Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44
चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही
पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये
पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली
स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले
लाडकी बहीण जोरात चाललैये
विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काही समस्या नसेल तर एका
काही समस्या नसेल तर एका व्यक्तीला मतदानाला चार मिनिट हे खूप जास्त वाटते.
७अम- ६ पम ११ तासात फक्त ११५ लोकांचे मतदान होईल.
१ मिनिट धरला तर ६६०.
सर्वसाधारणपणे किती मते पडतात एका इव्हीएम मध्ये (आधीच्या निवडणूकी नुसार?)
आणि एकुण किती इव्हिएम्स वापरल्या महाराष्ट्रात.
त्यावरून हिशेब मांडता येईल.
हो. एका मतदाराला मतदान
हो. एका मतदाराला मतदान कक्षात ४-५ मिनिटे लागली, तरी यावेळी मतदानकक्षात लोकसभेसारखे एकावेळी एकच मतदार सोडत नव्हते. तेव्हा मिनिटला एक मत शक्य आहे. आयोग म्हणतो, एका मिनिटात जास्तीत जास्त पाच मते नोंदवता येतात.
हे ECI च्या वेबसाईट वरून EVM
हे ECI च्या वेबसाईट वरून EVM च्या FAQ मधून घेतले आहे. या नुसार बटण प्रेस केल्या केल्या लगेच निवडलेल्या चिन्ह समोरील लाईट पेटते, त्याच वेळी लॉन्ग बीप ऐकू येतो आणि वोटर च्या खात्री साठी VVPAT वर स्लिप जनरेट होते. आता जर हा क्रम ध्यानात घेतला तर मी स्वतः जेंव्हा मतदान केलं तेंव्हाच्या क्रमात खालील प्रमाणे तफावत होती.
- बटन दाबल्यावर लगेच निवडलेल्या उमेदवाराच्या चिन्हासमोरील लाईट पेटली
- नंतर VVPAT वर स्लिप जनरेट झाली
- जवळपास ३ सेकंदांनी लॉन्ग बीप झाली (जोपर्यंत मी VVPAT वरची स्लिप पाहून EVM पासून बाजूला झालेलो )
इथे जर लॉन्ग बीप लगेच ऐकू येणे अपेक्षित असेल तर बीप ऐकू यायला ३ सेकंदांचा वेळ का जातो? आणि जर तसा वेळ जाणे अपेक्षित असेल तर ते त्याप्रकारे नमूद असायला हवे. सगळा भोंगळ कारभार करून ठेवलाय. यांच्या बाबाचं राज आहे.
"At 5 pm on the 20th, the
"At 5 pm on the 20th, the turnout in Maharashtra was deemed to be 58.22%." भ्रमर तुम्ही दिलेल्या लिंकमधुन.
हा बेस असेल हिशेबाचा तर ताशी ५.८% मतदान होत होते,.
त्यापुढे आणखी ७.८ % मतदान होण्यास दीड तास पुरेल.
त्यापुढे आणखी ७.८ % मतदान
त्यापुढे आणखी ७.८ % मतदान होण्यास दीड तास पुरेल. >>> +१००%
मारकरवाडीत दडपशाही सुरू.
मारकरवाडीत दडपशाही सुरू. बॅलेट पेपरवर गावकरी करणार होते म्हणून.
https://www.lokmat.com/maharashtra/voting-today-in-markadwadi-malshiras-...
झाली हुकूमशाही सुरू. निवडणूक आयोग नी भाजपा घाबरतय का? चोराच्या मनात चांदणं?
आजच्या लोकसत्तेत ''त्या' ७४
आजच्या लोकसत्तेत ''त्या' ७४ लाख मतांची उकल असा एक लेख आला आहे. लेखक - केतन पाठक - देवेंद्र फडणवीस यांचे माध्यम सल्लागार.
---
महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या ट्विटर हँडलवर काही स्पष्टीकरणे दिली जात आहेत.
https://x.com/CEO_Maharashtra
---
एकनाथ शिंदे अडून बसण्याचं एक मोठं कारण माझ्या लक्षातच आलं नव्हतं. लोकसभेत भाजपला बहुमत नाही. आणि शिंदेंकडे ७ खासदार आहेत.
>>> लोकसभेत भाजपला बहुमत नाही
>>> लोकसभेत भाजपला बहुमत नाही. आणि शिंदेंकडे ७ खासदार आहेत.
खरंय, महत्वाचा मुद्दा!
एकनाथ शिंदे अडून बसण्याचं एक
एकनाथ शिंदे अडून बसण्याचं एक मोठं कारण माझ्या लक्षातच आलं नव्हतं. लोकसभेत भाजपला बहुमत नाही. आणि शिंदेंकडे ७ खासदार आहेत.>>> शिंदे ही हाराकिरी करतील याची सुतराम शक्यता सध्यातरी नाही.
