Submitted by अक्षय समेळ on 9 November, 2021 - 06:57
सोडूनी चिंता उद्याची सारी
बाळ होऊनी पुन्हा जन्मावे
अन् पदराच्या अभायाखाली
डोळे घट्ट मिटून पुन्हा निजावे
वाटता भीती जराशी अंधाराची
ओढुन घ्यावी रजाई जरतारीची
अन् धडधड तुझ्या हृदयाची
ऐकत गुपचूप पडून रहावे
घरभर बागडावे इवल्या पावलांनी
मनसोक्त हसावे खोड्या करुनी
अन् मिळता ओरड जरासा
तुझ्या पाठीमागे हळूच लपावे
- अक्षय समेळ.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान कविता.
छान कविता.
@कॉमी, धन्यवाद!
@कॉमी, धन्यवाद!
सुंदर कविता...!
सुंदर कविता...!
छान आहे !
छान आहे !
खांडेकरांच्या 'पुन्हा वाटते तसेच इवले '
ह्या कवितेचा थोडा reference जाणवला !
@रुपाली-विशे पाटील, _आदित्य_,
@रुपाली-विशे पाटील, _आदित्य_, प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!
आदित्य सर, मी खांडेकरांच्या कविता अजून काही वाचल्या नाही आहेत त्यामुळे मी त्याबद्दल तुम्हांला काहीच सांगू नाही शकत पण ही कवितेची प्रेरणा मी विंदा करंदीकर ह्यांच्या "पुन्हा वाटते तसेच इवले बाळ' ह्या कवितेतून घेतली आहे. फक्त प्रेरणा घेतली आहे, पूर्ण कविता कॉपी केलेली नाही.
Pinterest ह्या प्लॅटफॉर्म वर ती उपलब्ध होती. तुम्ही वाचली नसेल तर आवश्य वाचा, खूप चांगली कविता आहे.
Sorry.. विंदांची आहे होय..
Sorry.. विंदांची आहे होय.. अहो मी खूप दिवसांपूर्वी
वाचली होती..
ते आठवलं.. चुकून खांडेकर म्हणालो..
आणी copy केली असं नव्हतं म्हणायचं मला..
तुमची कविता छानच आहे...
Reference जाणवला फक्त..
@_आदित्य_, हो, सर. होत असते
@_आदित्य_, हो, सर. होत असते असे. मझायासोबत ही बऱ्याचदा घडले आहे.
तुमचा माझ्या कवितेला प्रतिसाद आला हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मला तुमच्या कवितांमधून खूप प्रेरणा मिळते. धन्यवाद!