मायबोली किंवा तत्सम संवादी संकेतस्थळांवर धागालेखकाने एखादा लेख टाकला तर त्या लेखावरील प्रतिक्रिया या चर्चा व गप्पा या स्वरुपात बनत असतात. त्यावर धागालेखकाचे नियंत्रण असतेच किंवा असावेच असे होत नाही. अन्यथा धागा वा! वा! छान छान! अशा त्रोटक प्रतिक्रियात वा केवळ वाचनमात्र स्वरुपात होतो. धागा भरकटण्याचे डेव्हिएशन किती व कसे असावे याचे साचेबद्ध उत्तर देता येत नाही. प्रत्यक्ष भेटीतही जेव्हा आपण अशा गप्पा मारतो त्यावेळी त्यात बराच विस्कळीत पणा येत असतो. ही काही विशिष्ट औपचारिकतेचे बंधन असणारी न्यायालयातील केस नसते. भरकटण्याचा धोका हा जिवंत धाग्यात असतोच. मूळपदावर गाडी आणावी लागते कधी कधी. कदाचित भविष्यात धागालेखकाला वाचनमात्र असे धाग्याचे स्वरुप ठेवण्याचा पर्याय देणे मायबोली प्रशासनाला गरजेचे होईल. तेव्हाच धाग्याचे भरकटणे थांबेल म्हणजे फक्त ब्रॉडकास्ट स्वरुप. वाचकांचा प्रतिसाद नाही.
प्रतिक्रियांमधे आलेल्या अनुषंगिक व समांतर गोष्टी या मुख्य प्रवाहाला पूरकच बनतात. विचारांची व्याप्ती वाढवतात. कधी कधीतर मूळ चर्चेपेक्षा उपचर्चा वा उपउपचर्चा याच अधिक उपयुक्त वा रंजक होतात. या मधे धागा निश्चित भरकटतो. पण त्या भरकटण्यातून काही वाचकांना आनंदही मिळतो व काही त्यांच्या दृष्टीने उपयुक्त असलेली माहितीही मिळते. आता लेखकाला आपल्या लेखावर वाचकांच्या कुठल्या प्रतिक्रिया याव्यात किंवा येवू नयेत यावर नियंत्रण नसते.पण कुठल्या प्रतिक्रियांना उत्तर द्यायचे व कुठल्या नाही याचे स्वातंत्र्य निश्चित असते. छापील नियतकालिकांमधे संपादकाला लेख व प्रतिक्रिया छापायच्या कि नाही याचे स्वातंत्र्य असते. संकेतस्थळावरही प्रशासकाला/संपादकाला संकेतस्थळाच्या धोरणात कुठले साहित्य वा प्रतिक्रिया बसत नसतील तर ते अप्रकाशित करण्याचा अधिकार राखून ठेवला असतो. फेसबुक सारख्या माध्यमात देखील काही अंशी फेसबुकचे नियंत्रण असते. पण माझी भिंत माझ्या गवर्या हा प्रकार तिथे दिसतो. मनोगत सारख्या काही संकेतस्थळावर धागाकर्त्याचे लेखन हे प्रशासका ने मंजूर केल्याशिवाय ते प्रकाशितच होत नाही. काही साहित्यिक पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याचे आकलन चर्चा प्रतिक्रिया समीक्षा सौंदर्य हे वाचकांवर सोपवून मुकत होतात. आता धागा भरकटला आहे का? त्यातील उपचर्चा, उपउपचर्चा या समांतर आहेत की अवांतर हे धागा लेखकाने ठरवायचे, वाचकांनी ठरवायचे कि संपादक/प्रशासकानी ठरवायचे हा ही चर्चेचा विषय होउ शकतो. एखा्दा अकॅडमिक लेख बिंदुगामी ठेवण्याच्या प्रयत्नात रिसर्च पेपर चा रुक्ष फील येतो. त्याची सामाजिक बाजू वा परिणाम हा समांतर पैलू त्या ठिकाणी समांतर न ठरता अवांतर ठरतो. संसदेतील वा टीव्हीवरील चर्चेतही वेळेच्या मर्यादांमुळे तसेच विस्तारभयामुळे सभापती वा ॲंकरला नियंत्रित कराव्या लागतात.