भाजपला लवकरच पुढलं ऑपरेशन
भाजपला लवकरच पुढलं ऑपरेशन लोटस हाती घ्यावं लागेल.
कालच्या लोकसत्तेत एक लेख होता - भाजप प्रादेशिक पक्षांना कशा प्रकारे गिळंकृत करत चालला आहे. उद्धव ठाकरेंना याची कल्पना आली होती. शिंदेंना गळाला लावायचे प्रयत्न २०१९ च्या आधीपासून म्हणजे युती सरकार असतानाच होत होते. म्हणूनच नोव्हेंबर २०१९ मध्ये ठाकरे अडून बसले. आता त्यांचा पक्ष संपवल्यात जमा आहे. आता शिंदेंची पाळी. यासाठीच पुरेसं बहुमत असताना अजित पवारांना घेतलं. तू मैके चली जाएगी तो मैं दूजा ब्याह रचाउंगा, तेरी सौतन लाउंगा.
<< लोकसभेत भाजपला बहुमत नाही.
<< लोकसभेत भाजपला बहुमत नाही. आणि शिंदेंकडे ७ खासदार आहेत.>>
----- सात फाइल्स CBI, ED कडे धूळ खात पडल्या आहेत. एक एक करत कधी झटकायची धूळ?
एका खोक्यात घालून सुरतला घेऊन
एका खोक्यात घालून सुरतला घेऊन जायचे. So Simple.
शिंदे, गुरूची विद्या...
भाजपला लवकरच पुढलं ऑपरेशन
भाजपला लवकरच पुढलं ऑपरेशन लोटस हाती घ्यावं लागेल. >>> असं काही करावं लागेल हे वाटत नाही, शिंदे आणि त्यांचे साथीदार हे आधीच पिकलेल्या फळाप्रमाणे आहेत. कालच कुठेतरी न्युज वर ऐकलेलं शिंदेंच्या निवडून आलेल्या ५७ उमेदवारांपैकी ६ उमेदवार भाजपचे आहेत (अजित पवारांच्याकडे भाजपचे ४ का ५ आहेत) जे शिवसेनेच्या तिकिटावर लढले, बाकी, सरनाईक, शिरसाट, गुलाबराव यांची आणि त्यांच्यासारख्या इतरांची निष्ठा ज्याच्या हाती ईडीचा कासरा त्याच्याच बरोबर राहणार हे काही वेगळे सांगायला नको. अति ताणलं तर प्रसंगी शिंदेचे सहकारीच शिंदेला पालथा पडून त्याच्या बुडावर कमळ खोवायला कमी करणार नाहीत हे शिंदे पण पूर्ण ओळखून आहे.
तेच ऑपरेशन लोटस ना.
तेच ऑपरेशन लोटस ना.
राम विलास पासवानांच्या लोकजनशक्ती पक्षाचं उदाहरण घ्या. त्यांना वापरून नितीशकुमारच्या जागा कमी केल्या. मग लोकजनशक्ती पक्ष फोडला. फुटलेल्यांना आपल्यात घेतलं. नवी निवडणूक आली तशी यांना वापरून केरारंच्या डब्यात टाकलं आणि निष्ठावान राहिलेल्या चि राग पासवानला जवळ केलं.
हे सगळे लोक अडतात ते फक्त आम्हांला अधिक मलिदा कसा मिळेल यासाठी. हे लिहिताना मला २००९ साली अमेरिकेशी नागरी अणु कराराच्या मुद्द्यावरून सरकारचा पाठिंबा काढून घेणारे कम्युनिस्ट आणि त्या करारासाठी सरकार पणाला लावणारे डॉ मनमोहन सिंग आठवले.
शिंदे माझ्या मुलाला केंद्रात मंत्री करा म्हणून अडतील. आता भाजपवाले म्हणतात शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मोदींच्या केंद्रात मंत्री करायचं होतं. का झाल्या नाहीत, तो प्रश्न पडून घ्यायचा नाही.
हे लिहिताना मला २००९ साली
हे लिहिताना मला २००९ साली अमेरिकेशी नागरी अणु कराराच्या मुद्द्यावरून सरकारचा पाठिंबा काढून घेणारे कम्युनिस्ट आणि त्या करारासाठी सरकार पणाला लावणारे डॉ मनमोहन सिंग आठवले.
+१००
डॉ. मनमोहन सिंगांना कोणी कितीही नावे ठेवो, इतका ठामपणे निर्णय घेऊन कुठेही राष्ट्रप्रेमाच्या जाहिराती केल्या नाहीत.
