बालभारतीच्या कवितेची गाणी
मला माझ्या लहानपणी बालभारतीच्या पुस्तकात असलेल्या आपणा सर्वांनाच आवडत असत.
ह्या बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कवितेला वाचक आणि श्रोत्यांसाठी त्या मी नवीन रुपात सादर केले आहे.
बालभारतीच्या कवितेची गाणी ही लेखमाला माझ्या ब्लॉगवर मी केलेली आहे.
मराठी इयत्ता १ली ते ७वी पर्यंतच्या बालभारतीच्या पुस्तकातील निवडक कवितांचे गाण्यात रूपांतर झालेलं आहे, त्या सर्व कवितेची पुस्तकातील मूळ पाने वाचावयास आणि सदर गाणी ऐकावयास मिळतील. एवढेच नव्हे तर बालभारतीने ह्या कवितेच्या गाण्याच्या ध्वनीमुद्रिका काढल्या होत्या त्यावरील गाणी आणि अधिक माहिती मी दिलेली आहे.
यातील काही गाणी पुढीलप्रमाणे:
देवा तुझे किती सुंदर आकाश ... (इयत्ता १ ली, प्रथम माला)
या बाई या .... (इयत्ता १ ली, प्रथम माला)
हळूच या हो ..... (इयत्ता २ री, प्रथम माला)
मझ्या मामाची रंगीत गाडी हो ..... (इयत्ता २ री, प्रथम माला)
टपटप पडती अंगावरती ..... (इयत्ता ३ री, प्रथम माला)
लेझीम चाले जोरात ..... (इयत्ता ३ री, प्रथम माला)
या बालांनो सारे या ..... (इयत्ता ४थी, प्रथम माला)
घाल घाल पिंगा वाऱ्या ..... (इयत्ता ५ वी, प्रथम माला) (३ वेगळ्या आवाजात)
या झोपडीत माझ्या ..... (इयत्ता ६वी, प्रथम माला)
गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या ..... (इयत्ता ७वी, प्रथम माला)
माझ्या ब्लॉगवरील लेखांची लिंक आहे: https://charudattasawant.com/balbharati
तसेच आमच्या रेडिओ जयमालावर ह्या लेखांचे श्राव्य रूपांतर केले आहे ते खालील लिंकवर ऐकू शकता:
https://charudattasawant.com/radio-jaymala-playlists/
कृपया वाचकांनी आपले अभिप्राय नक्की कळवावेत.
चारुदत्त सावंत
९२२५६०५९६८
८९९९७७५४३९