मंडळी नुकतीच कुमार यांच्या धाग्यावर हा विषय आल्याने तो धागा भरकटण्याचा धोका निर्माण झाला म्हणुन मी स्वतंत्र धागा इथे चर्चेसाठी घेतला आहे. असे काही तांत्रिकदृष्ट्या करता येईल का की धागालेखकाला आपल्या लेखावरील प्रतिक्रिया ही प्रकाशित वा अप्रकाशित करण्याचा अधिकार असेल? आपल्याला काय वाटते?
धागा भरकटण्याचा धोका
Submitted by प्रकाश घाटपांडे on 27 June, 2023 - 10:01
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रोल साठी भरकट्या चांगला
ट्रोल साठी भरकट्या चांगला शब्द आहे.
नार्सिसिट ( narcissist ) साठी आत्मरत किंवा आत्मलुब्ध हा शब्द बरोबर आहे का ? ट्रोल + नार्सिसिस्ट साठी सुद्धा शब्द असेल तर सांगा.
हा एक गुण आहे. अशा व्यक्तींचे भक्त देखील असतात. नार्सिसिस्ट फॅन साठीही शब्द हवा. आत्मलुब्धभक्त हे काही जमेना. एकाने आत्मबढाऊखोर भक्त असा शब्द सुचवला आहे. हा ही पटेना.
(थांबतो नाहीतर मराठीचा वर्ग भरून धागा भरकटेल).
प्रकाशजी ती पोस्ट आक्रमक
प्रकाशजी ती पोस्ट आक्रमक प्रतिसाद तसेच वैयक्तिक टिकेबद्दल होती. साहित्य वा साहित्यिकाबद्दल नव्हती.>>>> मी विशिष्ट केस बद्दल म्हणत नाही तर जनरली म्हणतोय कि एखाद्या साहित्याला वा साहित्यिकाला अनुल्लेखाने मारणे हे त्यावरील टीकेपेक्षा भयंकर असते. जसे की तु लिहिले आहे जास्त मानसिक बळ आक्रमण करायला नाही तर आक्रमण शांतपणे झेलायला लागते. तसेच. हे खरेच आहे.
रघु जी ट्रोल को ट्रोल ही रहने
रघु जी ट्रोल को ट्रोल ही रहने दो! क्या है की भरकटने मे भी कुछ मजा है! ट्रोल के बारे में मैंणे पैलेच लिखके रखा है वो चिपकाता हू|
प्रत्येक जण स्वतःकडे आपल्यात काही ट्रोलत्वाचे गुणधर्म आहेत की काय अशा आत्मपरिक्षणाने पहात असेल. आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधावे यासाठी आपले उपयुक्तता मुल्यापेक्षा उपद्रवमुल्य अधिक सोयीस्कर मानणारे ट्रोल्स असणारच आहे. काही जण इतरांच्यात लावालावी करुन स्वतः नामानिराळे राहतात. सौ चुहे खाके बिल्ली हाज को चली. काही जण सरळ कबुल करतात की आम्ही काय साधुसंत नाही त्यामुळे उचकावणे किंवा उचकणे हा आमचा गुणधर्म आहेच. जेव्हा तुमच्याकडे उपयुक्तता मुल्य नाही व उपद्रवमुल्यही नाही तेव्हा तुमची किंमत शुन्य. तुम्ही अदखलपात्र झालात.
