Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज दुसरी फ्लाइट येते आहे
आज दुसरी फ्लाइट येते आहे.Unlikely in the first deportation move, the second group of deportees will likely not be in chains, sources said. असं इंडियन एक्स्प्रेस म्हणतो.
अवैध रितीने अमेरिकेत वास्तव्य
अवैध रितीने अमेरिकेत वास्तव्य करणार्या/ शिरणार्या भारतीयां चे तिसरे विमान आले. हाता-पायांत बेड्या घालून पाठविण्याचे प्रकार काही थांबत नाही.
अमेरिकेत अवैध रितीने वास्तव्य
अमेरिकेत अवैध रितीने वास्तव्य करणार्या १५००० भारतीयांना भारतात परत पाठविणार होते, केवळ १०४ लोकांनाच पाठविले कारण टफर मोदी यांच्यासोबत वाटाघाटी होत होत्या.
१०४ अवैध भारतीय लोक अमेरिकेत पकडले गेले. अगदीच कठोर शिक्षा मिळणार होती , टफर निगोशिएटर ने वाटाघाटी केल्या आणि केवळ हाता-पायांत साखळदंड घालून जिवंत पाठविले. >>>>>>>
अवैध रितीने अमेरिकेत वास्तव्य करणार्या/ शिरणार्या भारतीयां चे तिसरे विमान आले. हाता-पायांत बेड्या घालून पाठविण्याचे प्रकार काही थांबत नाही. Sad>>>>>>
१०४ लोकांसाठी ३ विमाने? अवैध पकडलेल्यांना परत पाठवले ही त्यांना कडक शिक्षा नाही़ का? तिकडे अवैध घुसायला त्यांनी किती मेहनत केली होती व किती पैसा खर्च केला होता.
दुसर्या देशात जाऊन गुन्हा करणार्या पण स्वदेशात गुन्हेगार नसलेल्या मंडळींना भारत सरकारने स्वतःची विमाने पाठवुन आणायला हवे होते का?
आतापर्यत तीन फेर्या झाल्या
आतापर्यत तीन फेर्या झाल्या आहेत. प्रत्येक विमानांत १०० पेक्षा जास्त भारतीयांना आणून सोडतात. म्हणजे ३०० पेक्षा जास्त भारतीय परतले आहेत.
अवैध रितीने अमेरिकेत वास्तव्य करणार्या भारतीयांना या आधी पण भारतात परत पाठविले आहे. पण या वेळी मानहानी कारक रितीने हाता-पायांत बेड्या घालून आणि खास लष्करी विमानातून. हे असे पहिल्यांदाच झाले आहे.
<< दुसर्या देशात जाऊन गुन्हा करणार्या पण स्वदेशात गुन्हेगार नसलेल्या मंडळींना भारत सरकारने स्वतःची विमाने पाठवुन आणायला हवे होते का? >>
------- ते गुन्हेगार नाही आहेत, भारतीय आहेत आणि म्हणून एका मानवीय भावनेतून सन्मानाने परत आणायला हवे असे मला वाटते. पचायला अवघड आहे.
आता हा खर्च कोण सोसणार ? एजंटांना मिळालेत ना प्रत्येकी ५० लाख ते एक कोटी रुपये. ED, CBI कडून त्यांच्यावर ( आणि त्यांना मागे घालणार्या राजकीय नेत्यांवर ) कडक कारवाई करायची आणि हा पैसा वसूल करायचा. undocumented लोकांची संख्या ७००,००० पेक्षा जास्त आहेत म्हणजे लाखो कोटींचा व्यावसाय आहे.
ते अमेरिकेचे गुन्हेगारच आहेत.
ते अमेरिकेचे गुन्हेगारच आहेत. आणि कदाचित भारताचेही आहेत.वाटेत लागणाऱ्या इतर देशांचेही गुन्हेगार आहेत. अतिशय थंड डोक्याने कट रचून त्यांनी गुन्हा केला आहे. त्यांना सन्मानाने आणण्याचं काहीही कारण नाही.
(No subject)
त्यांना भारताने आणले नाहीय,
त्यांना भारताने आणले नाहीय, अमेरिकेने पाठवले आहे.
