परवाच जितूजींचा बड्डे झाला. मधे त्याची काही गाणी बघत होतो. तीही त्यात जितू आहे म्हणून नाही तर इतरच कारणांनी. (थांबा थांबा. मी हिम्मतवाला, मवाली बद्दल म्हणत नाहीये. 'ये मुलाकात एक बहाना है' सारखी गाणी ऐकायला छान आहेत म्हणून लावली होती). तेव्हा जाणवले की जितेंद्रच्या पिक्चर्स मधे असंख्य पिक्चर्स असे होते की त्याचे जिच्याशी प्रेम जमले तिच्याशी त्याचे क्वचितच लग्न व्हायचे. त्यामुळे एखाद्या आनंदी गाण्यात ती "एक्स" रडताना दिसते. किंवा तिचे एक सॅड कडवे नंतर असते. एका फेज मधे बहुतांश रीना रॉय कधी इकडे तर कधी तिकडे असायची
अशा कथानकांची ही काही उदाहरणे:
- खानदान मधे बिंदिया गोस्वामीला सोडून सुलक्षणा पंडित
- अपनापन मधे रीना रॉयला सोडून सुलक्षणा पंडित
- आशा मधे रीना रॉयला सोडून रामेश्वरी
- अर्पण मधे रीना रॉयला सोडून परवीन
- बदलते रिश्ते मधे रीना रॉय ऋषीकपूरला सोडून याच्याकडे येते
- प्रेम तपस्या मधे रीना रॉयला सोडून रेखा
नंतर श्रीदेवी/जयाप्रदा यांचेही पिक्चर्स अशाच स्वरूपात येऊ लागले (तोहफा). पण एकूणच बरीच वर्षे ही रिकरिंग फेज होती त्यांच्या पिक्चर्सची.
दुसरे म्हणजे मुलेबाळे. जितूजी व त्यांच्या दोन हिरॉइन्स पैकी कोणाला मूल हवे असेल, कोणाला प्रत्यक्षात होईल व पिक्चरच्या शेवटी ते कोणाच्या पदरात पडेल यावर अनेक पिक्चर्स चालले. यातील अनेक प्रेमाच्या त्रिकोणांना सोडवायचे म्हणजे एका हिरॉइनने डायरेक्ट मरायला हवे असाच नियम असावा. अर्थात तो हिंदी मधल्या कोणत्याही दशकाच्या प्रेमाच्या त्रिकोणाच्या बाबतीत लागू होईल. मी दुसरी मुलगी/मुलगा शोधतो वगैरे प्रकार नाहीत. एकवेळ व्हिलनच्या माफिया टोळ्यांमधून लोक जिवंत बाहेर पडतील, पण प्रेमाच्या त्रिकोणातून नाही.
बहुतांश कथा अशा की दोन स्त्रियांना त्याग करायला मधे एक हीरो पाहिजे म्हणून जितूजींना घेतले असावे. जितक्या चित्रपटांत असे रोल होते ते धरले तर त्या दृष्टीने जितूजी हे "वन मॅन बेख्डेल टेस्ट बीटर इंडस्ट्री" आहेत.
कधी कधी तर जितूजींचे कारनामे (ज्यामुळे त्या हिरॉइन्स चित्रपटात दाखवलेल्या अवस्थेत आहेत ते) बाजूला राहून त्या दोघी एकमेकींशीच भांडत. माँग भरो सजना मधे नक्की डबल रोल का आहे, त्यातला फ्लॅशबॅक खुलासा नक्की काय आहे आणि त्यामुळे ओम शिवपुरीच्या निर्णयात का फरक पडला ते विकीवर वाचून तरी डोक्यावरून गेले. त्यात त्यातली माँग वाली हिरॉइन त्या पिक्चरमधल्या तीन हीरॉइन्सपैकी कोणासारखीच दिसत नाही आणि तेथे जितूजींचा फोटो लोक एखाद्या मोठ्या उंच लॅण्डमार्कपासून लांब उभे राहून त्याच्या टोकावर हात धरतात तसा काढला आहे. उद्या कोणी जितूजींना घेउन Honey I shrunk the husband काढला तर त्याकरताही हा पोस्टर खपून जाईल.
