मायबोली किंवा तत्सम संवादी संकेतस्थळांवर धागालेखकाने एखादा लेख टाकला तर त्या लेखावरील प्रतिक्रिया या चर्चा व गप्पा या स्वरुपात बनत असतात. त्यावर धागालेखकाचे नियंत्रण असतेच किंवा असावेच असे होत नाही. अन्यथा धागा वा! वा! छान छान! अशा त्रोटक प्रतिक्रियात वा केवळ वाचनमात्र स्वरुपात होतो. धागा भरकटण्याचे डेव्हिएशन किती व कसे असावे याचे साचेबद्ध उत्तर देता येत नाही. प्रत्यक्ष भेटीतही जेव्हा आपण अशा गप्पा मारतो त्यावेळी त्यात बराच विस्कळीत पणा येत असतो. ही काही विशिष्ट औपचारिकतेचे बंधन असणारी न्यायालयातील केस नसते. भरकटण्याचा धोका हा जिवंत धाग्यात असतोच. मूळपदावर गाडी आणावी लागते कधी कधी. कदाचित भविष्यात धागालेखकाला वाचनमात्र असे धाग्याचे स्वरुप ठेवण्याचा पर्याय देणे मायबोली प्रशासनाला गरजेचे होईल. तेव्हाच धाग्याचे भरकटणे थांबेल म्हणजे फक्त ब्रॉडकास्ट स्वरुप. वाचकांचा प्रतिसाद नाही.
प्रतिक्रियांमधे आलेल्या अनुषंगिक व समांतर गोष्टी या मुख्य प्रवाहाला पूरकच बनतात. विचारांची व्याप्ती वाढवतात. कधी कधीतर मूळ चर्चेपेक्षा उपचर्चा वा उपउपचर्चा याच अधिक उपयुक्त वा रंजक होतात. या मधे धागा निश्चित भरकटतो. पण त्या भरकटण्यातून काही वाचकांना आनंदही मिळतो व काही त्यांच्या दृष्टीने उपयुक्त असलेली माहितीही मिळते. आता लेखकाला आपल्या लेखावर वाचकांच्या कुठल्या प्रतिक्रिया याव्यात किंवा येवू नयेत यावर नियंत्रण नसते.पण कुठल्या प्रतिक्रियांना उत्तर द्यायचे व कुठल्या नाही याचे स्वातंत्र्य निश्चित असते. छापील नियतकालिकांमधे संपादकाला लेख व प्रतिक्रिया छापायच्या कि नाही याचे स्वातंत्र्य असते. संकेतस्थळावरही प्रशासकाला/संपादकाला संकेतस्थळाच्या धोरणात कुठले साहित्य वा प्रतिक्रिया बसत नसतील तर ते अप्रकाशित करण्याचा अधिकार राखून ठेवला असतो. फेसबुक सारख्या माध्यमात देखील काही अंशी फेसबुकचे नियंत्रण असते. पण माझी भिंत माझ्या गवर्या हा प्रकार तिथे दिसतो. मनोगत सारख्या काही संकेतस्थळावर धागाकर्त्याचे लेखन हे प्रशासका ने मंजूर केल्याशिवाय ते प्रकाशितच होत नाही. काही साहित्यिक पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याचे आकलन चर्चा प्रतिक्रिया समीक्षा सौंदर्य हे वाचकांवर सोपवून मुकत होतात. आता धागा भरकटला आहे का? त्यातील उपचर्चा, उपउपचर्चा या समांतर आहेत की अवांतर हे धागा लेखकाने ठरवायचे, वाचकांनी ठरवायचे कि संपादक/प्रशासकानी ठरवायचे हा ही चर्चेचा विषय होउ शकतो. एखा्दा अकॅडमिक लेख बिंदुगामी ठेवण्याच्या प्रयत्नात रिसर्च पेपर चा रुक्ष फील येतो. त्याची सामाजिक बाजू वा परिणाम हा समांतर पैलू त्या ठिकाणी समांतर न ठरता अवांतर ठरतो. संसदेतील वा टीव्हीवरील चर्चेतही वेळेच्या मर्यादांमुळे तसेच विस्तारभयामुळे सभापती वा ॲंकरला नियंत्रित कराव्या लागतात.