विमान त्यांचे, खर्च त्यांचा त्यामुळे कसे पाठवयाचे हे त्यानी ठरवले. भारतीयांच्या घरात कोणी गुपचुप घुसला तर ते त्याची प्रेमाने उठबस करतील, बनावट कागद बनवुन नागरिक पण बनवतील पण सगळेच देश इतके स्थितप्रज्ञ नसतात.
भारताने स्वतचे विमान पाठवले असते, जसे ऑफिशियल मार्गाने परदेशी गेल्यावर तिथे अस्मानी किंवा सुलताने संकटात अडकलेल्या भारतियांना वेळोवेळी आणलेय तसे, तर कदाचित सन्मानपुर्वक आणता आले असते. भारतात राहणे नको, अमेरिकाच हवी यासाठी कोट्यावधी खर्च करणारे, जीवावर उदार होणारे लोक भारताने विमाने पाठवली असती तर किती आनंदाने त्यात बसले असते हे त्यांनाच माहित. अमेरिकेने साखळदंडाने बांधुन बिपिएल दिले तेव्हा ते विमानात चढले
आता हा खर्च कोण सोसणार ? एजंटांना मिळालेत ना प्रत्येकी ५० लाख ते एक कोटी रुपये. ED, CBI कडून त्यांच्यावर ( आणि त्यांना मागे घालणार्या राजकीय नेत्यांवर ) कडक कारवाई करायची आणि हा पैसा वसूल करायचा. >>>>>>
भारत सरकारने स्वतःचे विमान पाठवलेच नाही तर खर्च कसला झाला??
काहीही हं उदय. सन्मानाने
काहीही हं उदय. सन्मानाने वागवायला काय त्यांनी बिल्किस बानोंच्या कुटुंबीयांचा खून करून तिच्यावर बलात्कार केला होता का?
गेल्या वर्षी , म्हणजे बिडेन
गेल्या वर्षी , म्हणजे बिडेन राज्यात आणि अमेरिकन अध्यक्षीय निवडणुका होण्यापूर्वीही अमेरिकेने बेकायदा शिरलेल्या भारतीयांना परत पाठवायला चार्टर्ड प्लेन भाड्याने घेतलं होतं.
त्या आधीच्या वर्षी कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना परत पाठवलं तेव्हा भारत सरकारने मानवतावाद व न्याय्य असे शब्द वापरले होते. Canadian authorities were urged to be fair and take a humanitarian approach since the students were not at fault," Muraleedharan said.
ट्रंपने हे काम होम लँड सेक्युरिटीज कडून काढून आर्मीला दिलं. बिडेन पर्वात ट्रंप पहिल्या पर्वापेक्षा अधिक घुसखोरांना परत पाठवलं होतं. पण त्याच्या अशा बातम्या होत नसत. तेव्हा ट्रंप आपल्या मतदारांना खुष करायला हे लष्करी विमान, हातकड्या, साखळ्या इ. करतो आहे. आपले विश्वगुरू त्याबद्दल काही करू शकणार नाहीत. त्यांनी अमेरिका भेटीत घालीन लोटांगण वंदीन चरण केलेलं आहे, हे विविध करारांवरून दिसतंच आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकांचे
दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्याला आज ८ दिवस पूर्ण झाले. अजून मुख्यमंत्री ठरला नाही.
महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी शपथ घ्यायला निकालानंतर १२ दिवस लागले होते. तिथे युती तरी होती. इथे तेही नाही.
विश्वगुरूंनी ट्रम्पवर डोळे
विश्वगुरूंनी ट्रम्पवर डोळे वाटारले का? कदाचित म्हणून सूडबुद्धीने ट्रम्पने हे पुन्हा केले असेल. आणि वर आपल्यावर बरेच काही लादले ते अलाहिदा
ह्यावेळी काही शिखांच्या
ह्यावेळी काही शिखांच्या पगड्याही काढून घेतल्या. पुढच्या वेळी कपडे.....
कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष
कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष वेडा आहे. त्याने अमेरिकेत घुसलेल्या कोलंबि यन लोकांना आणायला आपली विमानं पाठवली.
Petro said the Colombian Air Force flights would allow the migrants to travel home “without being handcuffed.”
"This provision: dignity for deportees, will be applied to all countries that send deportations to us,” Petro said.