मात्र एका पिक्चर मधे काकाने त्याच्या वरताण केले आहे. त्याच्या "आशाज्योती" मधे अशाच एका नाट्यमय त्रिकोणाला सोडवायला दोघीही हिरॉइन्स मरतात. नक्की का व कशा ते नीट पाहिले नाही. गरजूंकरता चित्रपट उपलब्ध आहे यूट्यूबवर.
हे पाहताना हे ही लक्षात आले की रीना रॉयचे पिक्चरही बरेचसे तसेच असत. दोघांचा ओव्हरलॅप प्रचंड आहे. हे सगळे पिक्चर्स फॅमिली ड्रामा टाइप, म्हणजे पुण्याला वसंत टॉकीज मधे लागत तसे असत. पिक्चरमधे रीना रॉय ज्याच्या प्रेमात पडते त्याच्याशी तिचे लग्न फार क्वचित होते. जितेंद्र असेल तर जवळजवळ नाहीच. फक्त 'बदलते रिश्ते' मधे ऋषी कपूर ते अस्सल ७०ज मसाला वापरून घडवून आणतो म्हणून जमते. असे काही अपवाद. असो. तो वेगळा विषय आहे.
विकीवरची लिस्ट पाहिली तर जितूजींनी चाळीस-एक वर्षे काय अफाट पिक्चर्स मधे काम केले आहे! एकाच नावाच्या दोन पिक्चर्स मधे दोन वेळा काम करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. गंमत म्हणजे त्या दोन्ही चित्रपटांच्या नावांचाही अर्थ एकच आहे: संतान व औलाद. म्हणजे संतान नावाच्या दोन पिक्चर्स मधे (संतान-१, संतान-२) व औलाद नावाच्या दोन पिक्चर्स मधे (औलाद-१, औलाद-२) त्यांनी काम केले आहे. पहिल्या संतान (चित्रपटा) मधे ते बापाला सुधरवणारा मुलगा असतात तर दुसर्यामधे मुलाकडून छळला जाणारा बाप. नशीब एक डबल रोल करून त्यांनी दोन्ही रोल स्वतःच केले नाहीत. औलाद मधेही असेच काहीतरी असावे.
यातील एका औलाद मधे तर एकीचे नाव देवकी व दुसरीचे यशोदा आहे. साहजिकच त्यातील बाळ पिक्चरभर इकडून तिकडे फिरते. शेवटी तर ते यशोदाला दिले जाते तेव्हा विकीवरील माहिती नुसार "...Devki falls down due to headache. Doctor gives good news that she is expecting and would become mother in near future" . विकीवर त्यांच्या प्रत्येक पिक्चरचे इंग्रजीतूनही नाव्/अर्थ आहे तो ही तितकाच मनोरंजक आहे: The thirsty monsoon - प्यासा सावन, Life on palm - जान हथेली पे, Complete household - घर संसार, Where is love like this - ऐसा प्यार कहाँ, More beautiful than heaven - स्वर्ग से सुंदर, Henna brings color - मेहंदी रंग लायेगी etc.
याखेरीज त्यांनी "हिंमत", "हिंमतवाला" आणि "हिंमत और मेहनत" या तिन्हीमधे काम केले आहे. इतकेच नव्हे तर एकाच वर्षी "सुहागन" व "सदा सुहागन" दोन्हीमधे, व त्याच वर्षी लगे हाथो एक "सिंदूर"ही केला. तसेच ते "जानी दोस्त" ही होते व "जानी दुश्मन"ही. ते "माँ और ममता" मधेही आहेत आणि मुख्य लीडचे नाव ममता असलेल्या "माँ" मधेही.
त्यात हे वरचे बहुतांश फक्त "फॅमिली मॅन" जितूजींबद्दलचे आहे. या खेरीज गुलजारवाला जितेंद्र वेगळा, जे ओमप्रकाशच्या अ ने सुरू होणार्या पिक्चर्समधला वेगळा, नंतरचा पद्मालय स्टुडिओजचा व राव आडनावाच्या विविध लोकांच्या पिक्चर्समधला मिशीवाला जितेंद्र वेगळा. त्याहीनंतर "नफरत की आँधी" छाप पिक्चर्स मधला वेगळा.