मंडळी नुकतीच कुमार यांच्या धाग्यावर हा विषय आल्याने तो धागा भरकटण्याचा धोका निर्माण झाला म्हणुन मी स्वतंत्र धागा इथे चर्चेसाठी घेतला आहे. असे काही तांत्रिकदृष्ट्या करता येईल का की धागालेखकाला आपल्या लेखावरील प्रतिक्रिया ही प्रकाशित वा अप्रकाशित करण्याचा अधिकार असेल? आपल्याला काय वाटते?
धागा भरकटण्याचा धोका
Submitted by प्रकाश घाटपांडे on 27 June, 2023 - 10:01
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रघू आचार्य, हे राहिलेच. मी
रघू आचार्य, हे राहिलेच. मी यावर दीर्घकाळ लेखन केले आहे.
कुमार१, लेखक आणि मी आम्ही
कुमार१, लेखक आणि मी आम्ही एकदा झाडाखाली भेटलो आहे.
मानव,भरत,हपा,रघू आचार्य,ऋन्मेष यांना एकदा भेटायचे आहे. बघू कधी योग येतो.
आइडी व्यक्तींची भेट झाली की त्यांच्याविषयी धारदार टीका करता येत नाही .विरोध बोथट होतो. मग त्यांचे धागे भरकटवणे दूरच राहिले.
अश्विनीमामी, माझ्या बहिणीचे
अश्विनीमामी, माझ्या बहिणीचे रिपोर्ट कुमार१ यांना मेलवर पाठवले होते. माझे त्यांच्याशी भेट व अधूनमधून फोनवर संपर्क असतो. त्यांनी ट्रीटमेंट करणारे डॉक्टर जे सांगतात त्यानुसार करावे मला त्यातले प्रत्यक्ष पातळीवर फार माह्निती नाही ऎंकोलॊजिस्टच ते सांगू शकतो असे सांगितले होते. बहिणीला इतरही गुंतागुंत होती. हार्ट, लंग्ज, सायकॊलॊजिकल इश्यु. तिची हार्ट सर्जरी झाली होती. अनेक तपासण्या सतत चालू असायच्या तरीही ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला नाही. नंतर एकदमच २ र्या टप्प्याच्या पुढे गेलेला डिटेक्ट झाला. वय ६५+ सर्जरी केली तरी पण केमो देता येणार नाही अशी नाजूक परिस्थिती आहे असे डॉक्टरांनी सांगितले होते तरी सर्जरी करा असा सल्ला दिला होता. तशी ती केली पण काही उपयोग झाला नाही सहा महिन्यातच ती गेली माझ्यावर खर्च करु नका असे तिने अगोदरच सांगितले होते. आई मात्र ब्रेस्ट सर्जरी नंतर २५ वर्षे पुढे जगली. माझ्या दुसर्या बहिणीने नंतर लगेचच मॅमोग्राफी करुन घेतली त्यात काही आढळले नाही. माझ्या आई व बहिणीत फरक असा होता की आई प्रचंड मानसिक ताकदीची तर बहिण मानसिक अशक्त.
दया , कुछ तो गडबड है.
दया , कुछ तो गडबड है.
दया , कुछ तो गडबड है.>>>>>
दया , कुछ तो गडबड है.>>>>> कसली गडबड?
कसली गड़बड़ ??
कसली गड़बड़ ??
नाही. काही गडबड नाही. मला
नाही. काही गडबड नाही. मला क्षणिक असे वाटले कि मी कुमार१ सरांच्या धाग्यावर चुकून गेलो कि काय.
हे फार वाढले आहे हल्ली..
हे फार वाढले आहे हल्ली..
स्पेशली चित्रपट विषयक चर्चा सगळ्या धाग्यांवर इकडची तिकडची सेम बघून कुठल्या धाग्यावर आहोत हे गोंधळात पडायला होते.
सर
सर
तुम्हाला पण वाटलं ना. अमा इकडे फिरकणार नाहीयेत. त्यांना हा प्रतिसाद कसा मिळणार?
अमा इकडे फिरकणार नाहीयेत.
अमा इकडे फिरकणार नाहीयेत. त्यांना हा प्रतिसाद कसा मिळणार?>> का नाही? प्रकाशजी मी तुमच्या दु:खात सहभागी आहे. व आईंना नमस्कार. अशी मानसिक कणखरता असणे हा लाइफ गोल आहे. होप बोथ ऑफ देम आर इन अ हॅपी प्लेस. प्रेयर्स.
विषयाच्या संदर्भाने लोक केसेस त्यांचे वैयक्ति क अनुभव लिहिणारच की. तिथे आता उपचर्चा नको असे लिहिले आहे त्यामुळे इथेच प्रतिसाद दिला आहे.
