अहोऽऽ मुंबईत रिक्षा चालत नाहीत
(संदर्भ - मायबोलीवरील चर्चा. (शोधा पुन्हा कधीतरी))
आज माझे आजोबा जिवंत असते तर तब्बल १२० वर्षांचे असते. त्यांचे बालपण मुंबईतच गेले. थोडक्यात मुंबईकर म्हणून आमचा किमान शंभर वर्षांचा ईतिहास आहे असे म्हणू शकतो
आजोबा दक्षिण मुबईतील माझगाव पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर होते. आजही ते पोस्टऑफिस आमच्या मुंबईतील सध्याच्या घरासमोर आहे. पण त्याला जुने पोस्ट ऑफिस म्हटले जाते. कारण शेजारी नव्या ईमारतीत नवीन पोस्ट ऑफिस उघडले आहे. मला मात्र ईंग्रजांच्या काळातील जुने पोस्ट ऑफिसच जास्त आवडते. सध्या जाणे काही दोन्ही पोस्ट ऑफिसात होत नाही. तशी कधी गरजच पडत नाही.
पण तो काळ वेगळा होता. पोस्टाला मान होता. आणि पोस्टमास्तर आजोबांनाही सन्मान होता.
आजोबांना आठ मुले होती. कोणाला याचे फार कौतुक नव्हते. म्हणजे तेव्हाचे कुटुंब नियोजन असेच असावे. लग्नाचे प्रयोजन हेच असावे.
तर आठ मुले आणि त्यांच्यामुळे घरात आलेल्या सूना अधिक जावई मिळून तब्बल सोळा जणांपैकी आठ दहा जण पोस्ट ऑफिस / तार ऑफिसमध्ये कामाला लागले. यालाच नेपोटीजम द घराणेशाही असेही बोलू शकतो.
जसे मुलांची संख्या वाढू लागली तशी जागा कमी पडू लागली. जुने घर सोडून नवीन घरात आलो. मुले मोठी होऊ लागली तशी तिथेही एकाची दोन घरे झाली. पण मुंबई काही सोडली नाही.
पुढे जाऊन मुले लग्नाच्या वयात पोहोचली. मुली आपल्या नवर्याच्या घरी गेल्या, तर मुलांनी आपला वेगळा संसार थाटायचा म्हणत एकेक करत मुंबई सोडली. माझे वडील त्यांच्यात लहान, आणि त्यांचे लग्न सर्वात शेवटी म्हणून ते आजोबांसोबत मुंबईतच राहिले. त्यामुळे माझेही बालपण मुंबईतच गेले.
ज्या काकांनी मुंबई सोडली ते कोणी अंधेरीला गेले, तर कोणी विक्रोळीला, कोणी कुर्ल्याला तर एक थेट वसईला गेले. त्यापैकी अंधेरी आणि विक्रोळी असलेल्या काकांकडे दर उन्हाळ्याच्या सुट्टीत जाणे व्हायचे. तिथे माझी ओळख मुंबईहून आलेला पाहुणा अशीच असायची. यामागे मुंबई म्हणजे काही तरी ग्रेट, आणि उपनगरे म्हणजे त्याला जोडलेली ठिगळे असा अॅटीट्यूड बिलकुल नसायचा. कदाचित उपनगरात वसलेली लोकं मुंबईतूनच आलेली असावीत म्हणून असेल, किंवा रोज दादर किंवा बोरीबंदरच्या दिशेने कामाला जाताना ट्रेनच्या गर्दीला झेलत जावे लागते म्हणून असेल, पण ते आमचा उल्लेख मुंबई किंवा प्रॉपर मुंबई असाच करायचे. त्यात उपनगरे जोडायचे नाहीत.
तर या काकांकडे जाताना आजी सोबत असल्याने आणि तिला ट्रेन आवडत नसल्याने बसनेच जाणे व्हायचे. किमान दोन बस बदलून जावे लागायचे. तेव्हा प्रवासात दोन गोष्टी प्रकर्षाने लक्षात यायच्या.