Guatemala’s Vice President Karin Herrera said Monday she was monitoring the care and condition of migrants arriving from the United States.
"Guatemalan migrants are people with rights and dignity. Our commitment is to guarantee that their arrival in the country, to their land, is in the best conditions,” Herrera said.
ब्राझिलनेही निषेध केला.
Brazil summoned the top US envoy to explain what the government called the "flagrant disregard" for the migrants' rights.
Brazil this week formed a working group with US representatives to "guarantee the humane reception" of deportees, authorities said.
आमचे विश्वगुरू सुद्धा काही कमी नाहीत हं. त्यांनी ट्रंपला सगळ्यांसमोर आम्ही वसुधिव कुटुंबकम मानतो असा टोमणा हाणला.
४५ लाख पाण्यात गेले. सरकारने
<< भारत सरकारने स्वतःचे विमान पाठवलेच नाही तर खर्च कसला झाला?? >>
४५ लाख पाण्यात गेले. सरकारने मदत केली पाहिजे.
“I spent nearly ₹45 lakhs to go there. My parents sold our lands and borrowed money from relatives to fund the process... I want help from the government because my parents sold our land and took a loan, but all that went in vain,” he said.
Sourav's family has refused to disclose the name of the agent who helped him cross into the US illegally. जय हो.
अमेरिका भारताला अद्ययावत पण
अमेरिका भारताला अद्ययावत पण तेव्हढीच महागडी अशी F35 देण्याची तयारी दाखवत आहे. विकत घेणे, संभाळणे हे महाखर्चिक आहे पण सोबत काही end- usage संबंधांत बंधने येतीलच ना? एकाच देशाकडे रशियन S400 क्षेपणास्त्र आणि अमेरिकन F35 असण्याचे धोके जरा जास्त वाटतात.
मोदीं यांच्या उपस्थितीमधे ट्रम्पने आपल्याला accent न समाजल्याचे प्रांजाळपणे कबूल केले.
https://youtu.be/NeNV_GnavII
एजंट लोकांनी या परत आलेल्या
एजंट लोकांनी या परत आलेल्या लोकांना धमक्या दिल्या असतील किंवा आम्ही पैसे परत करु, सध्या तरी तोंड बंद ठेवा असा दम दिला असेल. लाखो कोटींच्या व्यावहारातला एक मोठा हिस्सा सत्ताधार्यांपर्यंत पोहोचत आहे. सत्ताधार्यांच्या परवानगी शिवाय एव्हढे मोठे आर्थिक व्यावहार शक्य नाही.
७००, ००० बेकायदेशीर भारतीय अमेरिकेत असले तरी आता ३५० अमेरिकेतून परत आलेले आहेत, त्या आधी फ्रान्सने ३०० भारतीयांना परत पाठविले. अशा ६०० जिवंत कहाण्या ( लपवून ठेवता न येणार्या) आहेत. किती एजंट लोकांना अटक झाली, काय कारवाई झाली ?
चंमतग. यु एस एड ने
चंमतग. यु एस एड ने काँग्रेसला पैसे दिले (भारतत मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी असं काही आहे - ते आम्हांला मिळाले नाहीत, म्हणजे काँग्रेसला मिळाले) असा आरोप केला. ट्विटरवर एकाने भाजप सरकारं आणि यु एस एडची कनेक्शन्स शोधून टाकली. नोटाबंदीच्या वेळी डिजिटल व्यवहार वाढवण्यासाठी , कोविड लशीसाठी, महाराष्ट्र सरकारसोबत आणखी कशासाठी असे अनेक करारमदार झालेत. अगदी २०२३ सालीही मिशन झिरो कार्बन साठी करार झालेत. स्मृती इराणी युस एडच्या गुडविल अँबॅसॅडर होत्या.
दुसरी बातमी - केंद्रीय प्रदूषण नियंत्रण आयोगाने राष्टीय हरित प्राधिकरणाला प्रयागराजच्या गंगाजलाबद्दल एक रिपोर्ट दिला आहे. शोधून वाचा.
मी अमेरिकेचा अध्यक्ष असतो तर
मी अमेरिकेचा अध्यक्ष असतो तर त्यांना परत पायी डायरियन पास पार करायला लावला असता.