अमा
अमा
मी "तिकडे" जाऊन बघितले तर तुम्ही तुमचा प्रतिसाद डिलीट केला आहे असे दिसलं.
प्रकाशजी मी तुमच्या दु:खात सहभागी आहे. व आईंना नमस्कार. अशी मानसिक कणखरता असणे हा लाइफ गोल आहे. होप बोथ ऑफ देम आर इन अ हॅपी प्लेस. प्रेयर्स. >>> माझाही सहभाग.
आता अवांतर.
मला पूर्वी अशी वाईट खोड होती.कि नेट वर जाऊन हेल्थ इशुज चेक करायचे , डॉक्टरांनी औषध लिहिले कि नेट वर जाऊन त्याबद्दल वाचायचं. लेखात दिलेली सर्व लक्षणे आपल्याला दिसताहेत असा भ्रम व्हायला लागला. एकदा मी डॉक्टरच्या समोर ज्ञान पाजळले. डॉक्टरांनी मला असा झापला. तेव्हापासून मी हा प्रकार बंद केला.
हा एक मॅॅनियाचा प्रकार आहे. टाळणे इष्ट.
आइडी व्यक्तींची भेट झाली की
आइडी व्यक्तींची भेट झाली की त्यांच्याविषयी धारदार टीका करता येत नाही .विरोध बोथट होतो. मग त्यांचे धागे भरकटवणे दूरच राहिले.
Submitted by Srd on 28 June, 2023 - 13:35
>>>>
म्हणून मी कोणाला भेटायला उत्सुक नसतो. माझे दुकानं टिकाकारांवरच चालते. तेच पलटले तर माबोवर येऊन काय तीन पत्ती खेळू..
तीन पत्ती खेळलात तरी आम्ही
तीन पत्ती खेळलात तरी आम्ही टीका करणार.
"अरे काल त्या बकऱ्याबरोबर एक डाव खेळलो. अगदीच लिंबू टिंबू आहे. तरी वाचला. जास्त पैसे नाही खेचले." इत्यादी.
तुम्ही काहीही करा. ती बाप, मुलगा आणि गाढव गोष्ट माहित आहे ना!
Office घ्या संगणकावरून माबो
Office घ्या संगणकावरून माबो खेळणाऱ्यांना धागे भरकटल्याचं दुःख कसं असेल? प्रतिसाद कुठेतरी माबोवर गेलाय ना मग कुणीतरी त्याची दखल घेणारच. चेंडू परत आला पाहिजे. पुन्हा हाणायचा.
>>>>>चेंडू परत आला पाहिजे.
>>>>>चेंडू परत आला पाहिजे. पुन्हा हाणायचा.
तेवढी मानसिक उर्जा हवी ना. काही आक्रमक लोकांमध्ये अफाट बळ असते. बाकी काही लोकांत अजिबात मानसिक (मेंटल) उर्जा नसते. अशा वेळी तिथल्या तिथे 'डु द नेसेसरी' & मुव्ह ऑन. हाच अॅप्रोच ठेवावा. हेमावैम.
अमा, श्रीमती मंगला नारळीकर
अमा, श्रीमती मंगला नारळीकर यांनी आपल्या ब्रेस्ट कॅन्सर विषयी मटा मधे लिहिल आहे हे पहा माझा कॅन्सर
कुमार १ याना आपल्या लेखाची व प्रतिसादाची व्याप्ती ही कारणमीमांसा पुरती मर्यादित ठेवायची असल्याने तिथे ही माहिती दिली नाही
काही आक्रमक लोकांमध्ये अफाट
काही आक्रमक लोकांमध्ये अफाट बळ असते. बाकी काही लोकांत अजिबात मानसिक (मेंटल) उर्जा नसते. अशा वेळी तिथल्या तिथे 'डु द नेसेसरी' & मुव्ह ऑन....
>>>>
सामो,
जास्त मानसिक बळ आक्रमण करायला नाही तर आक्रमण शांतपणे झेलायला लागते.