ही लिस्ट बघितली तर एकेक महान रत्ने सापडतात. त्यावरून आणखी शोधले तर ज्या क्लिप्स दिसतात त्या आणखीनच भारी आहेत. बाकी "ढल गया दिन, टुक, हो गयी शाम, टुक" गाणी तर आहेतच. हे सगळे वर्णन म्हणजे हिमनगाचे फक्त वरचे टोक आहे. इथल्या तज्ञांकडून आख्खा हिमनग समजावून घेण्याकरता हा धागा उघडत आहे. पूर्ण लिस्ट इथे या लिन्कवर आहे. येउ द्या!
https://en.wikipedia.org/wiki/Jeetendra_filmography
लेख आणि प्रतिसाद जबरदस्त
लेख आणि प्रतिसाद जबरदस्त
'संजोग' पठडीतले जितेंद्रचे काही चित्रपट बघितले आहेत.
मला 'परिचय'मधला जितेंद्र प्रचंड आवडतो. एका वयस्कर माणसाची नोकरी आपल्यामुळे जाईल म्हणून स्वतःला गरज असूनही नोकरीला नकार देणारा, रायसाहबांच्या खट्याळ नातवंडांना प्रेमाने शिस्त लावणारा, जिन्यावरून धावत जाताना जया भादुरीशी टक्कर होऊन पडताना तिच्या प्रेमातही पडणारा आणि तिचं लग्न दुसरीकडे ठरवण्याचा रायसाहबांचा विचार लक्षात येताच तिला न भेटताच निघून जाणारा. इथेही त्याचं नाव रवीच.
अवांतर- 'परिचय' हा 'साऊंड ऑफ म्युझिक'वरून प्रेरित आहे हे झालंच, पण 'हम है राही प्यार के' वरसुद्धा साऊंड ऑफ म्युझिकचा प्रभाव आहे असं मला वाटतं.
ध मा ल धागा आणि प्रतिसाद!
ध मा ल धागा आणि प्रतिसाद!
प्रचंड आवडल्या गेल्या आहे लेख
प्रचंड आवडल्या गेल्या आहे लेख आणि प्रतिसाद पण धमाल
परिचय हा एखादाच अपवाद असावा बाकी सर्व सम समान जात कुळीचे!
२ जणींना आपल्यात अडकवून हा आपला नामा निराळा
एका चित्रपटात (साबणावरून पाय घसरणार्याच बहुधा) हा नंतर रेखा चा बॉस असतो आणि ह्याला आणि त्याच्या मुला ला काहीतरी एखादे वाक्य तकिया कलाम असल्या सारखे म्हणायची सवय असते. अशक्य चित्रपट होता तो.
कादर खान पण असायचा आचरटपणा करत जोडीने बरेचदा.
मज्जा आली वाचतांना. खुप
मज्जा आली वाचतांना. खुप सिनेमे पाहिले , जितेन्द्रचे. अगदी लहानपणी पाहिलेला त्याचा पहिला चित्रपट "गीत गाया पत्थरोने " पासुन ते ' दिल आशना है" पर्यन्त. आम्हीही तेव्हा जितेन्द्र, रीना रॉय, रेखा / पद्मिनी कोल्हापुरे / मौशुमी चॅटर्जी किंवा जितेन्द्र, श्रीदेवी , जया प्रदा हे त्रिकुटच पहायला जायचो. कादर खान, शक्ति कपुर, पिन्चु कपुर हे व्हिलन आलटुन पालटुन असाय्चेच त्यांना छळायला.
१९८४-८५ च्या काळातले मवाली,तोहफा, कैदी , कामयाब, मकसद , हिम्मतवाला...या सिनेमांच्या लाटेत सदा सुहागन , हैसियत, जस्टिस चौधरी हे सिनेमे कसे काय विसरलात लोक्स? अन तो "सदा सुहागन " सिनेमाचा क्लायमॅक्स सीन.... अगागागा! अर्ध्यामुर्ध्या सिनेमानन्तर आयाबायांनी डोळ्याला लावलेले पदर ... बादलीभर गाळलेले अश्रु.. अख्ख थिएटर मुसमुसायचे. सिनेमा सुटल्यावर एकेकीचे लालेलाल डोळे, नाक....असा सीन
असाय्चा. .
