
संध्याकाळ
सूर्य अस्ताला जाऊ लागतो. संध्याकाळ मावळत जाते. मंद वारा येत असतो. पश्चिमेकडे असलेल्या खिडक्यांचे पडदे प्रकाशून मालवतात. फक्त हलकीशी मंद झुळूक तेव्हडी त्यांना झोके देते. पक्षी मात्र मस्त संचार करत असतात. जसे की एखाद्या मैदानावर संध्याकाळी ग्राउंड भरते तसे. मुक्त भराऱ्या मारत असतात. कुठेतरी लांब एकच खिडकी सुर्याळून जाते. अगदी तिथेच सूर्य आहे वाटावे इतकी ती सूर्याच्या प्रकाशात नाहून निघते. पोपट, चिमण्या चिवचिवत असतात. माडांच्या मंद मंद झुल णाऱ्या झावळ्या बघत किती वेळ जातो कळतच नाही. अशी संध्याकाळ शांत, शांत होत जाते. आता मगाचे पडदे उघडले जातात. हळू हळू सूर्य जसं जसं खाली जातो तशी आकाशात रंग पंचमी सुरू होते. कुणाच्या जाण्याचे इतके रंग उधळून केलेलं सेलिब्रेशन बघितले नाही ते इथे रोज बघायला मिळते. मीही हे सगळं टिपून घेत शांत शांत होऊन जाते. कुठलाच आवाज नको, अगदी स्वतः चा ही नको असं वाटते. एक गहिरी तृप्ती मला तृप्त करून जाते.
©झारा तांबे
वा !!! किती सुंदर चित्रदर्शी
वा !!! किती सुंदर चित्रदर्शी वर्णन आहे. लोकांना उदास करणारा हा संध्याकाळचा वेळ मला मात्र खुप आवडतो. पण एकटीच असेन तर जास्तच. कोणाशी संवाद न करता, एकटाच स्वतःमध्ये हरवलेला.
आणि अशा वेळी हे मंद आवाजात लावलेलं गाणं ऐकताना तर मी अनोख्या दुनियेत हरवलेली असते.
https://youtu.be/4CfGvMtSH2M
छान लिहिलंय
छान लिहिलंय
छान
छान
मलाही संध्याकाळ आवडते.
मला उन्ह नकोसे वाटते. त्यामुळे ते जायची वेळ आवडतेच
धन्यवाद सर्वांना!
धन्यवाद सर्वांना!