भाग १: https://www.maayboli.com/node/75324
..................................................................................................
नववर्षानिमित्त सर्व मायबोलीकरांचे स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा !
भाग १ मधील पृष्ठसंख्या बरीच फुगल्यामुळे हा भाग काढतो आहे.
नव्या वाचकांसाठी थोडी पार्श्वभूमी :
वृत्तमाध्यमांमधून असंख्य बातम्या आणि विविध प्रकारची माहिती प्रसारित होत असते. अलीकडे माध्यमांमध्ये घाईघाईत अर्धवट बातम्या देणे, मूळ इंग्लिशमधील बातमीचे ढिसाळ व हास्यास्पद भाषांतर आणि एकंदरीतच लेखनाबद्दलची बेफिकिरी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. अपवाद म्हणून काही माध्यमांमधून इतरांपेक्षा काहीतरी वेगळे किंवा चांगले सुद्धा सादर केले जाते. अशा वृत्तापैकी तुम्हाला आवडलेले/ नावडलेले/ खटकलेले असे काहीही तुम्ही इथे संबंधित दुव्यासकट लिहू शकता.
शीर्षकाच्या नामविस्तारासह सादर आहे हा “लष्कराच्या भाकऱ्याचा” दुसरा भाग..
जावळीक्य नाही केले यातच
जावळीक्य नाही केले यातच समाधान मानावे.
जवळीक पुरेसे आहे. <<
जवळीक पुरेसे आहे. <<
खरं तर 'जवळीक पुरेशी आहे'
जवळीकता
जवळीकता
मागे दुसरीकडे कुठेतरी अशा शब्दांवर चर्चा झाली होती. गरज नसताना ता लावलेले. माधुर्यता वगैरे. लोकांनी मग त्यावर माधुर्यत्वतापण वगैरे शब्द काढले.
राजकीय फोटो आहे. ता वरून
राजकीय फोटो आहे. ता वरून लोकांनी ताकभात समजून घ्यावा म्हणून लिहीले असेल ते
मागे दुसरीकडे कुठेतरी अशा शब्दांवर चर्चा झाली होती. गरज नसताना ता लावलेले >>>
हो
बटाट्याची चाळ मधे "हा फोटो आहे. याला परमनंटनेसपणा आहे..." असे वाक्य आहे चाळीतील लोकांच्या तोंडी. (पुढे "...बायकांना खुर्च्यांवर बसवून आम्ही उभे राहिलो तर लोक तोंडात शेण घालतील आमच्या" वगैरे आहे
चाळीतील सर्वांचा एक फोटो काढायचे ठरते. उपस्थित लोकांपेक्षा उपलब्ध खुर्च्या कमी असतात. मग तेथे कोणी बसायचे यावरची चर्चा आहे ती)
बापता
बापता
परमनंटनेसपणा
अमिंद्य, अभ्यासूता म्हणायचं होतं का?
आमच्या घरच्या मदतनीस बाईंना
आमच्या घरच्या मदतनीस बाईंना अधूनमधून भयंकर वीकणेसपणा येतो. मग त्या चार दिवस हक्काची सुट्टी घेतात.
प्रतिसादसंख्या हजारी ओलांडतेय
प्रतिसादसंख्या हजारी ओलांडतेय.
नवा भाग ३ काढायची वेळ झाली आहे.
अनिंद्य तुम्ही काढा भाग ३.
अनिंद्य

तुम्ही काढा भाग ३.
Pages