चित्र खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू - विषय क्रं-९ - समुद्रकिनारा, जहाज, बोट, होडी

Submitted by संयोजक on 27 September, 2023 - 06:25

मायबोलीकरांनो, पिकनिकसाठी ठिकाण निवडताना समुद्रकिनारा हा नेहमी प्राधान्यक्रमात वर असतो. समुद्रकिनारी वाळूमध्ये आरामात बसून अथांग महासागर बघणे, तेथील आसमंतात दिसणाऱ्या सूर्यास्ताच्यावेळीच्या रंगछटा, त्या सागरातून प्रवास करणारी होडी हे सर्व बघितले तर सुट्टीचे सार्थक झाल्यासारखे वाटते. याच समुद्रकिनाऱ्याविषयी या झब्बूसाठी तुम्हाला प्रकाशचित्रे द्यायची आहेत.
तर चालू करा एक से बढकर एक प्रकाशचित्रे द्यायला.

खेळाचे नियम आणि अटी
१.प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जहाज तसा मोठा विषय आणि जहाजाचे अनेक प्रकार पण त्यातील एक सगळ्यांचा आवडता म्हणजे फेरी.
जशी लोकल ट्रेन जशी सिटी बस तशी अगदी जवळची वाटणारी म्हणजे फेरी. काही फेरी एवढ्या मोठ्या असतात कि त्या एक चालत्या फिरत्या शहर असतात अशीच हि "स्पिरिट ऑफ ब्रिटिश कोलंबिया". १६५ मीटर लांब (५५० फूट), ७ डेक १२००० टन डिस्प्लेसमेंट आणि २१०० प्रवासी व त्यांच्या शेकडो गाड्या वाहून नेण्याची क्षमता असलेली.

अमेरिकन वॉटर्स मध्ये असताना काढलेला हा फोटो, एक फेरी व्हिक्टोरिया कडे निघाली होती तर दुसरी वॅनकूवर कडे परतत होती. आमच्या फेरीवरून काढलेला हा दुसऱ्या फेरीचा फोटो.

PXL_20230904_220639352~2.jpg

भारी क्लिक आणि कॅप्शन, मध्यलोक. मस्त फोटोग्राफी आहे तुमची. >> धन्यवाद rmd , तुमची फोटोग्राफी सुद्धा जबरी आहे आणि या उपक्रमात आलेले सगळेच फोटो सुंदर आहेत

view_1.jpg
लाहाइना, माउई हवाई इथल्या आमच्या हॉटेलच्या बाल्कनीतून घेतलेला फोटो.
आता काहीच आठवड्यापूर्वी वणव्यामुळे लागलेल्या आगीत हा सगळा भाग जळून खाक झाला. फार वाईट वाटले होते.

>>>>>>लाहाइना, माउई हवाई इथल्या आमच्या हॉटेलच्या बाल्कनीतून घेतलेला फोटो.
आहाहा!!

मध्यलोक,कलाकार, मैत्रेयी, रमड, मोक्षु
रात्री अपलोड केलेले फोटोज मस्त आलेत.
मध्यलोक,मोक्षु जहाजाच्या चित्राला झब्बू देतो. स्कॅन करावं लागत असल्याने कंटाळा केला काल.
रमडचा कॅमेरा एखाद्या ट्रीपला मिळेल का ? Lol
(कुठला आहे?)

त्यासाठी कॅमेरा उपयोगाचा नाही, डोळे पाहिजेत Proud (यानंतर आचार्य ' ये आँखे मुझे दे दे ठाकूर ' अशी पोस्ट टाकतील अशी मला भीती आहे Lol )

सगळे फोटोज् Samsung फोनने काढलेले आहेत.

IMG-20230927-WA0004.jpg
स्टेटन आयलन्ड फेरी मधून दिसणारी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी.

मध्यलोक,कलाकार, मैत्रेयी, रमड, मोक्षु
रात्री अपलोड केलेले फोटोज मस्त आलेत.
+1
सगळेच फोटो भारी आहेत.

त्यासाठी कॅमेरा उपयोगाचा नाही, डोळे पाहिजेत Proud (यानंतर आचार्य ' ये आँखे मुझे दे दे ठाकूर ' अशी पोस्ट टाकतील अशी मला भीती आहे Lol ) >>> हाहाहा.

फोटो सर्वच अप्रतिम.

Pages