हैसियतमधले "दफ्तर को देर हो गयी, मुझे जल्दीसे कॉफी पिलाना' , जस्टीस चौधरीचे 'मामामिया' ही गाणी फार गाजली तेव्हा.
धमाल लेख
धमाल लेख
"दफ्तर को देर हो गयी, मुझे
"दफ्तर को देर हो गयी, मुझे जल्दीसे कॉफी पिलाना' , बीबी हुं मै, बावर्ची नहीं, मुझे आता नहीं काॅफी बनाना.
असं आख्खं कडवं आजही का पाठ आहे देव जाणे.
माबो वरील तमाम नवरे मंडळींना
सूचना : प्नमाणित पतींशिवाय अन्य कुणीही खालील दुव्यावर टिचकी मारू नये
माबो वरील तमाम नवरे मंडळींना सप्रेम भेट
जितूजींच्या या गाण्याबद्दल यच्चयावत बिचारे नवरे आजन्म त्यांच्या ऋणात राहतील.
<< जितूजींच्या या गाण्याबद्दल
<< जितूजींच्या या गाण्याबद्दल यच्चयावत बिचारे नवरे आजन्म त्यांच्या ऋणात राहतील.<<
आधी नाव वाचले नाही लेखकाचे पण
एकवेळ व्हिलनच्या माफिया टोळ्यांमधून लोक जिवंत बाहेर पडतील, पण प्रेमाच्या त्रिकोणातून नाही.
हे वाक्य वाचले आणि वर जाऊन लेखकाच्या नावाची खात्री केली
पिक्चरमधे रीना रॉय ज्याच्या प्रेमात पडते त्याच्याशी तिचे लग्न फार क्वचित होते. जितेंद्र असेल तर जवळजवळ नाहीच.
यातील एका औलाद मधे तर एकीचे नाव देवकी व दुसरीचे यशोदा आहे. साहजिकच त्यातील बाळ पिक्चरभर इकडून तिकडे फिरते.
जितूजी म्हणजे हिंदीतील अलका कुबल. सुखाचा संसार कधीही नशिबी नाही. स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते तसं जितूजीच्या नशिबी क्षणाचं टाकीटाकी व अनंतकाळची जुदाई असते.
शॉवरच्या पाण्याला आग लागते..
बाकी आम जनतेच्या आयुष्यात साबणाने पाय घसरल्यावर के वायर सर्जरी, फिजिओथेरपी, 15000 रु चं प्लास्टर अश्या गोष्टी येतात.
कई तर प्रश्न पडे का बा टुरिंगवाल्याचा पडदा जास्ती सफेद का जितूजी, लै साऱ्या पिच्चरात ते केसं (अन्सो मिशी) सोडून बाकी फुल सफेद. बुटं बी सफेद.
शबानाला ब्लड कॅन्सर होतो पण रेखापासुन तिला ते लपवायचे असते पण रेखाला संशय येतोच मग ती खात्री करून घ्यावी म्हणून शबानाला हिरवी मिरची खायला सांगते कारण 'ब्लड कॅन्सर के मरिज हरी मिर्च नहीं खा सकते!' असं अफाट लॉजिक ह्या पिक्चर मध्ये होते.
>>> पाह्यलाय मीही. आणि काही तरी अंगावरचे तीळ मोजते का मोजणार असते रेखा. सुदैवाने पुढचे काही आठवत नाही.
बाकी जितू म्हटले कि मला 'गोरी तेरे अंग अंग में' आठवते. बहुतेक बालपणीचा ट्रॉमा असावा.
हिंदी चित्रपटातला ओरिजिनल
हिंदी चित्रपटातला ओरिजिनल (आणि एकमेव) रिमेक किंग.
>>> प्नमाणित पतींशिवाय अन्य
>>> प्नमाणित पतींशिवाय अन्य कुणीही खालील दुव्यावर टिचकी मारू नये
मी मारली (आणि पस्तावले), मला आता मानद पती म्हणून घोषित केलं तरी चालेल.
बाकी ते 'दफ्तर को देर हो गयी' हे कॉफीगीत किचनलेस होममध्ये बॅकग्राउंडला वाजतं ठेवायला हवं.