बौद्धिक उन्माद करणारे (सोप्या शब्दात माज करणारे)अनेक विद्वान जेव्हा इतरांकडे तुच्छतेने पाहतात त्यावेळी ते आपला विजय साजरा करत असतात. अधिकार, ताकद आली कि उन्माद हा सोबत येतोच. रस्त्यावरील कुत्र्यांचे अधिकार वा प्रभाव क्षेत्र ठरलेले असते. त्यांचे आपापसात अलिखित संकेत असतात. त्यांच्या कंपुत कधि सामंजस्य तर कधी भांडण असतात. एकदा आमच्याजवळच्या गल्लीत एक नवीन कुत्री आपल्या पिल्लासह आली. गल्लीतील प्रस्थापित कुत्र्यांनी गदारोळ केला. तिला हाकलून देण्याचा प्रयत्न केला पण ही कुत्री अपत्यप्रेमापोटी सगळ्यांना पुरुन उरली. शेवटी इतर कुत्र्यांनी पण तिचे सहअस्तित्व मान्य केल . ती त्यांच्या कंपुत समाविष्ट झाली नाही पण सहअस्तित्वाचा मात्र भाग बनली. आंतरजालावर काही आयडी अशाच स्थिरावतात.
वा वा. उपक्रम वर आल्यासारखे
वा वा. उपक्रम वर आल्यासारखे वाटले प्रकाशजी. ट्रोल हा शब्द शिवीसारखा नको वापरायला. प्रत्येकाचे चाहते असतात. आईला आपले मूल श्रेष्ठ वाटतच असते. हिटलरच्या आईला तिचा मुलगा आवडत नाही असे झाले असेल का ? त्यामुळे ट्रोलकडे नकारात्मक नजरेने पाहू नये. त्यांना आपले म्हणा. ( हे बाळ कुरतडकरांच्या आवाजात ऐका). त्यांचे लाड करा.
स्वतःच स्वतःची मुलाखत घेतल्याप्रमाणे स्वतःबद्दल बोलत राहणे हा गुण असामान्य नाही का ? दुर्मिळ आहे. त्यासाठी भीड चेपावी लागते, लोक काय म्हणतील याचं दडपण जुगारून द्यावे लागते. अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. तेव्हां कुठे यश पायाशी लोळण घेते. चाहते ही मिळू लागतात. काही निस्सीम तर काही खांदादंबूक चाहते !
. त्यानंतर त्याने आपल्या
. त्यानंतर त्याने आपल्या अंगावर येत शिवीगाळ केली की हसून रिप्लाय देता यायला हवा >>> हे ठीक आहे.
पण काही जण एका आयडीने असा रिप्लाय देतात आणि शिवीगाळीसाठी दुसरे अनेक आयडी वापरतात, त्यांना काय म्हणणार ?
असंही नाही कि ते कुणाला कळत नाही. पण कळून पण त्यांची बाजू घेणारे महिलामंडळ सुद्धा असते.
त्यामुळे अशांना चेव येतो.
स्वतःबद्दल बोलणारे एक नेते आहेत. सतत मै मै मै मै करत राहतात.
खरं तर ते यशस्वी असताना असं स्वतःबद्दल सातत्याने का बोलावंसं वाटतं ? कारण न्यूनगंड.
अपघातानेच यश मिळालं आणि आपण केंद्रस्थानी आलोत, सत्ताधारी झालोत.
पण आपल्या पेक्षा बुद्धी असलेल्यांबद्दलची भीती आणि त्यातून आलेला न्यूनगंड यातून सतत स्वतःबद्दल बोलावंसं वाटतं.
बौद्धीक चमकोगिरीसाठी मग परीक्षा पे चर्चा सारखे उपक्रम करावे लागतात.
आपण ज्या क्षेत्रात यश मिळवलेलं नाही तिथे स्क्रीप्टेड कार्यक्रम करून आपली प्रतिमा बुद्धीवादी असल्याचा हा केविलवाणा खटाटोप पाहून त्या व्यक्तीची दयाच येते. ही एक वृत्ती असते.
ज्या गोष्टीचा न्यूनगंड आहे, ती ज्यांच्याकडे आहे त्यांच्याबद्दलची एक सुप्त असूया मग यांच्या बोलण्यात दिसू लागते.
अशा व्यक्तींची मानहाणी करणे, सतत त्यांना इरीटेट करत राहणे यात ते आनंद मानू लागतात.
त्यांनी स्वतःला घालून घेतलेल्या मर्यादांवरून डिवचणे, तुलनेने गुणवत्ता कमी असलेल्यांची जाणीवपूर्वक भलावण करत राहणे यातून अशा व्यक्तींवर सूड घेतल्याचे मानसिक समाधान या प्रकारच्या व्यक्ती मिळवत राहतात.
