिळवून दिले
■ एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हायला तयारी दर्शवली व शपथ घेतली.
■ ३९ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
■ उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले व 'झाले गेले विसरून जा' असे आर्जव केले. वर्तमानपत्रांनी असे छापले की 'आदित्य ठाकरे अडचणीत येतील असे कृपया काही करू नका' ही खरी नम्र विनंती होती.
■ शरदचंद्र पवार बाबा आढाव यांना भेटले. त्याचे पुढे काय झाले हे त्यांचे त्यांनाही कळले नाही.
■ EVM घोटाळा या विषयावर इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांनी काँग्रेसला असा सल्ला दिला की ते हॅक करून दाखवता येत नसेल तर त्याविरुद्ध भूमिका घेऊ नका. यामुळे, इंडिया आघाडीतील एकात्मता अधिक सबळ झाल्याचे वृत्त मात्र आलेले नाही.
■ भुजबळ साहेब नाराज असून आता शेवटचा पर्याय म्हणून भाजपच्या वाटेवर आहेत असे एक वृत्त आहे. त्यात ते असे म्हणताना दिसतात की शेवटच्या क्षणापर्यंत फडणवीस यांनी त्यांना मंत्रिपद मिळावे यासाठी प्रयत्न केले पण दादांनी ते मान्य केले नाही
■ स्थानिक पातळीवर शरद पवार, उद्धव ठाकरे, छगन भुजबळ व राष्ट्रीय पातळीवर राहुलजी गांधी यांना कायमस्वरूपी राजकीय निवृत्ती घेण्यासाठी व आराम करण्याची 'अकेला देवेंद्र' यांनी तजवीज केलेली असून "माझ्या" वगैरे महाराष्ट्राच्या बहुसंख्य जनतेची हीच इच्छा असल्याचे आता सर्वमान्य झाले आहे
■ मनोज जरांगे पाटील साहेब यांना आता 'काही भूमिका घ्यावी का आणि घ्यावी तर कोणाच्या बळावर' या संभ्रमाने पछाडलेले आहे
■ सुप्रिया ताई अकेल्या काय करणार याची राजकीय विश्वात उत्सुकता असेलही
ते अडीच वर्षांचं शपथपत्र
ते अडीच वर्षांचं शपथपत्र का काय आहे? की हे वर्तमानपत्रांनी खोटंच छापलं?
दरम्यानच्या काळात हे सुद्धा
दरम्यानच्या काळात हे सुद्धा झालं का?
"व्हिडीओमध्ये रुग्णालयात दाखल दलित महिलेला परभणी पोलिसांनी बेदम मारहाण केली.
पोलिसांनी तिच्या मांड्या आणि पोटावर उभे राहून तिच्या डोक्यावर व हातावर लाठ्या मारल्या. तिला शौचालय वापरायचे आहे असे तिने म्हटल्यावर पोलिसांनी तिचे पाय पसरले आणि तिच्या पायांवर मारले.
तिचा एक हात फ्रॅक्चर झाला असून, तिच्या डोक्याला झालेल्या जखमांसाठी तिला सीटी स्कॅन करावे लागेल.
हे एकमेव प्रकरण नाही! परभणीत आंबेडकरी वस्त्या लक्षित पोलिस अत्याचाराची अशी शेकडो प्रकरणे समोर आली आहेत! शेकडो!!"
२०१८ जानेवारीतल्या बंद दरम्यान झालेल्या हिंसाचार व त्यानंतरच्या पोलिस कारवाईची पुनरावृत्ती झाली का?
दरम्यान,
दरम्यान,
दीवारोंसे मिलकर रोना अच्छा लगता है
हम भी पागल हो जायेंगे ऐसा लगता है
ही ४६ जणांची कैफियत नोंदवून ठेवायची राहिली
अत्यंत वाईट घडले आहे. शब्द
अत्यंत वाईट घडले आहे. शब्द नाहीत.
नि:संदिग्ध शब्दांत लिहीत आहे.
कृपया धाग्याच्या विषयावर
कृपया धाग्याच्या विषयावर मतप्रदर्शन व्हावे ही 'एक वाचक' म्हणून विनंती!
आधीच्या प्रतिसादात कर्तरी
आधीच्या प्रतिसादात कर्तरी प्रयोग. आताच्या प्रतिसादात कर्मणी प्रयोग.
चालायचंच..
<< हे एकमेव प्रकरण नाही!