एक म्हणजे जागोजागी रस्त्याकडेला असलेले उघडे नाले. मुंबईत हा प्रकार दिसायचा नाही. काकांच्या बिल्डींगमध्ये प्रवेश करतानाही एखादा छोटासा नाला ओलांडून प्रवेश करावा लागायचा. त्यामुळे काकांची घरे आमच्यापेक्षा छान, चकाचक, आणि प्रशस्त असली तरी त्या एक नाला प्रकारामुळे शहरातून गावात आल्याची भावना मनात उत्पन्न व्हायची.
दुसरी गोष्ट म्हणजे रिक्षा. जी फक्त मुंबई उपनगरात आणि मायबोलीवर चालते, पण मुंबई शहरात नाही.
लहानपणापासून मुंबई शहर कुठे संपते आणि उपनगर कुठून सुरू होते हे लक्षात ठेवायचा एक महत्वाचा मापदंड म्हणजे रस्त्यावर दिसणारी रिक्षा.
बसच्या प्रवासात खिडकीबाहेर नजर टाकता टॅक्सी दिसायचे बंद होऊन रिक्षा दिसू लागली की आपण मुंबई सोडली असे समजायचे हा थंब रूल घरूनच बालमनावर बिंबवण्यात आला होता.
अर्थात तेव्हा उपनगरे ईतकी विकसित झाली नसल्याने ईतर फरक सुद्धा चटकन जाणवायचे. जसे की, मुंबईत बिल्डींगखाली उतरले की शे-दोनशे मीटर त्रिज्येच्या परीघात हवे नको ते सगळे मिळायचे. पण तेच उपनगरात दहा पंधरा मिनिटांची पायपीट करावी लागायची किंवा वेळप्रसंगी रिक्षा करून मार्केट वा स्टेशनला जावे लागायचे.
टॅक्सीचे मीटर रिक्षाच्या दिडपट असले तरी मुंबईत ती वापरायची गरज फार कमी पडायची. मध्यमवर्गीय लोकांकडे स्वताच्या गाड्या असायचा तो काळ नव्हता. पण पब्लिक ट्रान्सपोर्टबाबत मुंबईमध्ये लोकल ट्रेन आणि बसचे सक्षम पर्याय उपलब्ध होते. हार्बर सेंट्रल वेस्टर्न अश्या तिन्ही रेल्वेलाईन मुंबईत एकत्र यायच्या, तसेच लोकसंख्येची घनता जास्त असल्याने दोन स्टेशनमधील अंतर देखील फार नसायचे. त्यामुळे मुंबईत कुठेही रहात असलो तरी एखाद दुसरे रेल्वेस्टेशन जवळ पडायचे. त्याचसोबत बेस्ट बसेसचे जाळे सुद्धा मुंबईभर पसरलेले होते. जे तुम्हाला दारात पोहोचवायचे.
जेव्हा कोणी काका मामा उपनगरात घर घ्यायचे तेव्हा पहिला प्रश्न हाच असायचा की स्टेशनपासून किती लांब/जवळ आहे? मुंबईत कधी हा प्रश्न पडला नव्हता. पण काका मामांकडे राहायची वेळ आली तेव्हा समजून चुकलो की हा प्रश्न किती महत्वाचा होता. कारण रोजचे शाळा-कॉलेज, ऑफिसला जाताना सुद्धा रेल्वेस्टेशनपर्यंत रिक्षा करावी लागायची. एका अर्थाने रिक्षा ही उपनगरांची लाईफ लाईन होती. आजही असेल.
सध्या मी नवी मुंबईत राहतो तिथे तरी नक्कीच आहे.