खुशबु विसरलात का? गुलजारनी
खुशबु विसरलात का? गुलजारनी जीतु (also known as male Hemal Malini in terms of acting skills!) आणी हेमा मालिनी (also known as female Jeetendra in terms of acting skills!) या दोघांकडुन सुंदर काम करवुन घेतले होते.
मस्त लेख आणि मस्त कंमेंट्स!
मस्त लेख आणि मस्त कंमेंट्स!
६-७ वीत असताना सकाळची शाळा असायची. १ वाजता घरी आल्यावर मला वाढून आई पडायची. मला काहीच काम नसायचं. तेव्हा दुपारचे असले सिनेमे लागायचे टीव्हीवर. झी वगैरे वर. अडनिड्या वयात मुलांना कसले कसले सिनेमे बघायची चटक लागते! मला मात्र असले घरसंसार छाप सिनेमे बघायची चटक लागलेली.... हाहा
एका सिनेमात 'वडील देवाघरी गेले' असं आई मुलाला सांगते. म्हणून पोरगा वडिलांना पतंगीवर पत्र लिहून पाठवतो. नेमकी ती पतंग हिरोला मिळते, असं काहीसं आठवतंय. कुठला सिनेमा असावा याचा इथले जाणकार प्रकाश टाकतीलच. बाकी अशा ७०-८० च्या दशकातील सिनेमांमध्ये अगाऊ कार्टे घेण्याची फॅशन होती. सर्वात डोक्यात जाणारा प्रकार!
बर्नाल लावणारं भूत नाही ,
बर्नाल लावणारं भूत नाही , कुत्रा आहे.
भूताला बाळाला उचलता येत नाही मग कुत्रा त्याला घेऊन येतो.
फार ह्रदयद्रावक सीन आहे तो
अरे हे साबणावरून घसरणे इतके
अरे हे साबणावरून घसरणे इतके कॉमन होते की काय मला एक ही भूल मधे सेम सीन आठवत आहे. जितू घारी आलेला असताना ती (कुणी नुसतीच फ्रेन्ड किंवा ओळखीची सुंदर सुशील बाई ) साबणावरून घसरणे, याने तिला सावरायला येणे , अन त्याच वेळी चुकून नळ की शॉवर चालू होणे आणि बूम! झाली भूल! लगेच बच्चा! मी खूप विचार करून पाहिला की केवळ अशी सिचुएशन झाली म्हणून एरवी गुणी सुखी संसारी लोकांकडून इतकी भूल कशी काय बॉ होईल. वर आणि प्रेक्षकांकडून आणि त्याच्या बायकोकडून अपेक्षा ही की तिने माफ करून त्या मुलाला स्विकारावे किंवा पटकन मरून मार्गातून बाजूला व्हावे!!
वर उल्लेख केलेला चित्रपट एक
वर उल्लेख केलेला चित्रपट एक ही भूल च.
मुलगा जितूची सवय आणि ताकिया कलाम उचलतो तो.
अजून कुठल्यातरी सिनेमात
अजून कुठल्यातरी सिनेमात (जितेंद्रचा नाही. कदाचित मिथुन) हिरो चुकून बाथरूममध्ये शिरतो जिथे हिरॉईन आंघोळ करत असते आणि मग आरडाओरडा इत्यादी. पण मग दुसऱ्या दिवशी वगैरे तीच त्याच्याकडे जाते आणि म्हणते की माझ्याशी लग्न कर! कारण म्हणे हे फक्त नवराबायकोमधेच घडू शकतं
सगळे प्रतिसाद धमाल.
सगळे प्रतिसाद धमाल.
आचार्य मेरी बिवी मैके चली गयी किती निरागस आहे.
हनिमून मनायेंगे , कर्तव्य आणि जबाबदाऱ्या दुसरं काय!
मला पायसचा प्रतिसाद कळला नाही बहुतेक किंवा अर्धवट कळला. जितेन्द्र/ जंपिंग जॅकमुळे कोतबो होईल वाटलं नव्हतं.
साबणाऐवजी बॉडीवॉश वापरलं असतं तर निगोडी जवानी आणि लोकसंख्या नियंत्रित राहिली असती.
अ ती भ न्ना ट!!!
अ ती भ न्ना ट!!!