डॉ. मनमोहन सिंगांना कोणी
डॉ. मनमोहन सिंगांना कोणी कितीही नावे ठेवो, इतका ठामपणे निर्णय घेऊन कुठेही राष्ट्रप्रेमाच्या जाहिराती केल्या नाहीत.>> मागासपणा दुसरं काय. देशाच्या सैनिकांनी देशासाठी दाखवलेल्या पराक्रमाचे श्रेय निवडणुकीत स्वतःच्या नावावर घेणे सर्वानाच जमते असे नाही, तिथे जातीचेच पाहिजेत.
यांच्या हलगर्जीपणामुळे की
यांच्या हलगर्जीपणामुळे की आणखी कशामुळे पुलवामात मारल्या गेलेल्या सैनिकांच्या नावावर यांनी मतं मागितली. आणखी काय हवं?
सोनिया गांधींचे विधान
सोनिया गांधींचे विधान 'त्यांनी ' निर्लज्जपणे खरे करून दाखवले.
मारकरवाडीत मतदान बॅलेट पेपर
मारकरवाडीत मतदान बॅलेट पेपर वरच व्हायला हवे, नाहीतर काही खरं नाही.
माझा तरी ईव्हीएम वर संशय आहे
मुख्य निवडणूक आयुक्त
मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र म्हणतात - झारखंडमध्ये मतदानाची वेळ संध्याकाळी ५ पर्यंत होती. महाराष्ट्रात ६ पर्यंत. झारखंडमधले मतदार सामान्यतः लवकर मतदान करून गेले. त्यामुळे ५ वाजता रांगा नव्हत्या. महाराष्ट्रात ६ वाजता अनेक ठिकाणी रांगा होत्या.
२०१९ साली सुद्धा पाच वाजेपर्यंतची आकडेवारी आणि अंतिम आकडेवारी यांत ७% इतका फरक होता. शहरी आणि निमशहरी भागत लोक संध्याकाळी मतदानाला बाहेर पडतात. (लोकसभेच्या वेळी सकाळपासून का आले , भर मे महिन्यात भर दुपारी रांगा का होत्या, असं विचारायचं नाही. संध्याकाळी सुद्धा होत्याच.) दर दोन तासांनी दिलेली आकडेवारी फोनवर मिळालेल्या माहितीवर आधारित असते. फॉर्म १७ सी मधली माहिती पक्की असते.
https://x.com/CEO_Maharashtra
राजकीय पक्षांच्या बूथ कार्यकर्त्यांवर सगळी मदार आहे. जितेंद्र आव्हाडांनी आपण काय काय खबरदारी घेतली ते लिहिलं आहे. महाविकास आघाडीला बूथ कार्यकर्त्यांचं महत्त्व कळलं होतं का, निष्ठावान आणि निर्भीड कार्यकर्ते तेवढ्या संख्येने तिथे होते का? यावर बरंच अवलंबून आहे.
कदाचित जितेंद्र आव्हाडांचा
कदाचित जितेंद्र आव्हाडांचा मतदारसंघात चांगली EVM पोहचली असणार म्हणूनच जिंकले असतील.
आव्हाडांचं ते ट्वीट https://x
आव्हाडांचं ते ट्वीट https://x.com/Awhadspeaks/status/1860995285054312488
त्याबद्दलची मोहसीन शेख यांची मुलाखत
>>> कदाचित जितेंद्र
>>> कदाचित जितेंद्र आव्हाडांचा मतदारसंघात चांगली EVM पोहचली असणार म्हणूनच जिंकले असतील.
सोनिया गांधींचे विधान
सोनिया गांधींचे विधान 'त्यांनी ' निर्लज्जपणे खरे करून दाखवले.>> आग्या १९९० तुम्हाला मणीशंकर अय्यर म्हणायचे आहे का?
बिझिनेस स्टँडर्डची बातमी
बिझिनेस स्टँडर्डची बातमी आहे - शिंदे म्हणतात मी (पक्ष) सरकारात सामील होत नाही. भाजप राकॉ ( अजित पवार) यांचा यावर बेत असा की शिंदेंना विरोधी पक्षनेते करायचं. म्हणजे दोन्हीकडे आपलेच लोक.
म्हणजे २०१४ - २०१९ मध्ये विखे
म्हणजे २०१४ - २०१९ मध्ये विखे पाटलांनी केलं तेच.
हो हो
हो हो
वरुण ग्रोव्हरच्या काँग्रेसबद्दलच्या त्या विनोदाचं जिवंत उदाहरण.
मी ही निवडणूक मोठ्या
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..?
1 ऑगस्ट 2024 रोजी ठाणे जिल्ह्यात EVM मशिन्सची FLC प्रक्रिया सुरू होणार असल्याची पहिली नोटीस आम्हाला निवडणूक आयोगाकडून आली.
