कथाशंभरी २ - 'जन्म-मरणांचा फेरा' - अ'निरु'द्ध

Submitted by अ'निरु'द्ध on 11 September, 2022 - 07:02

कथाशंभरी २ - 'जन्म-मरणांचा फेरा' - अ'निरु'द्ध

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि .....

तेच दृश्य त्याला वारंवार दिसत होतं.
गरगरणाऱ्या आकाश-पाळण्यासारख्या भोवळ आणणाऱ्या गतीने तर कधी संथ.

सभोवताल वारंवार बदलत होता आणि त्याचा देहही.

कोणकोण आणि कायकाय होता तो, कोण जाणे.

मानव, पशु, पक्षी.. अगदी पिशाच्चयोनीही.

त्यातही सलणारी बाब म्हणजे परिसरातले भोचक लोक वारंवार डोकावून उघडपणे टिकाटिप्पणी करत होते.

एकाएकी जोडलेल्या ह्रदयगती-यंत्रावरील आलेखरेषा विलक्षण नर्तन करु लागली.
परिचारिकेनेच बेभानपणे घंटी वाजवली. डाॅक्टरही धावलेच.
पण आलेखरेषा सपाट झाली होती.

डाॅक्टरांनी मृत्यू-प्रमाणपत्र लिहायला घेतलं.
तारीख : ११ सप्टेंबर २०२२, मध्यरात्री : १२.०० (अमेरिकेची पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ)...

ह्यापुढे मात्र रघूचा जन्म-मरणांचा फेरा चुकला होता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त जमलीये. तरी रघूचा राघोबादादा कोणी केला नाही Happy मी करणार होते पण नीट जमली नाही.

Lol निर्वाण नको. पुढच्या गणेशोत्सवात रघू पुन्हा हवा. "कोब्रा काय" सीरीज असतं तसं "रघू काय!!" सीझन-२

अरे देवा, हपा Lol

<<पुढच्या गणेशोत्सवात रघू पुन्हा हवा.>>

हे मायबोलीकर मोक्ष मिळालेल्याला सुद्धा खेचून आणतील. Happy
तपश्चर्याच तेवढी मोठी असते.

अतिशय कमी कालावधीमधे ह्या रघूचा मायबोलीवर अचानक झालेला बोलबाला पहाता मला काही काळापूर्वी असाच बोलबाला झालेल्या बलबीर पाशाची आठवण झाली. Happy

Pages