चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-९ - समुद्रकिनारा, जहाज, बोट, होडी

Submitted by संयोजक on 27 September, 2023 - 06:25

मायबोलीकरांनो, पिकनिकसाठी ठिकाण निवडताना समुद्रकिनारा हा नेहमी प्राधान्यक्रमात वर असतो. समुद्रकिनारी वाळूमध्ये आरामात बसून अथांग महासागर बघणे, तेथील आसमंतात दिसणाऱ्या सूर्यास्ताच्यावेळीच्या रंगछटा, त्या सागरातून प्रवास करणारी होडी हे सर्व बघितले तर सुट्टीचे सार्थक झाल्यासारखे वाटते. याच समुद्रकिनाऱ्याविषयी या झब्बूसाठी तुम्हाला प्रकाशचित्रे द्यायची आहेत.
तर चालू करा एक से बढकर एक प्रकाशचित्रे द्यायला.

खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल रमड आणि मध्यलोक यांनी माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केल्याने एक माणूस रुसून झोपायला गेलं.
ते माणूस सांगतंय कि बॉ, एक तर त्याच्या कॅमेरा जुना आहे, त्याचे फिल्टर्स सामानात सापडलेच नाहीत, त्यात त्याचे रोल चोरीला गेलेत, उरलेत ते वाईड अँगलचे फोटो. या उप्पर ते फोटो स्कॅन करायचेत, त्यात त्या माणसाच्या अंगात मुलखाचा आळस. एव्हढे केल्यावर मायबोली ते फोटो साईझ बघा साईझ म्हणून हाकलून देतेय, मग स्क्रीनशॉट घ्या रे, त्यात मोबाईलला स्कॅनर कनेक्ट होत नाही म्हटल्यावर डेस्कटॉपवर पावर पॉईंट मधे घ्या, बाजूची स्क्रीन क्रॉप करा..... मग निव्वळ फोटो सेव्ह अ‍ॅज करा...
त्या माणसाने एव्हढे काम आयुष्यात कधीही केलेले नसताना हे दणादणा मोबाईलने काढलेले फोटो एकमेकांना झब्बू देत अपलोड करत सुटले होते.
त्या माणसाबद्दल हे सगळं लिहीताना मलाच गहीवरून आलं, पण यांना पाझर फुटला नाही.

आचार्य LOL परंतु भावना पोचल्या.

रघू आचार्य Biggrin
यासाठी माबो वर 10-12 वर्ष फोटो चढवायची प्रॅक्टिस लागते Wink

Rofl मला आता फोटो आवरते घ्यावेत असं वाटायला लागलंय. एक माणूस रूसायला वगैरे लागलं. हे पातक शिरी घेऊन जगावं कसं? Proud

थांकु रमड
मलाही असच वाटायला लागलय, फार फोटो टाकतेय ...

मडगाव उडुपी रस्त्यावर उडूपीच्या जवळ रस्त्याला अगदी खेटून समुद्रकिनारा. रस्त्यावरून काढलेला फोटो.Screenshot_20230928_084712_Gallery.jpg

मस्त आहे सगळेच फोटोज.
दियु यांच्या फोटोतली पावलांची ओळ, प्रकाश आणि किनारा सुंदरच.
वर्णिता, वेलकम. सुंदर फोटो. तेव्हढाच टॉर्च मारल्यासारखा चमचमता प्रकाश !

धन्यवाद आचार्य
हा गोकर्ण महाबळेश्वर चा लिफ्टमधून वर जाऊन खालचा व्ह्यू टिपलाय

Screenshot_20230928-163745_Gallery.jpg

मागच्या पानावरचा इंद्रधन्युष्याचा तर फारच सुंदर आलाय फोटो

rr38, ,माझ्याकडे सेम सिंधुदुर्ग किल्ल्यातून असा काढलेला फोटो आहे फक्त त्यात बोट नाहीये.

हॅवलोक समुद्रकिनारा- अंदमान

Screenshot_20230928-171102_Photos.jpg

हा गोकर्ण महाबळेश्वर चा लिफ्टमधून वर जाऊन खालचा व्ह्यू टिपलाय
>>>>
त्या ऊंचीवर गेल्याचे फील आले हा फोटो बघताना Happy

Pages