हा मानसिक आजार आहे ज्यावर ट्रीटमेंट सुद्धा आहे.
या व्यक्ती स्वतःची जी इमेज बनवू पाहतात तिच्या प्रेमात ते स्वतःच पडतात.
आपण असे असे आहोत असे जग समजते असा विश्वास त्यांना वाटू लागतो.
काही दोन चार झिलतोडे मंडळ त्यांना या बाबतीत त्यांची री ओढून मदतच करत असतात.
मग हे सूज्ञ असल्याचा आव आणत राहतात. आपल्याला सूज्ञ समजत असल्याच्या भावनेतून मग ते इतरांची कॉपी करत तुच्छ लेखू पाहतात.
अशा युक्त्यांनी काही काळ नक्कीच काही लोकांना मूर्ख बनवता येते.
पण अभ्यासू वृत्ती, माहितीपूर्ण भाषण, प्रतिसाद यांची वानवाच असते. आडातच नाही तर पोहर्यात कुठून येणार ?
सर्वोच्च नेता हे उदाहरण आहे. मानवी वृत्ती सर्व स्तरात असते.
इथेही असू शकतात असे लोक.
या व्यक्ती स्वतःची जी इमेज
या व्यक्ती स्वतःची जी इमेज बनवू पाहतात तिच्या प्रेमात ते स्वतःच पडतात.
आपण असे असे आहोत असे जग समजते असा विश्वास त्यांना वाटू लागतो. >>> त्यालाच आत्मलुब्ध शब्द आहे.
infatuated = आत्मलुब्ध
infatuated = आत्मलुब्ध
narcissist = आत्मपूजक
आत्मपूजक , अरे वा, छान शब्द
आत्मपूजक , अरे वा, छान शब्द दिला. धन्यवाद.
infatuated = आत्मरत
infatuated = आत्मरत
narcissist = आत्मानंदी
ट्रोल करणाऱ्यांना मी गमतीने
ट्रोल करणाऱ्यांना मी गमतीने 'विरजण' म्हणते. म्हणजे दूध नासवून त्याचं दही बनवणारे..
आणि लिहिणाऱ्याच्या डोक्याचं सुद्धा!
कृपया मजेत घ्यावं!
१०० वा प्रतिसाद
पण ह्याचा अर्थ तर ट्रोल्स
पण ह्याचा अर्थ तर ट्रोल्स मुळे वॅल्यू एडिशन्स होते असा झाला की !! दुधातुन विरजण घालून दही बनवून नंतर लोणी किंवा दूध फाटल्यावर पनीर बनवून दोन्ही केस मध्ये फायदाच.
व्हॅल्यू अॅडीशन होत असेल तर
व्हॅल्यू अॅडीशन होत असेल तर ट्रोलला ट्रोल म्हणू नये.
अरे अरे ट्रोला झालासि पावन
तुझे तुज ध्यान कळोनि आले
तुझा तूच देव, तुझा तूचि भाव
फाटले दूध विर्जणतत्त्वी
त्याशिवाय का सगळे आवडीने
त्याशिवाय का सगळे आवडीने वाचतात आणि हिरीरीने भाग घेतात.. हा हा हा
एकीकडे प्रतिसाद मिळत नाहीत
एकीकडे प्रतिसाद मिळत नाहीत म्हणून नव कवि / नव लेखक २ दिवसात धागा उडवून टिंब स्वरूपी ठेवतात आणि ही प्रथा पडू लागलीय तर ट्रोल्स मुळे प्रतिसाद वाढून धागा एकशेविसच्या स्पीडने धावू लागला तरी तक्रार
आचार्यजी तुम्ही तर 'नवनीत'च
आचार्यजी तुम्ही तर 'नवनीत'च काढलंत..
लय भारी!
infatuated = आत्मलुब्ध
infatuated = आत्मलुब्ध
narcissist = आत्मपूजक
infatuated = आत्मरत
narcissist = आत्मानंदी
बघा किती त्या शब्दा च्या छटा आहेत मला जेव्हा आत्मानंदी म्हणायचे असते त्यावेळी माझ्या मनात आत्मपूजक हा अर्थ नसतो. वा उलट ही . मग नेमका कोणाता शब्द योग्य असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे.