<<केंद्रीय प्रदूषण नियंत्रण
<<केंद्रीय प्रदूषण नियंत्रण आयोगाने राष्टीय हरित प्राधिकरणाला प्रयागराजच्या गंगाजलाबद्दल एक रिपोर्ट दिला आहे. शोधून वाचा. >>
------ एव्हढे लोक एकत्र आणल्यावर अजून काय होणे अपेक्षित आहे?
लोक चेंगचेंगरी झाल्यावर मारल्या गेले. सरकारने सर्वात आधी काय उपाय करायला हवेत? बातमी बाहेर येणारच नाही याचा प्रयत्न करायचा, आता अगदीच शक्य नसेल तर मृतांचे आकडे फार कमी दाखवा. पाचशे असतील तर ३० सांगा, दोनशे असतील तर १८ सांगा. चार दिवसानंतरही आकडे बदलत नसतात. ( नेहरुंच्या काळी हजारो लोक मारल्या गेले होते.... )
सर्वात महत्वाचे घटनेची दाहक ता समजण्याच्या अगोदरच परिस्थिती संपूर्ण नियंत्रणांत आहे अशी घोषणा करुन टाकायची.
सर्वात दु:ख दायक म्हणजे "या मृत पावलेल्या लोकांना मोक्ष प्राप्त झाला " असे म्हणणारे धर्माचे ठेकेदार. किती असंवेदनाहीन झालो आहोत आपण.
दिल्लीतही महाराष्ट्राचाच सीन
दिल्लीतही महाराष्ट्राचाच सीन रिपीट. शपथविधी समारंभाची आमंत्रणं निघाली. मुख्यमंत्री कोण ते अजूनही गुलदस्त्यात.
Yogi Adityanath rejects
Yogi Adityanath rejects faecal bacteria report on Maha Kumbh, says Sangam water fit for drinking
https://x.com/ndtv/status/1892141735352148129
बाबा, तुम्ही तेच पाणी प्या बरं.
https://x.com/elonmusk/status
https://x.com/elonmusk/status/1891923570768384107
--
घुसखोरांना आता कोस्टा रिका , पनामा , ग्वाटेमाला मध्ये पाठवले जाईल.
The Government of Costa Rica agreed to collaborate with the United States in the repatriation of 200 illegal immigrants to their country," the Costa Rican president's office said in a statement, adding that "these are people originating from ... Central Asia and India." The statement specified that "the process will be completely financed" by the U.S. government under the supervision of the International Organization for Migration.
Thank you, Costa Rica.
Thank you, Costa Rica, for accepting these undocumented and illegal immigrants.
भारतीय नागरिकांना जबरदस्तीने तिसऱ्या देशात हलवल्याचे उदाहरण आहे का? यापूर्वीही असे घडले होते का? कधी?
https://www.tribuneindia.com/news/india/costa-rica-agrees-to-take-indian...
अवैधरित्या अमेरिकेत जाऊन
अवैधरित्या अमेरिकेत जाऊन हाकलून दिलेल्याना आरक्षणाची मागणी जोर धरण्याची शक्यता आहे.
usual diversion technique
usual diversion technique
उत्तर प्रदेश की सभी 76 जेलों
उत्तर प्रदेश की सभी 76 जेलों में 90 हजार से ज्यादा कैदियों–बंदियों को संगम (महाकुंभ) के जल से नहलाया जाएगा। 21 फरवरी की सुबह कलश स्थापना, फिर पूजा अर्चना और फिर सामूहिक स्नान कार्यक्रम होगा। सभी जेलों में संगम का जल पहुंचाया जा रहा है।
दूषित पाण्यामुळे तो कसला नवा आजार पसरतो आहे ना? पुण्यात पहिले रुग्ण मिळाले.
कैद्यांना कठोर शिक्षा देण्याचा अप्रत्यक्ष मार्ग समजावा का?
हे माहीतच नव्हतं.
हे माहीतच नव्हतं.
२०१३ साली अण्णा हजारे न्यु यॉर्कमध्ये भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. तिथे सिनेटर्सना भेटले होते.
https://www.youtube.com/watch?v=ttT3TXwdmMY
यु एस एड #
Pages