माँग वाली हिरॉइन त्या पिक्चरमधल्या तीन हीरॉइन्सपैकी कोणासारखीच दिसत नाही >> फोटो पाहून हसून वाट लागली.
अस्मिता, तोडलंस. (पायसचा प्रतिसाद मलाही समजला नाही)
पण जितेन्द्रने केवढे सिनेमे केलेत!!! काय एनर्जी का काय? मानलं त्याला.
फारेन्ड तु ५-५ वर्षांनी लेख का लिहितोस?
कारण म्हणे हे फक्त
कारण म्हणे हे फक्त नवराबायकोमधेच घडू शकतं Rofl
>>>>
हो.. हा पिक्चर, हा सीन मी पाहिलाय लहानपणी
आणि अश्या वयात होतो की वाटलेले वाह, छान आयड्या मिळाली आवडत्या मुलीशी लग्न करायची
दफ्तर को देर हो गयी, मुझे
दफ्तर को देर हो गयी, मुझे जल्दीसे कॉफी पिलाना >>> अरे, बेस्ट! विसरायला झालं होतं हे गाणं
आणि तो एक पिक्चर होता ना
आणि तो एक पिक्चर होता ना कोणता तरी, 5 मिनिट पाहिला होता.जितेंद्र व्हिलन च्या अड्ड्यावर जाऊन खिश्यातून युरेनियम घेऊन येतो असं काहीतरी.
मानद पती >>>
मानद पती >>>
वैधानिक इशारा देण्यात आला होता.
@ अस्मिता, मेरी बिवी मैके चली गयी किती निरागस आहे.. पोस्टच्या शेवटी साबण आल्याने लो बफर साईजमुळे मेंदूत ते...
साबण किती निरागस आहे असं प्रोसेसिंग झालं
त्या काळात निरागसता हे "दूधो नहाओ फुलो फलो" वालं बाळ होतं. त्यात कानावरून केस कापलेले काका खन्ना आघाडीवर होते.
मस्तच लेख नेहमी प्रमाणे. फार
मस्तच लेख नेहमी प्रमाणे. फार एंडच्या लेखांची एक मालिका मायबोली विशेष लेख मध्ये बनवली पाहिजे.
मी पन परि चय च्या जितूची फॅन. मुसाफिर हुंयारो. व इतर गाणी एकदम फेवरिट.
पिक्चर मध्ये जे दागिने लागतात ते भाड्याने द्यायचा एकांचा व्यवसाय होता व ते डिलिव्हरी करायचे आणायचे काम जितू करीत असे. त्यात च तो व्ही शांताराम ह्यांच्या नजरेस पडला व पहिला पिक्चर मिळाला असे कुठेतरी वाचलेले/ ऐकलेले.
खुश्बू मधला चस्मेवाला जितू पण एकदम गुलजार सारखाच दिसतो. लहान पणी गोंधळ व्हायचा. प्यासा सावन मधले मेघारे मेघा रे गाणे जरुर बघा मौशुमी एकदम भारी दिसते लाल साडीत.
हा हा ..फार मजेदार धागा...
हा हा ..फार मजेदार धागा... फारएण्ड तुमची निरीक्षणशक्ती व पंचेसला दाद. पायस व इतर बर्याच जणांचे प्रतिसाद आवडले.
जितेद्रने इतके काही भयंकर चित्रपट करून, भयंकर नाचप्रकार करून ही त्याचा कधी राग आला नाही. (का कोणास ठाऊक). तसा हा बहुतेक कुणाच्या अध्यात मध्यात नसायचा बहुतेक. संजीवकुमार जसे दोन वेगवेगळ्या रुपात (तरूण बीन मिशीचा, तसेच शोले टाईप म्हातारा) दिसायचा तसेच जितेन्द्रही दोन वेगळ्या चेहर्यात दिसायचा. जितेन्द्रचा डबल रोल असलेला जस्टीस चौधरी नावाचा चित्रपट पहायचे भाग्य(?) मला लाभले होते.
याच्यापेक्षा याच्या लेकीने (एकता) जास्त यश मिळवले. मुलाने अगदीच नाही पण बर्यापैकी फेम मिळवला आहे. आता रिटायर्ड लाईफ मस्तपैकी घालवत असेल जितेन्द्र...!!