क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास वेगवान गोलंदाज दुरून धावत आला आणि ताशी शंभर मैलाने बाऊन्सर टाकला तर आपल्याला शांतपणे झुकून तो चेंडू सोडता यायला हवा. त्यानंतर त्याने आपल्या अंगावर येत शिवीगाळ केली की हसून रिप्लाय देता यायला हवा. मग तो पुन्हा जीव खाऊन धावत येईल. पुन्हा आपले सारे बळ लाऊन चेंडू फेकेल. तो तितक्याच शांतपणे खेळता यायला हवे. रन नाही आले तरी चालतील. विकेट शाबूत राहायला हवी. मायबोली असो वां आयुष्य, हे कसोटी क्रिकेट आहे आणि तसेच खेळावे. मानसिक बळ तिथे दिसून येते.
त्यामुळे जर तुम्ही कोणाच्या आक्रमणाने न बिथरता मू्व ऑन करू शकता तर ते मानसिक बळ तुमच्यात आहे असे समजा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्रिकेटमधे बॅटसमनने चेंडू
क्रिकेटमधे बॅटसमनने चेंडू सोडून दिला तर रनर ने तो फटकावण्याची सोय नसते.
सोडला कि सोडला.
वा ऋन्मेष!
वा ऋन्मेष!
एखाद्या लेखकाच्या लेखनावर
एखाद्या लेखकाच्या लेखनावर विरुद्ध प्रतिसाद मी-अनु , फारेंड आणि ऋन्मेष फार चांगल्या , जराही उद्धट वाटणार नाही अशा पद्धतीने लिहितात. मला आवडते त्यांची शैली.
ऋन्मेष, एखाद्या साहित्याला वा
ऋन्मेष, एखाद्या साहित्याला वा साहित्यिकाला अनुल्लेखाने मारणे हे त्यावरील टीकेपेक्षा भयंकर असते.
Thanks Prakash will
Thanks Prakash will definitely check that link.
Runmesh post is great. Totally agree.
सगळ्यांचेच प्रतिसाद आवडले. रू
सगळ्यांचेच प्रतिसाद आवडले. रू, व्वा! सौ टकेकी बात!
धन्यवाद
धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रकाशजी ती पोस्ट आक्रमक प्रतिसाद तसेच वैयक्तिक टिकेबद्दल होती. साहित्य वा साहित्यिकाबद्दल नव्हती.
तरी याबद्दलही माझे म्हणाल तर मी एखादा नवीन लेखक माबोवर आला तर त्याचे लिखाण आवर्जून वाचतो. भले लिखाणाचा दर्जा तितका उच्च नसला तरी वाचतो कारण प्रत्येक वेगळी व्यक्ती एक वेगळा विचार एक वेगळा दृष्टीकोन घेऊन येते. अनुल्लेख करायचा प्रश्नच नाही.
धन्यवाद
Duplicate संपादित
अरे बापरे ! चालूच आहे का अजून
अरे बापरे ! चालूच आहे का अजून ?
अन्यत्र दिलेले प्रतिसाद एकदाच सेव्ह करून ठेवले तर प्रत्येक धाग्यावर टंकायचे कष्ट वाचतात याचे प्रात्यक्षिक मनापासून आवडले. त्या ही पेक्षा त्याच नियमित पणे दिलेल्या प्रतिसादाला तोच प्रतिप्रतिसाद देणे हे किती आव्हानात्मक आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. या गोष्टी सोप्या नाहीत. त्या समजून घेतल्या नाहीत तर प्रत्येक धाग्यावर काय तेच तेच् असा समज होऊन विनाकारण इरीटेशन वाढते.
त्या मागची चिकाटी पहा, निष्ठा पहा, न कंटाळता तेच तेच काम करण्यातले सातत्य पहा. एखाद्या संकेतस्थळावर दैदीप्यमान कारकीर्द करणे हे काही येरागबाळ्याचे काम नोहे. आपापल्या क्षेत्रात तर कुणीही यश मिळवेल. पण असे यश खेचून आणणे, सपोर्ट सिस्टीम बनवणे हे भयंकर कुल आहे. अगदी अ + त नंतर नियमित येणार्या कोड इतकेच.
यास भरकटणे समजू नये.
भरकटलेल्या धाग्यात हात धुणे >
भरकटलेल्या धाग्यात हात धुणे >> ऋ सहमत
ऋ, वा , आक्रमण करायला नाही ,
ऋ, वा , आक्रमण करायला नाही , झेलायला मानसिक बळ अधिक लागत ... >> पटलं अगदीच .
धागा भरकटणे याबद्दल असल्याने
धागा भरकटणे याबद्दल असल्याने . . . 'ट्रोल'साठी एखादा मराठी शब्द असावा.
'बॅन'साठी तडीपार?
बंदी
बंदी
Pages