एकीकडे प्रतिसाद मिळत नाहीत
एकीकडे प्रतिसाद मिळत नाहीत म्हणून नव कवि / नव लेखक २ दिवसात धागा उडवून टिंब स्वरूपी ठेवतात आणि ही प्रथा पडू लागलीय तर ट्रोल्स मुळे प्रतिसाद वाढून धागा एकशेविसच्या स्पीडने धावू लागला तरी तक्रार>>
तज्ज्ञांनी सुवर्णमध्य शोधावा. म्हणजे धागा उडणारही नाही आणि पळणारही नाही..
नेमका कोणाता शब्द योग्य असा
नेमका कोणाता शब्द योग्य असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे.>>
सोबत सेवेकरी असतील तर आत्मपूजक. एकटाच असेल तर आत्मानंदी..
भाव तसा देव!
@सामना - प्रतिसाद आवडला.छान
@सामना - प्रतिसाद आवडला.छान विश्लेषण
ट्रोलभैरवांना टोळभैरव हा फार
ट्रोलभैरवांना टोळभैरव हा फार समर्पक शब्द आहे. प्लीज डू नॉट फीड द ट्रोल्स...
हा लेख लई भारी आहे. ट्रोलविषयी अनेक छटा त्यात आहेत.
हां सुवर्ण मध्य म्हणजे स्वत:
हां सुवर्ण मध्य म्हणजे स्वत: लेखकच असतो आणि अनुल्लेख हाच तो सुवर्णमध्यबिंदु. उगीच अनावश्यक प्रतिसादांना / निरर्थक प्रश्नांना / उगीच उसकावणाऱ्या प्रवृत्तिंना स्पष्टीकरणार्थ प्रतिसादरूपी इंधन खर्च केली की अतिरिक्त ऊर्जा उत्पन्न होऊन भडका हां उडणारच.
सोबत सेवेकरी असतील तर
सोबत सेवेकरी असतील तर आत्मपूजक. एकटाच असेल तर आत्मानंदी..
भाव तसा देव!>>>>>>>>+१
हां सुवर्ण मध्य म्हणजे स्वत:
हां सुवर्ण मध्य म्हणजे स्वत: लेखकच असतो>>
खरं आहे..
विचारात लवचिकता हवी. काय स्वीकारायचं काय नाकारायचं याची समज हवी. पण..
'तेथे पाहिजे जातीचे'..
मंडळी माझे एक मित्र
मंडळी माझे एक मित्र भरकटण्याच्या मुद्द्यामुळे फेसबुक वरुन स्वेच्छानिवृत्त झाले. त्यांनी मुलत: ब्लॉगवर दर्जेदार लेखन सातत्याने केले. फेसबुकवर प्रतिसाद भरकटण्या मुळे त्यांची चिडचिड व्हायला लागली.शिवाय ट्रोलिंगचा सामनाही करावा लागायचा. ब्लॉगवर मॉडरेशनची सोय असली तरी दर्जेदार लेखन कुणी वाचायला येईना. त्यांना वाचकांसाठी कुठलीही तडजोड करायची नव्हती. त्या तडजोडीला ते वाचकशरणागतता म्हणत. ते म्हणायचे माझे लेखन म्हणजे उत्पादन आहे, नि मला ते विकण्यासाठी वाचकांचा मूड सांभाळायला हवा, त्यांच्या दारी जायला हवे ही लाचार वृत्ती मला साफ अमान्य आहे. उलट दिशेने मी काहीतरी कष्ट करुन लिहिले आहे, ते वाचण्याने वाचकालाही काही मिळणार आहे हे ही मी विचारात घेतो. ते फुकट मिळत असेल तर त्याने/तिने किमान एक लिंक क्लिक करण्याचे कष्ट घ्यावेत ही अपेक्षा अनाठायी आहे असे मला वाटत नाही. माझे लेखन वाचकाच्या उपकाराधीन आहे ही ओशाळवाणी वृत्ती माझी नाही. मी त्यांना