अरुणोदय सिंग च्या अपहरण सिरीज
अरुणोदय सिंग च्या अपहरण सिरीज (ए जी गाली दे रहा है, बहिन*द बोल रहा है! फेम) मधे सीझन 2 च्या एंडला जितू ची एन्ट्री झालिये...
सीझन 3 मधे मोठ्ठा रोल असेल अशी आशा...
जितेंद्रच्या वडीलांचा
जितेंद्रच्या वडीलांचा business होता, सिनेमात वापरतात ते दागि ने भाड्यानी द्यायचा.
मला वाटते जितेंद्र त्याकाळचा
मला वाटते जितेंद्र त्याकाळचा अक्षय कुमार होता. जशी अक्षय ने खिलाडी सिरीज पकडली तशी जितुजींनी संतान्/औलाद/सिंदुर/ सुहाग अशी सिरीज पकडली. जरा अॅक्टींग बरी असती तर त्याकाळचा अनिल कपूर म्हणाले असते.
फार टॅलेंट किंवा बच्चन वा काका सारखी फॅन फॉलोईंग नसतांना सुद्धा मेहनत, स्वभाव आणि थोडं डोकं वापरून ईंडस्ट्रीतले आपले स्थान कायम अबाधित ठेवणारा. त्याच बरोबर वादांपासून लांब राहण्यात आणि कौटुंबिक आघाडीवर सुद्धा तेवढाच यशस्वी.
मला 'द बर्निंग ट्रेन' मधला जितेंद्र सुद्धा आवडला.
तसेच लहान वयात पाताल भैरवी आणि हातिम ताई वगैरे सिनेमे म्हणजे फॅंटसीची ट्रीट होती. त्यामुळे जितेंद्र आवडायचे ते एक कारण फार लवकर मिळाले आता हाईंडसाईट मध्ये ते कितीही निर्बुद्ध वाटले तरी.
धमाल पोस्टी आहेत.
धमाल पोस्टी आहेत.
क्षणकालाचा टाकीटाकी, मानद पती व ती क्लिप, साबणावरून शब्दशः पाय घसरणे सुपरलोल. मात्र इतर तत्कालीन हीरोंच्या मानाने जितू हिरॉइन्सशी गाण्यात जसा वागायचा त्यावरून "निष्काम" म्हणणे जरा अवघड आहे श्रीदेवी, जयाप्रदा बरोबर गाण्यांमधे फोटोसारख्या स्टॅटिक फ्रेम्स असत त्या आठवा. इतरही अनेक आहेत
बरनॉल लावणारे भूत्/कुत्रा ही लोल. बरनॉल भूत लावत नसून कुत्रा लावतो हे समजल्यावर पहिला डोक्यात विचार म्हणजे "मग बरोबर आहे. That totally makes sense"
पायस - सार्त्र व कामू बद्दल मला फक्त इतरांच्या लेखातून वाचलेली माहिती आहे. पण जितेंद्रच्या संदर्भातून उलटा अर्थ लावायचा प्रयत्न केला
र.आ. - मागच्या पानावरच्या दोन्ही मोठ्या पोस्टींशी सहमत.
अशात यजमानांनी स्वतः भोजन तयार आहे अशी खूण केल्यावर खवळलेल्या पब्लिकने दुष्काळग्रस्त म्हणतील कि काय याची पर्वा न बाळगता हमला करावा तद्वतच फारेण्डचा धागा म्हटल्यावर रिटेपणाचा आरोप होईल कि काय याची तमा न बाळगता पब्लीक तुटून पडणार यात शंकाच नाही. >>> हो अनेकांना लिहीण्यासारखे बरेच काही असेल जितेंद्रबद्दल म्हणून एक लेख व प्रतिक्रिया अशा थाटात हे केले नाही. आणि याच्या पिक्चर्सचा पसारा इतका प्रचंड आहे की कोणा एका व्यक्तीला तो पूर्ण कव्हर करणे शक्य नाही. तेव्हा ते "जाणीवपूर्वक" ही तितकेसे खरे नाही
ही जितेंद्र ची मराठी क्लिप
ही जितेंद्र ची मराठी क्लिप.
https://youtu.be/bdYaKAA9w0g
Pages