<< हे एकमेव प्रकरण नाही! परभणीत आंबेडकरी वस्त्या लक्षित पोलिस अत्याचाराची अशी शेकडो प्रकरणे समोर आली आहेत! शेकडो!!" >>
----- EVM मुख्यमंत्र्यांचा गृहखाते आपल्याचकडे ठेवण्याचा अट्टाहास का असतो याचे उत्तर मिळते.
परभणी दंगल घडवून आणणारे जवळच्या परिवारांतले असले तरी त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. अपराध आणि पोलीस लावत असलेली कलमे यांचा ताळमेळ असायला हवा अशी अपेक्षा फडणवीसांकडून ठेवता येत नाही.
परभणी मधल्या दंगलीमधे झळ बसणारी सामान्य जनताच आहे. प्रकाश आंबेडकरांना आता जाग आली आणि त्यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांशी संवाद साधला. काय उपयोग?
विधानसभा निवडणूक होण्याच्या आधी अकोल्यांत योगेंद्र यादव यांची सभा उधळण्याचा प्रयत्न झाला. योगेंद्र यादव तर कुठेही द्वेष, वैरभाव, हिंसा, जातीय तसेच धार्मिक तेढ पसरवत नाही आणि घटना/ आंबेडकरांप्रती आदरच व्यक्त करतात. सभा उधळण्यासाठी कुणी, कुणाला सुपारी दिली होती?
निवडणुका म्हणजे क्रिकेटचा
निवडणुका म्हणजे
क्रिकेटचाकुस्तीचा सामना असे भाजप समर्थकांना वाटते का, की पराभूत मल्लाने पुढल्या स्पर्धेपर्यंत मान खाली घालून गप बसून राहायचे ?विरोधी पक्षाशिवाय लोकशाहीला अर्थ नसतो. तशा निवडणुका तर रशिया आणि चीनमध्ये सुद्धा होतात.
तेव्हा निवडणुका झाल्या, प्रचंड बहुमताचे सरकार बनले म्हणजे पुढली पाच वर्षे इतर कोणी काही बोलायचे नाही, असा तुमचा समज असेल तर त्यातून बाहेर या. निवडून आलेल्या सरकारने सगळ्यांसाठी काम करणे अपेक्षित असते आणि त्याच्या कामावर चर्चा होणेही.
ज्यांना कोणाला पाच - दहा - पंधरा वर्षे आम्ही जिंकलो - तुम्ही हरलात म्हणून नाचायचे असेलत, त्यांनी खुशाल नाचत राहावे. पण इतर कोणी काय लिहायचे हे सांगायच्या फंदात कृपया पडू नये.
आणखी एक - मायबोलीचे सदस्यत्व घेतल्यापासून मी राजकारण ग्रुपात लिहितो आहे. २०१४ -१९-२४ या सार्वत्रिक व महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या काळात पाहिल्या. मी ज्याला पाठिंबा देतो त्या पक्षाची निवडणुकीतली कामगिरी खराब असली तर लपून बसायचं आणि चांगली झाली की कीबोर्ड बडवायचा असं मी करत नाही. पराभव झाल्यावर जिंकलेल्या लोकांचं अभिनंदनही केलं आहे.
मी राजकारण ग्रुपात लिहायचं थांबवावं अशी कोणाची कितीही इच्छा असली , तरी मी लिहायचे थांबवणार नाही.
धन्यवाद.
आज पुनःप्रत्यय आलेला
आज पुनःप्रत्यय आलेला वाक्प्रचार ...
“दीवार पर सिर पटकना”
..आता या भिताडाचं काय करावं??
अजित पवार आणि भास्कर जाधवांनी
अजित पवार आणि भास्कर जाधवांनी विधानसभा अध्यक्षांची शिकवणी घेतली. नाना पटोलेंनी हे असं बोलायला शिकून घ्यायला पाहिजे.
"मी लिहायचे थांबवणार नाही" हे
"मी लिहायचे थांबवणार नाही" हे सरांचे उद्गार कोणाच्या कोणत्या प्रतिसादाला उद्देशून असावेत हे बघत बसण्याइतका वेळ नाही.
त्यांनी लिहावेच, येथेच नाही तर वर्तमानपत्रात लिहून जनमानस बदलण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. येथे लिहून काय होणार, चार आठ समविचारी सदस्यांचे अनुमोदन मिळेल. त्यातले निम्मे अनिवासी भारतीय असणार!