म्हणायचो की फेसबुकवर अटेन्शन स्पॅन हा खूप कमी असतो. लिंक क्लिक करुन नंतर तो लेख पुढ्यात येणार त्यापेक्षा समोर असलेले ( एकवेळ ) वाचू. नाहीतर पुढे चालू पडू ही मानसिकता असते. चिकित्सक व अभ्यासू लोक सुद्धा विषयता रस असूनही कंटाळ्यामुळे कधी कधी पुढे स्क्रोल करतात. मी सुद्धा करतो. हा निरिक्षणावर आधारलेला अनुभव आहे. कधी कधी मी लिंक दिली आहे तुम्हाला गरज असेल तर वाचा नाहीतर फुटा असाही आविर्भाव पोस्ट कर्त्याचा मूड नुसार असू शकतो. शेवटी दिसामाजी काहीतरी लिहित जावे ही आपली "खाज" आहे वाचकांची नाही. तेव्हा ती भागवण्यासाठी वाचकसुलभ क्लुप्त्या कराव्या लागतात. आपल्याला आवडलेले लेखन इतरांनीही वाचावे ही देखील एक आपली सुप्त इच्छा असते. मतभेद वा मतैक्य हा नंतरचा भाग.
आता ते परत फेसबुकवर आले आहेत. ब्लॉग व फेसबुक याचा समन्वय साधत ते लेखन करतात.
घाटपांडे सन्जोप राव का? मी
घाटपांडे सन्जोप राव का? मी विचारले आहे कारण - त्यांचा https://sanjopraav.wordpress.com/about/
हा विलक्षण , नितांत सुंदर ब्लॉग आहे.
हा मला कधी सापडतो कधी नाही.
य ना?
य ना?
सामो ते मंदार काळे त्यांच
सामो ते मंदार काळे त्यांच ब्लॉग वेचित चाललो
नक्कीच वाचायला आवडेल. धन्यवाद
नक्कीच वाचायला आवडेल. धन्यवाद.
>>>>>>>>>>सदसदविवेकबुद्धी,
>>>>>>>>>>सदसदविवेकबुद्धी, नीरक्षीरविवेक असे शब्द टाकून कुणीतरी प्रतिसाद देईल ही अपेक्षा होती>>>>>> मीच असे प्रतिसाद "इंटलेक्चुअली करेक्ट" रहाण्याच्या प्रयत्नात देत असतो. काही राजकारणी कसे पोलिटिकली करेक्ट रहाण्या चा प्रयत्न करतात तसेच काहीसे. Lol Lol
होय आपण खूपदा, अॅनॅलिटीकल, फॅक्ट बेसड प्रतिसाद देता. याचे कारण आपला चिकीत्सक स्वभावच असणार हे नक्की. तसेच फलज्योतिष संदर्भात तटस्थपणे केलेला अभ्यास, निरीक्षणे, वाद-विवाद आणि मान्यवरांची मते हा डेटा आपल्याकडे आहे.
बर्याच आय डी कडे 'इन्टेलेक्च्युअल लीडरशिप' हा गुणही पाहीलेला आहे. कौतुकास्पद वाटते. आपण ट्रोल्स कडे लक्ष द्यायचे की लोकांच्याकडून उत्तम वेचायचे ते प्रत्येकाने ठरवायचे. राजेश घासकडवी यांचा 'डु नॉट फीड द ट्रोल्स' हा लेख उत्तमच आहे.
सामो, वाद प्रतिवादात सुद्धा
सामो, वाद प्रतिवादात सुद्धा आपण डिफेन्स मेकॅनिझम वापरत असतो. विशेषत: Intellectualization Defense Mechanism इथे कामाला येतो. या लिंकवर वेगवेगळ्या डिफेन्स मेकॅनिझम ची सिरिझ आहे. तिथे पहा. Intellectualization Defense Mechanism
https://www.youtube.com/playlist?list=PLVx23UgplAYsEbk0wvVYNMwfQYT-0pzJE
Pages