माझी एक टीम,ज्या मध्ये माझा कार्यकर्ता मोहसीन शेख आणि जिंदा सांडभोर हे त्यांच्या 25 सहकाऱ्यांच्या सोबत पहिल्या दिवसापासून या गोष्टीसाठी सज्ज होते.शिवाय त्यांच्या सोबतीला वकिलांची एक टीम देखील कामाला लागली होती.
जशी ही नोटीस मिळाली,माझ्या या टीमने यात पूर्ण गांभीर्याने लक्ष घालत अगदी पहिल्या दिवसापासून या सगळ्या प्रक्रियेवर अगदी करडी नजर ठेवली.
EVM मशीन संदर्भात,
FLC (First Level Checking)
Randomisation I
Randomisation II
COMMISSIONING
या प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून पार पाडल्या जातात.
या प्रत्येक प्रक्रियेवर माझ्या टीमने लक्ष ठेवले.
निवडणूक आयोगाकडून हलगर्जीपणा होत असल्यास तो त्यांच्या लक्षात आणून दिला,
चुका होत असल्यास त्यात माझी मदत घेऊन त्या दूर केल्या,
प्रसंगी संबंधित अधिकारी लोकांच्या सोबत वाद घातले,गोड बोलून काम करून घेतली..यामागे एक रणनीती होती.ती म्हणजे या लोकांना EVM संदर्भात सुरू असणाऱ्या प्रत्येक बाबींवर लक्ष आहे,याची जाणीव त्यांना करून देण्याची.
अगदी EVM च्या transport देखील आमचं लक्ष होत.दरवेळी EVM एखाद्या ठिकाणावरून दुसरीकडे हलविण्यात येणार असतील तर त्या सगळ्या गाड्यांच्या मागे या टीम मधील लोक आपल्या गाड्या घेऊन निघायचे.हे करताना ECI योग्य ते प्रोटोकॉल पाळत आहे की नाही,यावर देखील त्यांचं लक्ष असायचं.आणि काही गडबड असल्यास माझ्या लक्षात आणून द्यायचे.
(एक गाडी without पोलीस प्रोटेक्शन, EVM घेऊन बाहेर निघाली होती,त्या संदर्भातील ट्विट तुमच्या लक्षात असेल.)
ECI च्या सगळ्या प्रक्रिया आम्ही पार पाडल्या असल्याने,
आमच्याकडे कोणत्या बूथ वर कोणती मशीन जाणार आहे,याचे तपशील होते.
ते आम्ही आमच्या पोलिंग एजंट ला दिले.
परिणामी आमच्या बुथवर इतर कोणत्या मशिन्स आणण्याची हिम्मत इथ कोणी करू शकल नाही.
Counting ला जाताना देखील माझ्या या काउंटीग एजंट ना वरील सगळी माहिती आम्ही दिली होती.त्यांची प्रशिक्षण यावर झाली होती.
थोडक्यात सांगायचं तर EVM संदर्भातील छोट्यातील छोट्या गोष्टींवर आम्ही लक्ष ठेवलं.परिणामी कोणतीही धांदली माझ्या मतदार संघात होऊ शकली नाही.आणि मी मोठ्या मताधिक्याने माझ्या मतदार संघातून निवडून आलो...!
- आव्हाडांचे ट्विट.
ते ९६००० च्या मताधिक्याने निवडून आलेत.
बरोबर आहे. ईतर ठिकाणी धांदली झाल्यामुळेच भाजपेयी जिंकलेत. आव्हाडांच्या मतदारसंघात लाडक्या बहिणी नव्हत्या का? इव्हीएम वरून नजर हटली की भाजप्या जिंकलाच म्हणून समजा.
२०१९ ला धुळे विधानसभा
२०१९ ला धुळे विधानसभा मतदारसंघात अनिल गोटे हे २४ तास इव्हीएम सोबत होते. म्हणजे सगळे इव्हीएम घेऊन गेले त्या मागे त्यांच्या दोन गाड्या होत्या. नंतर ३ दिवस इव्हीएम जिथे ठेवले होते त्या जागेला त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेरून ठेवले होते, दोन लोक मध्ये घुसत होते त्यांना पकडले होते, त्यांचा काही संबंध नव्हता म्हणजे अनोथोराईस लोक होते ते. परिणामी काही न करता आल्याने भाजप पुरस्कृत उमेदवार पडला. ह्यावेळी तसे काहीही ना झाल्याने गोटे+ शिवसेना अशी सगळी हक्काची मते गायब झाली.
अति ताणलं तर प्रसंगी शिंदेचे
अति ताणलं तर प्रसंगी शिंदेचे सहकारीच शिंदेला पालथा पडून त्याच्या बुडावर कमळ खोवायला कमी करणार नाहीत हे वाचून भयंकर हसलो.
Pages