मुंबईत लहानपणी बराच वेळ बस आली नाही तर टॅक्सीला हात दाखवला जायचा. पण ईथे मात्र बस हा प्रकार असूनही काही जणांसाठी तो अस्तित्वातच नाहीये. चार पैसे जास्त खर्च करू, पण रिक्षालाच हात दाखवू. शेअर रिक्षामध्ये कोंबून चोंबून भरले जाऊ, पण बसच्या रांगेत उभे नको राहू. मी नवीनच इथे राहायला आलो तेव्हा मला या सगळ्याची आणि लोकांच्या मानसिकतेची गंमत वाटायची. पण लवकरच मी देखील याला सरावलो. आणि रिक्षाला दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून स्विकारले.
पण मन अजूनही तिथेच मुंबईत आहे,
त्यामुळे कोणी रिक्षांचा किस्सा सांगताना त्या जागेचा उल्लेख मुंबई असा केला तर तोंडातून चटकन बाहेर येतेच,
अहोऽऽ मुंबईत रिक्षा चालत नाहीत
आणि यामागे कुठलाही खोडसाळपणा नसतो. पण ती अमुक तमुक जागा मुंबईत येत नाही का हा वाद ठरलेलाच असतो
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
DAKC मध्ये ३-४ अतिभव्य (
DAKC मध्ये ३-४ अतिभव्य ( तेव्हा वाटलेली) फूड कोर्ट होती. ज्या त जेवण बरोबरच pastries, इतर desserts मिळायची त्यावेळी ते विशेष होते.
२००३-४ दरम्यान असेल..
त्यावेळी त्यांना फूड कोर्ट मध्ये जेवण विकत घ्यायला आणि इतरत्र ऑफिस मध्ये employees ना अनुमती देईल यासाठी स्मार्ट कार्ड आणि रिडर्स हवे होते.
आमच्या कंपनीने त्यांचे टेंडर भरायसाठी प्रयत्न केले होते. मी त्या रीडर ची
Devolper म्हणून तिकडे समजून घ्यायला गेले होते काही दिवस.
वर सगळं किती चकाचक असल तरी
तेव्हा एक जाणवलेली गोष्ट , हे लोकं छोट्या विक्रेत्यांना अतिशय पिळून घेतात.
आता अंबानी लग्न सोहळ्या दरम्यानपण ही गोष्ट प्रकर्षाने आठवली.
आता BKC वर Reliance/ अंबानी/
आता BKC वर Reliance/ अंबानी/ jio चा वरचष्मा जाणवतो.
तुम्ही अंबानी लग्न
तुम्ही अंबानी लग्न सोहळ्यालापण गेला होतात?
DAKC मध्ये ३-४ अतिभव्य (
DAKC मध्ये ३-४ अतिभव्य ( तेव्हा वाटलेली) फूड कोर्ट होती.
,>>>>
अगदी.. मी कधीच जेवणाचा डबा नेला नाही दोन वर्षात. इतके व्हरायटी जेवण होते. सगळे शाकाहारी खातोय याचेही काही वाटले नाही त्यामुळे. तरी मांसाहार करावासा वाटला तर थोडे चालावे लागायचे पण सोय व्हायची.
ऑफिसला जायला स्टेशनपासून
इथला प्रतिसाद योग्य त्या धाग्यावर हलवला आहे
क्षमस्व आणि धन्यवाद
खारघरला पण आहे ही चार लोकांना
खारघरला पण आहे ही चार लोकांना घेऊन जायची स्कीम.
पण पैसे अंतरावर, कुठे उतरणार त्यावर घेतात.
तुम्ही अंबानी लग्न
तुम्ही अंबानी लग्न सोहळ्यालापण गेला होतात?
Submitted by उपाशी बोका on 9 August, 2024 - 07:55>>>>
या प्रतिसादात विनोदी असे काही नाही, पण प्रतिसाद आणि त्यानंतर प्रतिसाद कर्त्याचे नाव सलग वाचले असता सौम्य विनोद निर्मिती होते.