असो, तर मुद्दा असा की उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांना आता काँग्रेसशी हातमिळवणी नको आहे, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उबाठा सेना आणि पटोले नको आहेत आणि जरांगे पाटील साहेब नक्की कोणाला हवे होते हे आता कोणालाच कळत नाहीये
उत्तम
अजित पवार आणि भास्कर जाधवांनी
अजित पवार आणि भास्कर जाधवांनी विधानसभा अध्यक्षांची शिकवणी घेतली. नाना पटोलेंनी हे असं बोलायला शिकून घ्यायला पाहिजे.>>>> Knowledge v/s Experience.... मी पाहिलेल्यांपैकी नारायण राणे सुद्धा विधानसभा कामकाजात फार हुषार होते....लोकसभेत त्यांची भाषेच्या अडचणीमुळे फारच गोची होते.
<< लोकसभेत त्यांची भाषेच्या
<< लोकसभेत त्यांची भाषेच्या अडचणीमुळे फारच गोची होते. >>
----- लोकसभेत त्यांना चांगला स्कोप आहे. बिदोरी यांची जागा रिकामी आहे. राणेंना भाषेची अडचण येणार नाही.
स्वच्छ भारत अभियानाचा पुढचा
स्वच्छ भारत अभियानाचा पुढचा टप्पा सुरु करायला हवा.
जर ठिकठिकाणी स्वच्छ सुलभ शौचालय निर्माण केले तर परिस्थिती नक्की बदलेल. शरिराच्या मर्यादा आहेत, आणि थांबणे हा पर्याय नाही आहे. परिस्थिती बद्दल वाईट वाटते.
कुण्या तरी देशमुखला कल्याणात
म्हणे कुण्या तरी देशमुखला कल्याणात एका शुक्लाने रॉडने बारा टाके पडेपर्यंत कूट...कूट....कुटला!!!...........मोदी एक है तो सेफ है चा चुना लावून गेला, आता उरलेली आपली सेफ्टी आपण पाहायची....त्याच काय आहे ना, मोदी रहाणार दिल्लीत, फडणवीस बसणार मंत्रालयात.....जरी त्यांना मत देऊन त्यांच्याकडून खूप साऱ्या आशा बाळगून त्यांच्याकडे त्यांचे समर्थक आशाळभूत नजरेने पाहत असले, तरी खूप दूर आहेत हो ही ठिकाणं प्रत्येक घटनास्थळा पासून....थोडे फार आत्मसंरक्षणाचे धडे गिरवा आणि मुलांनाही तयार करा आता, म्हणजे निदान आपण निवडून दिलेल्या मायबाप सरकारकडे मदत मागे पर्यंत तरी जिवंत राहू शकाल...
.मोदी एक है तो सेफ है चा चुना
.मोदी एक है तो सेफ है चा चुना लावून गेला>>>
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचा निकाल आला आहे. खरी शिवसेना कोणाची याचा जवळपास निर्णयही जनतेने दिला आहे. आता मुंबई महापालिका निवडणूक येत आहे. या निवडणुकीत मुंबईत कोणाच्या शिवसेनेचे वर्चस्व राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना शिंदेंनी उदार मन दाखविले आहे.
शिवसेना पक्ष ताब्यात आल्याने या पक्षाला मिळालेल्या देणग्या, पक्षाची कार्यालये आदी गोष्टी शिंदेंकडे गेल्या होत्या. यामुळे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यावरून वाद घालत होते. उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे पैसा नसल्याने निवडणूक लढविण्यासाठी आर्थिक अडचणी येत होत्या. या सगळ्यावर आता शिंदेंनी तोडगा काढला आहे. २०२२ पूर्वी शिवसेनेच्या खात्यात जमा असलेल्या रकमेवर शिंदे गट दावा सांगणार नाही असा निर्णय शिंदेंनी घेतल्याचे वृत्त आहे. आजतकने याची माहिती दिली आहे.
२०२२ पूर्वी शिवसेनेच्या खात्यावर जेवढी रक्कम होती ती उद्धव ठाकरेंच्या पक्षाला दिली जाणार आहे.
अरे वा.
अरे वा.
प्रवक्ते कम वार्ताहर..
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये
सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अडीच वर्षांतली सगळ्यांत मोठी साप्ताहिक घसरण. या दोघांना महाराष्ट्राचं नवं मंत्रीमंडळ आवडलं नाही का?
Pages