(No subject)
@फार्स विथ द डिफरंस
@फार्स विथ द डिफरंस
एकदम मार्मिक
अईई ई ग. गल्ली चुकली
अईई ई ग. गल्ली चुकली
वरील प्रतिसाद वेगळा धागा आणि वेगळ्या चर्चेसाठी होता.. जिथे मी रिक्षात दोन मुलींच्या मध्ये बसलेलो यावर कोणी विश्वास ठेवला नव्हता.. थांबा तो धागा शोधतो आणि वरचा प्रतिसाद तिथे हलवतो.
सापडला...https://www.maayboli
सापडला...
https://www.maayboli.com/node/69985
तो वरचा प्रतिसाद या धाग्यासाठी होता... हलवतो तिथे
रिक्षाच्या निमित्ताने
रिक्षाच्या निमित्ताने चाललेल्या चर्चेत मुंबई व उपनगरं यांची तुलना केली जातेय. मुंबई ती मुंबईचं, हे सत्य आहे व त्यात कोणाला कमी लेखणं वा फुशारकी मारणं याचा प्रश्नच नाहीय. मुख्य म्हणजे मुंबईला इतिहास आहे व त्या ओघाने आलेल्या वास्तू, घटनाही आहेत ज्या उपनगरात , नवी मुंबईत ठाण्यात येणं अशक्यच आहे. उदा. मुंबई बंदर, सर्व सरकारी व खाजगी मुख्य कार्यालये, सर्व मोठी रुग्णालये, स्टेडियमस, सिनेमा व नाट्यगृह, म्युझियम व प्राणिसंग्रहालय, कॉलेज व कलादालन इ इ.
मुंबईला इतिहास आहे, तसाच इतर
मुंबईला इतिहास आहे, तसाच इतर भागांनाही आहे.
कान्हेरी गुंफांचा , जोगेश्वरी गुंफांचा इतिहास मुंबईतल्या सध्याच्या प्रसिद्ध वास्तूंपेक्षा जुना आहे.
नालासोपार्याबद्दल हा एक लेख वाचला होता.
*तसाच इतर भागांनाही आहे.* -
*तसाच इतर भागांनाही आहे.* - जवळ जवळ प्रत्येक जागेला इतिहास असतोच. पण मुंबईची संपूर्ण जडण घडणच अगदी नजीकच्या इतिहासाशी निगडित आहे, हा फरक आहे.
भाऊ +७८६
भाऊ +७८६
इंग्रजांनी मुंबईचा जसा विकास केला आहे, त्यांनी मुंबईला जे महत्त्व दिले आहे त्यामुळे तिचे वेगळेपण कायम राहणार.
मुंबईतल्या गल्ल्या फिरले तरी ते वेगळेपण लगेच जाणवते.
आमची मुंबईत दोन घरे होती. एक आम्ही विकले. दुसरे मात्र कधीच विकणार नाही. एक तरी कायम राहू देणार. सगळे आम्हाला सतत हेच बजावतात. ते याचसाठी.
अरे मुंबईला इतिहास नाही. ती
अरे मुंबईला इतिहास नाही. ती साहेबांनी वसवली असं ऐकत आलेलो ते खोटंच होतं की काय!
ते अर्वाचीन इतिहासाबद्दल बोलत
ते अर्वाचीन इतिहासाबद्दल बोलत आहेत रे. मुंबई पेक्षा नाला सोपारा मोठे केण्द्र होते ब्रिटीश यायच्या आधी वगैरे वर असंख्य लेख आहेत.
मुंबईची सात बेटे खालीलप्रमाणे
मुंबईची सात बेटे खालीलप्रमाणे होती -
माहीम (Mahim)
वरळी (Worli)
परळ (Parel)
माझगाव (Mazgaon)
मुंबई (Bombay)
कुलाबा (Calaba)
छोटा कुलाबा (म्हातारीचे बेट - Old Woman's Island)
या बेटांदरम्यानचा समुद्र फारच उथळ होता व ठिकठिकाणी खाजणे होती. ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे. जेराल्ड आंजिअर (१६७०-७७) या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजविण्याचा व समुद्र हटविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याच्यानंतर तो टप्पा-टप्प्याने राबविला जाऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली.
- विकी भैय्या
Pages